ETV Bharat / politics

मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील निकालावर शंका, अमोल कीर्तिकर न्यायालयात घेणार धाव - lok Sabha Election Result 2024 - LOK SABHA ELECTION RESULT 2024

Lok Sabha Election Result 2024 : मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघात महाविकास आघाडीच्या अमोल कीर्तिकर (Amol Kirtikar) यांना अवघ्या 48 मतांनी पराभूत व्हावं लागलं. तर महायुतीचे रवींद्र वायकर विजयी झाले आहेत. परंतु या निकालावर अमोल कीर्तिकर यांनी आक्षेप घेत निकाला विरोधात न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका घेतली आहे.

Amol Kirtikar
अमोल किर्तीकर (ETV BHARAT MH DESK)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 7:39 PM IST

मुंबई Lok Sabha Election Result 2024 : उत्तर पश्चिम लोकसभा निवडणुकीच्या निकालावर आक्षेप घेत, न्यायालयात आव्हान देण्याची भूमिका शिवसेना (ठाकरे) उमेदवार अमोल कीर्तिकर(Amol Kirtikar) यांनी घेतली आहे. तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाच्या कारभाराबाबत राष्ट्रपतींना पत्राद्वारे तक्रार करणार आहेत. येत्या काळात या निकालाचं प्रकरण चांगलच चिघळण्याची चिन्हे आहेत. कारण अमोल कीर्तिकर यांना आधी विजयी घोषित करण्यात आल्यानंतर त्यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव झाला आहे.

नाट्यमयरित्या निकाल : मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात नाट्यमयरित्या शिवसेना उमेदवार रविंद्र वायकर 48 मतांनी विजयी झाले आहेत. त्यापूर्वी मतमोजणीनंतर अमोल कीर्तिकर यांची 681 मतांनी विजयी झाल्याची घोषणा निवडणूक अधिकाऱ्यांनी केली. वायकर यांनी फेरमतांची मागणी केली. अधिकाऱ्यांनी ती फेटाळून लावली. परंतु, वायकर फेरमतमोजणीवर ठाम राहिले. यामध्ये 75 मतांनी वायकर आघाडीवर आले. तसंच पोस्टल मतांची फेरमोजणी केली. यात 111 मते बाद करण्यात आली. कीर्तिकर यांनी यावर हरकत घेतली. तसंच तीन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्यानं व्हीव्हीपॅट मतांची फेरमोजणी करावी अशी मागणी केली. निवडणूक अधिकारी आणि सेनेच्या पोलिंग बूथच्या मोजणीत 652 मतांची तफावत आढळून आल्याचं म्हटलंय. परंतु निवडणूक अधिकाऱ्यांकडं अधिकृत आकडेवारी असून सेनेच्या पोलिंग एजंटची मोजणी चुकीची आहे, असं सांगत वायकर 48 मतांनी विजयी झाल्याची घोषणा केली.

न्यायासाठी कोर्टात धाव घेणार : आधी कीर्तिकरांना विजयी नंतर वायकरांना विजयी असा निर्णय निवडणूक अधिकाऱ्यांनी दिला. मात्र, या निर्णयावर मतदारांनी शंका उपस्थित केली असून, याबाब निवडणूक आयोगाचा गोंधळ दिसून येत असल्याची प्रतिक्रिया लोकांनी दिलीय. अमोल कीर्तिकर यांनी निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्णयावर आक्षेप घेतला असून, न्यायालयात आव्हान देणार आहेत. यात 652 मतांबाबत निर्णय घेण्याची मागणी केली जाणार आहे. त्यामुळं न्यायालय यावर काय निर्णय घेणार किंवा राष्ट्रपती तक्रारीवर काय म्हणणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

हेही वाचा -

  1. पराभव अशक्य हा गैरसमज दूर केला, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला - Uddhav Thackeray
  2. पराभवाची सगळी जबाबदारी माझी, मला मंत्रिमंडळातून मोकळं करा : देवेंद्र फडणवीसांचा मोठा निर्णय? - Devendra Fadnavis On Election Result
  3. मी लढणारा कार्यकर्ता असंच पुढे लढत राहणार; पराभवानंतर रवींद्र धंगेकर यांची पहिली प्रतिक्रिया - Lok Sabha Election Results 2024

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.