ETV Bharat / opinion

प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिएक्टर म्हणजे काय?, पंतप्रधानांचा प्रकल्पाला पाठिंबा असताना द्रमुककडून होतोय विरोध - Prototype Fast Breeder Reactor

Prototype Fast Breeder reactor : भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडनं तामिळनाडूमधील कल्पक्कम येथे 500 मेगावॅटचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर अणुभट्टी (PFBR) पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक हाय-स्पीड अणुभट्टी असणारा रशियानंतर भारत हा दुसरा देश बनणार आहे. हा प्रकल्प भारताला ऊर्जा स्वावलंबनास मदत करेल, असं यावेळी मोदींनी म्हटलं होतं. मात्र, याला तामिळनाडूचे मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्या नेतृत्वाखालील डीएमकेनं या प्रकल्पाला पाठिंबा दिलेला नाही. हा प्रकल्प काय आहे हे जाणून घेण्यासाठी ईटीव्ही भारतनं तज्ज्ञांशी संवाद साधलाय.

Prototype Fast Breeder reactor
Prototype Fast Breeder reactor
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 6, 2024, 10:23 AM IST

चेन्नई Prototype Fast Breeder reactor : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तामिळनाडूमधील कल्पक्कम येथे भारतातील पहिल्या स्वदेशी जलद ब्रीडर अणुभट्टी भेट दिली होती. यानंतर त्यांनी भारताला ऊर्जा स्वावलंबी होण्यास स्वदेशी जलद ब्रीडर अणुभट्टी मदत करले, असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलाय. 'X' सामाजिक माध्यवरील एका पोस्टमध्ये मोदी म्हणाले, 'अणुभट्टीमुळं जास्त इंधन तयार होणार आहे. यामुळं भारताच्या थोरियम साठ्याचा उपयोग होण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळं भारताला आण्विक इंधन आयातीची गरज भासणार नाही. भारताला ऊर्जा स्वावलंबन साध्य करण्यात मदत होईल,'

अणुभट्टी असणारा रशियानंतर भारत हा दुसरा देश : केंद्रीय अणुऊर्जा विभागाच्या कल्पक्कम अणुभट्टी संकुलात भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेडमनं (BHAVINI) द्वारे 500 मेगावॅटचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (PFBR) प्रकल्पाचे काम केले जात आहे. शीतलक म्हणून द्रव सोडियम वापरणारे हे भारतातील पहिलं युनिट आहे. ही अणुभट्टी कार्यान्वित झाल्यास, व्यावसायिक हायस्पीड अणुभट्टी असणारा रशियानंतर भारत हा दुसरा देश होणार आहे. भारत हा पहिल्या स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर (PFBR) चाचणीसाठी सज्ज आहे. यावर ईटीव्ही भारतनं डॉ. आर. वेंकटेश्वरन यांच्याशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी ब्रीडर अणुभट्ट्यांद्वारे झालेल्या तांत्रिक प्रगतीची माहिती दिली. तसंच या प्रकल्पाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज असल्याचं सांगितलं. "पंतप्रधानांनी कल्पकम अणु सुविधा केंद्रात स्वदेशी प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर कार्यक्रमाचं उद्घाटन केलं. आता अत्याधुनिक फास्ट ब्रीडर अणुभट्टीच्या गाभ्यामध्ये कंट्रोल रॉड लोड करणं सुरू झाले. ही अणुभट्टी, एक तांत्रिक चमत्कार, प्लुटोनियमचा वापर करते, असे ते म्हणाले.

'हे' आहेत अणुऊर्जा कार्यक्रमाचे ती टप्पे : सुरुवातीच्या टप्प्यात उर्जा निर्माण करण्यासाठी नैसर्गिक युरेनियमचा वापर केला जातो. मर्यादित पॉवर आउटपुटसह एक सोपी रचना यात कार्य करते. दुसऱ्या टप्प्यात नैसर्गिक युरेनियम आणि प्लुटोनियम एकत्र केलं जातं. पहिल्या टप्प्यापासून पुनर्प्रक्रिया करून मिळवलेले उप-उत्पादन हे एकत्रीकरण केल्यामुळं पहिल्या टप्प्याच्या आधीच्या यशामुळंच शक्य होतं. कारण आवश्यक इंधन आधीच तयार करण्यात येते. तिसरा आणि शेवटचा टप्पा इंधन स्त्रोत म्हणून मुबलक थोरियमचा वापर करण्याची कल्पना आहे. केवळ दुसऱ्या टप्प्यात मांडलेल्या पायाभरणीद्वारेच हे साध्य करता येते. या टप्प्यात, थोरियम हे इंधन रॉड्सच्या सभोवतालच्या ब्लँकेट मटेरियल म्हणून काम करते. त्यातून वीज उत्पादन अनुकूल होते.

