ETV Bharat / politics

"भाजपा-शिंदेंचा महाराष्ट्रावर दुष्ट डोळा, यांच्यामुळं...."; आदित्य ठाकरेंचा घणाघात - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

आदित्या ठाकरे यांची आज पत्रकार परिषद पार पडली. या पत्रकार परिषदेतून आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या विकासकामावरून महायुती सरकारवर टीका केली.

Aditya Thackeray On CM Eknath Shinde
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आदित्य ठाकरे (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 29, 2024, 9:37 PM IST

मुंबई : मुंबईत साडेतीन हजार बसेस होत्या. मात्र आता त्या साडेतीन हजारावरून अडीच हजारपर्यंत आल्या आहेत. हे सरकार जर असेच राहिले तर बसेस अडीचशेपर्यंत आणतील. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना बेस्ट बसेसमध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. पाच रुपये तिकिटामध्ये तुम्ही पाच किलोमीटर मुंबईत प्रवास करू शकता. तर 20 रुपयेमध्ये कुठेही प्रवास करू शकता. बेस्ट बसेसमधील कर्मचाऱ्यांचे पगार, बोनस, ग्रॅज्युटी यांचाही विचार केला होता. आम्ही 2027 पर्यंत 10 हजार इलेक्ट्रिक बसेस आणण्याचा विचार केला होता. मात्र गद्दारी करुन आमचं सरकार पाडलं.

महायुती सरकारवर केली टीका : "मुंबईतील रस्ते सुद्धा घोटाळयाच्या पैसातून झाले आहेत. फुटपाथमध्ये घोटाळा, खड्डे पण तिथेच आहेत. आज आपण पाहतोय तर रेल्वेमध्ये मेगा ब्लॉक होत आहे. म्हणजे मुंबईची जी ताकत आहे, कष्टकरी मुंबईकर दिवस-रात्र मेहनत करुन पब्लिक ट्रान्सपोर्टने प्रवास करतोय. पण त्याला न परवडणाऱ्या खासगी वाहनाकडं ढकलण्याचं काम हे सरकार करत असल्याची टीका", आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर केली.

टाटा एअर बस प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेला : आमच्या सरकारच्या काळात आम्ही मॅग्नेटिक महाराष्ट्राचे कार्यक्रम घेतले. साडेसहा कोटीची गुंतवणूक आणली. असंच तामिळनाडूमध्ये देखील सहा लाख कोटीची गुंतवणूक आली. पण ह्या भाजपाप्रणित आणि शिंदे सरकारनं एक रुपया देखील महाराष्ट्रात आणला नाही. दरम्यान, टाटा एअर बस हा गुजरातमध्ये प्रोजेक्ट गेला आहे. यावरून देवेंद्र फडणवीसांनी तुमच्यावर टीका केली, असं ठाकरेंना विचारले असता ते म्हणाले की, "देवेंद्र फडणवीस आणि महायुती सहकार हे महाराष्ट्र विरोधी काम करत आहे. पण आता नागपूर विरोधातही ते काम करू लागले की काय? असं वाटत आहे. टाटा इयर बस हा प्रोजेक्ट नागपूरमध्ये यावा असं त्यांना वाटलं नाही का?".

महाराष्ट्रावर यांचा दुष्ट डोळा: "दोन-अडीच वर्षात अनेक उद्योगधंदे राज्यातील गुजरातमध्ये गेले आहेत. हे महायुतीचे सरकार महाराष्ट्रविरोधी काम करतंय. हे गुजरातचे लाडके सरकार आहे. त्यामुळंच राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये गेले. महाराष्ट्रावर आणि मुंबईवर भाजपा आणि एकनाथ शिंदेंचा दुष्ट डोळा असल्याची टीका ठाकरेंनी शिंदे-फडणवीसांवर केली. टाटा इअर बस प्रकल्प गुजरातमध्ये नेऊन या सरकारनं महाराष्ट्राच्या तरुणांच्या जखमेवर मीठ चोळलं आहे".

महाराष्ट्र-गुजरात वाद निर्माण केला जातोय : राज्यातील अनेक प्रकल्प गुजरातमध्ये गेले. याबाबत आमची काही हरकत नाही. परंतु जे महाराष्ट्राच्या हक्काचे आहे ते महाराष्ट्राला मिळालं पाहिजे. मग याच्यामध्ये वेदांत फॉक्स्वान प्रकल्प, टाटा इयर बस असो असे कित्येक प्रकल्प हे गुजरातमध्ये गेले. त्यामुळं भाजपा आणि एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्र आणि मुंबईला लुटाचयचं ठरवलं आहे. जे निवडणुकीमधून भाजपाला पाठिंबा देतात आणि भाजपा आणि शिंदेंच्या बाजूने लढतात. ते महाराष्ट्रद्रोही आहेत असं मला वाटतं. मुंबईकर टॅक्स भरतात. त्या मुंबईतील अनेक भूखंड हे अदानीच्या घशात घालण्याचं काम शिंदे सरकार करत आहे. महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेऊन राज्यातील तरुणांना बेरोजगार करण्याचं काम ह्या सरकारनं केलंय. महाराष्ट्र आणि गुजरात हा काही वाद नाही. पण राज्यातील उद्योगधंदे गुजरातमध्ये नेऊन महायुतीचं सरकार महाराष्ट्र-गुजरात वाद निर्माण करत असल्याची टीका आदित्य ठाकरेंनी महायुती सरकारवर केली.

हेही वाचा -

  1. भाजपाचा तीव्र विरोध डावलून नवाब मलिकांना राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे अधिकृत उमेदवारी
  2. सदा सरवणकर निवडणूक लढण्यावर ठाम; शर्मिला ठाकरे म्हणाल्या, "लढून जिंकण्यात जास्त..."
  3. व्हीलचेअर, वॉकर घेऊन मनसेच्या उमेदवारानं दाखल केला अर्ज; कोल्हापूरच्या रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.