ETV Bharat / politics

तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा;अमोल कोल्हेंचं अजितदादांना खुलं आव्हान - Amol Kolhe On Ajit Pawar

Amol Kolhe On Ajit Pawar : लोकसभा निवडणुकीच्या (lok sabha election 2024) पार्श्वभूमीवर राज्यात प्रचारसभा जोरात सुरू आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारासाठी शरद पवार जुन्नरमध्ये आले होते. त्यावेळी अमोल कोल्हे यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली.

Amol Kolhe On Ajit Pawar
खासदार अमोल कोल्हे आणि अजित पवार
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 30, 2024, 8:11 PM IST

पुणे (जुन्नर) Amol Kolhe On Ajit Pawar : शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे जेष्ठ नेते शरद पवार यांच्या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या पोराला कसली मर्दुमकी दाखवता, मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, अशा कडक शब्दात खासदार अमोल कोल्हे यांनी यावेळी अजित पवारांना जाहीर सभेत आव्हान दिलंय.

जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली का : उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कोल्हे यांना पाडून दाखवतो, असं म्हटल्यानंतर आजच्या जाहीर सभेत डॉ. कोल्हेंनी त्यांच्यावर थेट निशाणा साधलाय. अजितदादा जेव्हा तुम्ही माझ्यासारख्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या मुलाला पाडून दाखवतो असं म्हणता, तेव्हा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला प्रश्न पडतो की, मी काय चूक केली. शेतकऱ्यांचे, बिबट्यांचे, जनतेचे प्रश्न मांडले ही चूक केली?, की स्वाभिमान गहाण ठेवला नाही ही चूक केली? तुम्हाला मर्दुमकी दाखवायची असेल तर दिल्लीत जाऊन दाखवा. शेतकऱ्यांच्या समस्या सोडवायला, बिबट्याच्या त्रासापासून मुक्त करायला मर्दुमकी दाखवा. मात्र, पाडापाडी करण्याची भाषा आणि दमदाटी करणं सोडा. काहीही झालं तरी आमचा स्वाभिमान कधीच झुकणार नाही, असं कोल्हे यांनी ठणकावून सांगितलं.

अमोल कोल्हे हे लढायला तयार नव्हते, मग अचानक कसे काय तयार झाले, असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. मात्र, आजितदादा ही विचारांची लढाई आहे, स्वाभिमानाची लढाई आहे. म्हणून ताठ मानेने जगायचं अन लढायचं ठरवलं. - अमोल कोल्हे, खासदार

कांदा निर्यातीबद्दल मोदी बोलले नाही : आपल्या भाषणात विरोधी उमेदवारांचाही कोल्हेंनी चांगलाच समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी पुण्यात आले होते. या सभेत मोदी यांच्या आधी अधिकृत उमेदवार शिवाजी आढळराव यांना फक्त साडेतीन मिनिटं देण्यात आली होती. यातही त्यांनी शेतकऱ्यांना सहा हजार रुपये दिले जातात, यावर भाष्य केलं. शेतकरी धोरणाचं विरोधी उमेदवार कौतुक करतात. मात्र, शेतकऱ्यांच्या पिकाला मिळणार भाव, दुधाचे दर, कांदा निर्यात, टोमॅटो याबद्दल ते बोलले नाहीत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही कांदा निर्यातीबद्दल बोलले नाहीत. दहा वर्षात ते पुण्यात अनेकदा आले. मात्र, एकदाही त्यांना शिवजन्मभूमीत येऊन नतमस्तक व्हावंसं वाटलं नाही.

होय, आमचे साहेब आमचा आत्मा आहेत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातल्या सभेत शरद पवारांना 'भटकती आत्मा' म्हणत टीका केली. हो, आमचे साहेब आत्मा आहेत, ते जनतेचा आत्मा आहेत. वाजपेयींच्या सत्ताकाळात भूकंपग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी हाचं आत्मा पुढं आला होता, असं सांगत मोदींनी केलेल्या टीकेला त्यांनी उत्तर दिलं. हा आत्मा शेतकऱ्यांच्या बांधावर, तरुणांना न्याय देण्यासाठी भटकतो, याला आम्ही पवित्र मानतो. आम्ही आमच्या आत्म्याला जपतो आणि कायम जपणार आहोत. आमचा आत्मा पक्ष, घरं फोडत नाही, असं कोल्हेंनी म्हटलंय.

संरक्षण खात्याविषयी प्रश्न विचारत कोणाच्या कंपनीचं भलं केलं : आपल्या भाषणात डॉ. कोल्हे म्हणाले की, काही लोक फक्त व्यापार करण्यासाठी संसदेत गेले. संसदेत 60-70 प्रश्न फक्त संरक्षण खात्याविषयी विचारले गेले. हे प्रश्न विचारून कोणाच्या कंपनीचं भलं होतंय हे कळतयं, असं म्हणत विरोधी उमेदवाराला त्यांनी लक्ष्य केलं.

सभेत यांची होती उपस्थिती : शिरुर मतदार संघातील महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ ओतूर येथे शरद पवार यांची जाहीर सभा झाली. यावेळी आमदार अशोक पवार, माजी आमदार राम कांडगे, दिलीप ढमढेरे, शिवसेना उपनेते बबनराव थोरात, माजी आमदार बाळासाहेब दांगट, शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेश भोर, उपजिल्हाप्रमुख संभाजी तांबे, बाबा परदेशी, अनंतराव चौगुले, सुनिल मेहेर, बाजीराव ढोले, शरद चोधरी, बाळासाहेब बाणखेले, अल्लूभाई ईनामदार, अनिल तांबे, दिपक औटी, बाबू पाटे, सुरेखा वेठेकर, राजश्री बोरकर, किशोर दांगट, शरद लेंढे, सुरज वाजगे आदी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. ठाकरे पिता-पुत्रांनी दोन वर्षात मुख्यमंत्र्यांना शिव्या-शाप दिल्याशिवाय काय केलं; खासदार श्रीकांत शिंदेंचा सवाल - Lok Sabha Election 2024
  2. मोदी हे स्वतःच अतृप्त आत्मा...; लोकनियुक्त सरकारं पाडणं ही त्यांची महत्वाकांक्षा, नाना पटोले यांचा टोला - Lok Sabha Election 2024
  3. शिंदे गटात लेट एन्ट्री घेणाऱ्या रवींद्र वायकर यांना लोकसभा उमेदवारी, 'या' मतदारसंघातून लढणार - Lok Sabha Election 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.