शाश्वत इंधन मिळणार : "दुसऱ्या टप्प्याचे वेगळेपण जलद तंत्रज्ञानामध्ये आहे. कल्पक्कम येथील जलद उत्पादन अणुभट्टी कार्यक्रमात दाखविण्यात आलं आहे. भारताच्या तांत्रिक पराक्रमाचा दाखला देणारी अणुभट्टी प्लुटोनियम-आधारित इंधनाचे शाश्वत स्वरूप दर्शवते. विखंडन दरम्यान प्लुटोनियम केवळ ऊर्जाच निर्माण करत नाही तर, आजूबाजूच्या नैसर्गिक युरेनियमचे नवीन प्लुटोनियममध्ये रूपांतर करते. त्यातून एक स्वयं-दीर्घकाळ चालणारी साखळी प्रक्रिया निर्माण होते. ही कृत्रिम स्थिरता ही एक महत्त्वपूर्ण कामगिरी असते. त्यातून एक ग्रॅम जळत्या प्लूटोनियममधून 1.2 ग्रॅम नवीन प्लुटोनियम मिळतो. अणुभट्टीमुळं आपण महत्त्वपूर्ण टप्पे गाठले आहेत. प्रथम इंधन रॉड स्थापित केल्यामुळं आपण शाश्वत ऊर्जा निर्मितीच्या दिशेनं एक पाऊल पुढं आहोत. 4 महिन्यांत सर्व इंधन भरलं जाईल. त्यानंतर अणुऊर्जा विभागाकडून मंजुरी मिळाल्यानंतर पुढील टप्प्यातील कामकाज सुरू केलं जाईल. 5 महिन्यांत वीज निर्मिती सुरू झाली पाहिजे. काम सुरू झाल्यानंतर अणुऊर्जा विभागाकडून मंजुरी मिळवून ते हळूहळू 500 मेगावॅट वीज निर्मितीपर्यंत पोहोचेल," असं कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्राचे संचालक डॉ. बालसुब्रमण्यम वेंकटरामन यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं.

द्रमुकचा का आहे विरोध? : कल्पक्कम अणुऊर्जा प्रकल्प संकुलातील प्रस्तावित अणुभट्ट्यांना विरोध होतोय. त्यामुळं तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन अणुभट्टी कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. याविषयी स्पष्टीकरण देताना द्रमुकचे संघटनात्मक सचिव आरएस भारती म्हणाले की, "मुख्यमंत्री या कार्यक्रमात सहभागी झाले नाहीत. यावरून द्रमुकला फास्ट ब्रीडर रिॲक्टरची स्थापना मान्य नसल्याचं दिसून येते. स्टरलाइट प्लांटचं कामकाज रोखण्यासाठी द्रमुक सक्रिय आहे. कल्पक्कम प्रकल्पावरही आमची अशीच भूमिका आहे. प्रकल्पाला तामिळनाडूच्या लोकांना विरोध आहे." अणुभट्ट्यांविरुद्ध काम करणाऱ्या पूवुलागिन नानबर्गल या पर्यावरणीय गटानं ब्रीडर अणुभट्टी प्रकल्पाला विरोध केला आहे. संस्थेच्या अहवालानुसार, फ्रान्स-जपानमध्ये या प्रकारच्या अणुभट्ट्यांमध्ये शीतलक म्हणून वापरल्या जाणाऱ्या द्रव सोडियमच्या गळतीमुळं हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.

हे वाचलंत का :

  1. विकसनशील भारताला अजूनही गाठायचाय खूप मोठा पल्ला; दर्जेदार शिक्षण, भूक आणि गरिबीशी झुंज सुरूच
  2. भारतातील रस्ते हरित करणं गरजेचं : ट्रकच्या मार्गावर शून्य उत्सर्जन करणं का आहे महत्वाचं, जाणून घ्या
  3. राज्यसभा निवडणूक निकालाचा भाजपाला लोकसभा निवडणुकीत होणार फायदा?

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.