ETV Bharat / opinion

इस्रायलचे शत्रूला टिपून मारण्याचे धोरण : भविष्यात काय वाढून ठेवलंय? - Targeted Killings of Israel

author img

By DR Ravella Bhanu Krishna Kiran

Published : Aug 5, 2024, 1:22 PM IST

Updated : Aug 5, 2024, 2:33 PM IST

Targeted Killings of Israel - इस्रायलनं कारवाईचा धडाका लावताना लक्ष्य निश्चित करुन त्याला संपवण्याचा सपाटा लावला आहे. नुकतीच अशा प्रकारे इस्माइल हनीयेह यांची हत्या करण्यात आली. यासंदर्भात आंतरराष्ट्रीय विषयांचे जाणकार डॉ. रावेल भानू कृष्णा किरण यांचा लेख.

हल्ला
हल्ल्यात बेचिराख झालेला परिसर (AP)

हैदराबाद Targeted Killings of Israel : नुकत्याच झालेल्या 27 जुलैच्या हिजबुल्लाह रॉकेट हल्ल्यानंतर, गोलान हाइट्समधील माजदल शम्सच्या ड्रुझ शहरावर 12 मुलांचा मृत्यू झाला. इस्रायलने गाझा युद्धाच्या समांतर लेबनॉनच्या दक्षिण सीमेवर प्रतिआक्रमणाची धमकी देणारा हिजबुल्ला कमांडर फौद शुक्र याला लक्ष्य केलं. हमासच्या राजकीय ब्युरोचे अध्यक्ष, इस्माइल हनीयेह, इराणच्या राष्ट्राध्यक्षांच्या शपथविधीला गेले असताना हे सगळं घडलं. पॅलेस्टाईन, इराक, लेबनॉन, येमेन आणि सीरियामधील अतिरेकी गटांचा समावेश असलेल्या इराण या सगळ्यांनाच यातून आणखी एक गंभीर धक्का बसला आहे. इस्रायलनं घोषित केलं आहे की अल-अक्सा फ्लड ऑपरेशनचे नियोजक मोहम्मद डेफ या सर्वोच्च लष्करी कमांडरला त्यांनी ठार मारलं आहे. या हत्यांनंतर, इस्रायल आणि इराणमधील 40 वर्षे जुने शत्रुत्व आणि त्यांच्या प्रतिकाराची मजल एका नवीन टप्प्यावर आली. सध्या, प्रमुख नेत्याच्या मृत्यूचा हमासवर कसा परिणाम होईल? इराण आणि इतर त्यांच्या बाजूचे गट सूड घेण्याच्या धमक्या कशा देणार? यातून भविष्यातील धोक्याला सामोरे जाण्यासाठी इस्रायल आणि युनायटेड स्टेट्स अमेरिका कशी वाटचाल करत आहेत, हे पाहिलं तर ते जगासाठी त्रासदायक आहे.

हनियेह यांच्या हत्येनंतरची परिस्थिती - 2017 मध्ये हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचे अध्यक्ष बनल्यापासून हानियेह यांनी धोरणात्मक नियोज सुरू केलं. प्रादेशिक, जागतिक स्तरावर हमासच्या वाढत्या सामर्थ्यावर चालणारे ते प्रमुख नेते आहेत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 7 ऑक्टोबर नंतर चीन आणि रशियापासून टर्लीपर्यंत पोहोचून हमासला पाठिंबा देण्यास प्रवृत्त केलं. हमासनं ओलीस ठेवलेल्यांच्या सुटकेसाठी वाटाघाटींमध्येही त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता, त्याच्या मृत्यूने गाझा आणि मध्यपूर्वेतील हमासला मोठा धक्का बसला आहे. खरेतर, हनियेह यांच्या हत्येमुळे हमासच्या वैचारिक किंवा कार्यक्षमतेला धक्का बसणार नाही, परंतु यामुळे काही कारवाया थांबू शकतात. 2004 मध्ये हमास चळवळीचे संस्थापक अहमद यासीन आणि अब्देल अझीझ अल-रंतिसी यांची हत्या हमासने पाहिली आहे. परंतु हमासचा नायनाट झाला नाही, उलट तो गट आणखी मजबूत झाला. आंतरराष्ट्रीय भू-राजकीय रणनीतीकारांचा असा विश्वास आहे की हमास याह्या सिनवार यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ म्हणून कायम राहील. त्यांनी हमासला 7 ऑक्टोबर रोजी इस्रायलवर हल्ले सुरू केलेल्या सैनिकांच्या 24 बटालियनमध्ये पूर्णपणे रूपांतरित केलं होतं.

