ETV Bharat / politics

अजित पवारांच्या कार्यक्रमात निम्मा मंडप रिकामा; महिलांनी भर कार्यक्रमातून घेतला काढता पाय - Ajit Pawar Satara Tour

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 2 hours ago

Ajit Pawar Satara Tour : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 'अमृत महोत्सव' सांगता सोहळा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झाला. या कार्यक्रमासाठी साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या मैदानावर भव्य मंडप उभारण्यात आला होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनीही कार्यक्रमाला दांडी मारली.

Ajit Pawar Satara Tour
अजित पवार (Source - ETV Bharat)

सातारा Ajit Pawar Satara Tour : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत मंगळवारी झालेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या 'अमृत महोत्सव' सांगता सोहळ्याकडे लोकांनी पाठ फिरवल्यानं निम्मा मंडप रिकामा पडल्याचं चित्र पाहायला मिळालं. बँकेशी संलग्न असलेल्या विविध कार्यकारी सहकारी सोसायट्यांच्या महिला पदाधिकाऱ्यांनीही कार्यक्रमातून काढता पाय घेतला.

अजित पवारांच्या कार्यक्रमाचा फ्लॉप शो : मूळच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सातारा जिल्ह्यानं अजित पवारांना मोठी ताकद दिली होती. अजित पवार साताऱ्यात येणार म्हटलं की, तरुणांपासून ते वृध्द कार्यकर्त्यांपर्यंत सर्वजण त्यांच्या स्वागताला हजर असायचे. त्यांचा प्रत्येक दौरा झंझावाती व्हायचा. कार्यक्रमात टाळ्या, शिट्ट्या ऐकायला मिळायच्या. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवारांनी पश्चिम महाराष्ट्राचा दौरा केला होता. त्या दौऱ्यालाही मोठा प्रतिसाद मिळाला होता. मात्र, साताऱ्यातील त्यांचा मंगळवारचा कार्यक्रम पूर्णपणे फ्लॉप झाला.

कार्यक्रमात निम्मा मंडप रिकामा (Source - ETV Bharat Reporter)

बँकेच्या जडणघडणीत पालकमंत्र्यांचं योगदान काय? : 'अमृत महोत्सव' सांगता कार्यक्रमाला पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पालकमंत्री म्हणून आमंत्रित केलं होतं. वास्तविक, पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे आजोबा, लोकनेते दिवंगत बाळासाहेब देसाई यांचं बँकेच्या स्थापनेत आणि जडणघडणीत मोठं योगदान होतं. परंतु, आजवर बँकेचे संचालक देखील नसताना शंभूराज देसाईंची कार्यक्रमातील हजेरी अनेकांना खटकली. त्यामुळं पाटणमधील शरद पवार गटाच्या लोकांनी या कार्यक्रमाकडे पाठ फिरवल्याचं दिसलं.

बँकेला अग्रस्थानी नेण्यात उंडाळकरांचं भरीव योगदान : सातारा जिल्हा बँक विलासकाका उंडाळकर यांच्या कडक शिस्तीमुळं सहकारातील अग्रगण्य बँक बनली. पारदर्शक कारभारामुळं नाबार्डनं सातारा जिल्हा बँकेला अनेकदा गौरवलं आहे. त्याचं श्रेय विलासकाका उंडाळकरांना दिलं जातं. अमृत महोत्सवाच्या आढाव्यात उंडाळकरांच्या योगदानाची कुठे दखल घेण्याची तसदी विद्यमान संचालक मंडळानं घेतली नसल्याचंही पाहायला मिळालं.

हेही वाचा

  1. महाराष्ट्रात महायुती १७० पार करणार, चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास, संजय राऊत यांच्यावर केली सडकून टीका - Chandrakant Patil
  2. भाजपाचे मित्रपक्ष 2029 साली 'कमळा'त विलीन होणार - जयंत पाटील - Jayant Patil
  3. पुण्यात भाजपामध्ये खडाजंगी; माझ्यावर अन्याय झाला म्हणत प्रसन्न जगताप आक्रमक - Prasanna Jagtap

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.