विद्यमान परिस्थितीतील रणनिती - खरं तर इराण थेट युद्ध करू इच्छित नाही आणि युद्ध लांबणीवर टाकण्यास प्राधान्य देतो. परंतु हनियेहची त्यांच्या प्रदेशात घुसून केलेली हत्या इराणी सुरक्षेच्या चिंधड्या उडवणारी आहे. त्यानंतर इराणी आणि अरब जगतातील लोकांना सुरक्षेची खात्री देण्यासाठी कठोर प्रत्युत्तर देण्याची मागणी होत आहे. तथापि, नजीकच्या भविष्यात, जर त्यांनी थेट यामध्ये उडी घेतली तर संघर्ष प्रादेशिक युद्धात बदलेल. इराणने आपल्या धोरणाद्वारे इस्रायलला आधीच क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने वेढले आहे. त्यात इस्रायलविरूद्ध प्रतिकार करणाऱ्या सदस्यांच्या संयुक्त लष्करी कारवाईचा समावेश आहे. जर इराणने अशा मदतीनं इस्रायलवर एकाच वेळी बॉम्बफेक करण्याचं ठरवलं तर ते कदाचित खूप विनाशकारी असेल आणि अमेरिकेला इस्रायलच्या बाजूने युद्धात उभे राहण्याशिवाय पर्याय उरणार नाही. शिवाय, इस्रायल-हमास युद्धानंतर, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रियालच्या घसरणीमुळे इराणची अर्थव्यवस्था कमकुवत आहे. परिणामी, युद्धात थेट गुंतवून घेणं इराणच्या हिताचं नाही. परंतु, त्यांची रणनीती अशी राहील की, अमेरिकेचा थेट सहभाग टाळण्यासाठी प्रादेशिक युद्धाच्या पातळीवरील संघर्ष सुरू ठेवला जाईल.

इराणच्या पाठिशी कोण - इराण आणि त्यांच्या गोटात हमास, लेबनॉन हिजबुल्ला, येमेन्स हौथी, कतैब हिजबुल्ला, इराकमधील इस्लामिक संघटना, इराकमधील शिया लोकांची 47 वी पॉप्युलर मोबिलायझेशन युनिट ब्रिगेड आणि इराकमधील विविध शिया सशस्त्र गट यांचा समावेश आहे. ते सीरिया तसंच इतर पर्यायी ठिकाणे, जसे की इस्रायलच्या ओटेफ अझा प्रदेशातील वस्त्यांवर आणि अमेरिकेच्या लष्करी तळांवर हल्ले करू शकतात. 31 जुलै 2024 रोजी बेरूतवर केलेल्या हल्ल्याचा बदला म्हणून काताइब हिजबुल्लाह देखील इस्रायलवर हल्ला करू शकतो. इस्रायलनं घडवून आणलेल्या हत्यांमुळे जागतिक स्तरावर मुस्लिम बहुसंख्य देशांमध्ये इस्रायलविरोधी मोहिमेला चालना मिळाली आहे. त्याचबरोबर अतिरेकी गटांच्या भरतीच्या प्रयत्नांनाही चालना मिळाली आहे. अतिरेकी गट राजनैतिक मिशन राबवून, ज्यू आणि अमेरिकन नागरिकांवर हल्ले करून इस्रायल आणि अमेरिकेला प्रतिकार करु शकतात.

अमेरिका इस्रायलच्या पाठिशी - इस्रायल निली युनिट (द इटरनिटी ऑफ इस्त्रायल विल नॉट लाइ) 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यात सामिल प्रत्येकाला संपवण्यासाठी प्रयत्न करत आहे. डिसेंबर 2023 मध्ये रजा मौसावी या सर्वोच्च इराणी कमांडरची आणि जानेवारी 2024 मध्ये हमासचा क्रमांक 2 चा सालेह अल-अरौरी यांची हत्या त्यांनी केली. आता हनीयेह यांची हत्या करुन इस्रायलने हमासच्या याह्या सिनवार आणि इतर महत्त्वाच्या व्यक्तींना स्पष्ट संदेश दिला की ते कुठेही सुरक्षित नाहीत. याला प्रत्युत्तराचा धोका असताना इस्रायली हवाई दलाचे प्रमुख टोमर बार यांनी इशारा दिला आहे की, इस्रायल, त्यांच्या नागरिकांचं नुकसान करण्याचा कुणी विचार करत असेल त्याविरुद्ध कारवाईसाठी सज्ज आहे. त्याचवेळी अमेरिकेनं इराण आणि त्यांच्या बाजूच्या सर्व धोक्यांपासून इस्रायलच्या सुरक्षेच्या आश्वासनाचा पुनरुच्चार केला आहे. अमेरिकेकडे यूएसएस रुझवेल्ट आणि यूएसएस बुल्केले या दोन नौदल विनाशक आहेत. इतर काही युद्धनौका ओमानच्या आखातात आणि पूर्व भूमध्य समुद्रात आहेत. अमेरिका यातील काही इस्रायलच्या मदतीला पाठवण्याची पावले उचलत आहे. युद्धनौका, अतिरिक्त बॅलिस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण-सक्षम क्रूझर्स, विनाशक, लढाऊ विमाने आणि जमिनीवरुन मारा करणारी बॅलिस्टिक क्षेपणास्त्रे संरक्षणासाठी तसंच इराणच्या संभाव्य हल्ल्यापासून रक्षण करण्यासाठी अमेरिका पाठवू शकते.

भारतावर परिणाम होईल - भारताच्या एकूण तेल आयातीपैकी दोन तृतीयांश तेलाचा पुरवठा मध्यपूर्वेतून होतो. यामार्गे भारताच्या अर्थव्यवस्थेत मध्यपूर्वेने महत्त्वपूर्ण भूमिका बजावल्याने भारतावरही याचे गंभीर परिणाम होत आहेत. भारताचा द्विपक्षीय व्यापार देखील प्रामुख्याने संयुक्त अरब अमिरात आणि पर्शियन आखातातील इतर अरब देशां समृद्ध आहे. एअर इंडियाने इस्रायलच्या तेल इस्रायलच्या अवीवकडे जाणारी आणि तेथून 8 ऑगस्टपर्यंत उड्डाणे निलंबित केल्यामुळे वाढत्या तणावामुळे वाहतूक विस्कळीत होईल. तसंच, मध्यपूर्वेतील वाढत्या तणावादरम्यान, भारतानं, भारतीयांना लवकरात लवकर लेबनॉन सोडण्याचा सल्ला दिला आहे.

युद्धाचा भडका उडू शकतो... - मध्य पूर्वेतील स्फोटक आणि विपरीत परिस्थितीच्या परिणामांबद्दल जग चिंता करत आहे की, हा प्रदेश एखाद्या मोठ्या युद्धाच्या मार्गावर जात आहे का? ज्यामुळे जागतिक आर्थिक, लष्करी आणि राजकीय स्थैर्यावर परिणाम होईल. हमास, हिजबुल्ला आणि विशेषतः इराणला नेमका किती झटका बसला आहे, त्यावर त्यांच्या कशा प्रतिक्रिया होतील, त्यानंरतच संघर्ष वाढेल की नाही हे समजू शकेल. इस्रायल विरुद्ध थेट युद्ध करुन बदला घेण्यासाठी किंवा राजकीय, मानसिक आणि गुप्त लढाईने पुढे जाण्यासाठी प्रभावी उपाययोजनांवर त्यांचा विचार सुरू आहे. इराण आणि त्याच्या प्रतिकाराचा विचार केला तर विरुद्ध बाजूने इस्रायल आणि अमेरिका यांनी प्रोत्साहन दिल्यास, प्रादेशिक युद्धाची शक्यता नाकारता येत नाही. यावर वॉल स्ट्रीट जर्नलमधील अमेरिकन लेखक वॉल्टर रसेल मीड यांना आशा आहे की, इस्रायलच्या हल्ल्यांमुळे इराण आणि हिजबुल्लाला युद्धाऐवजी बदला घेण्याच्या त्यांच्या पर्यायांचा फेरविचार करण्यास भाग पाडेल.

हे वाचलंत का...

  1. हमासचा म्होरक्या टिपला; इस्राईलनं इस्माइल हनीयेहला घरात घुसून 'ठोकलं', अंगरक्षकाचाही खात्मा - Ismail Haniyeh Killed In Tehran
  2. इस्रायल हमास युद्ध : आंतरराष्ट्रीय न्यायालयानं गाझात होणारा नरसंहार थांबवण्याचे दिले आदेश - Israel Hamas War
  3. इस्रायल-हमास संघर्ष कायमचा संपुष्टात येणार? संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं युद्धबंदीचा ठराव केला मंजूर - Gaza ceasefire

Last Updated : Aug 5, 2024, 2:33 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.