नवी दिल्ली T20 World Cup Pitches : अमेरिकेत प्रथमच ICC T20 विश्वचषक 2 जूनपासून सुरू होणार आहे. याआधी अमेरिकेत ना क्रिकेट स्टेडियम होतं ना खेळपट्टी बनवणारे क्युरेटर. मात्र, आता अमेरिकेत देखील विश्वचषकाचा थरार बघायला मिळणार आहे. विश्वचषक स्पर्धेसाठी तयार करण्यात आलेल्या खेळपट्ट्यांना नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये पोहोचण्यासाठी 17 हजार 171 किमी अंतर पार करावं लागलं आहे.
T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार : विश्वचषकासाठी खेळपट्ट्या ॲडलेडमध्ये तयार करण्यात आल्या. त्यानंतर खेळपट्ट्यांना परिपक्व होण्यासाठी फ्लोरिडाला नेण्यात आलं. शेवटी लाँग आयलंड, न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी स्टेडियमच्या मध्यभागी खेळपट्ट्यांना स्थापित करण्यात आलं आहे. या खेळपट्ट्यांनी हजारो किलोमीटरचा प्रवास केला आहे. या खेळपट्ट्या डॅमियन हॉफ यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केल्या आहेत. यासाठी डॅमियन हॉफ यांना फारचं कष्ट घ्यावे लागले. त्यांच्या अथक परिश्रमानंतर T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार झाली. तत्पूर्वी, ICC अधिकाऱ्यांनी हॉफ यांच्याशी संपर्क साधला त्यांना T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी तयार करण्याची विनंती केली होती.
डेमियन हॉफ कोण आहेत : पाच वर्षांपूर्वी हॉफ यांनी त्यांच्या प्रवासाला सुरवात केली होती. त्यांनी ॲडलेड ओव्हलमध्ये काही स्थानिक क्रीडा संस्थांसोबत काम केल्यामुळं त्यांना खेळपट्टी तयार करण्याचं कौशल्यं प्राप्त झालं. त्यानंतर त्यांची 2024च्या T20 विश्वचषकासाठी खेळपट्टी क्युरेटर म्हणून निवड झाली. युएस-आधारित स्पोर्ट्स टर्फ कंपनी, लँडटेकसोबत करार करून त्यांनी क्रिकेट स्टेडियमचा करार केला. खेळपट्टी तयार करण्याच्या प्रक्रियेत नाविन्यपूर्ण डिझाइन, आधुनिक बांधकाम, क्रिकेट खेळपट्टी तयार करण्यासाठी एक प्रगत दृष्टीकोन लागतो. त्यासाठी हॉफ यांनी मेहनत घेत पारंपरिक खेळपट्ट्या तसंच अत्याधुनिक खेळपट्ट्यांच्या बांधकामाचा समन्वय साधला.
खेळपट्टीच्या तयारीबाबत डॅमियन हॉफ म्हणाले, 'आमचा उद्देश अशा खेळपट्ट्या तयार करणे आहे. ज्यात चेंडूला उसळी मिळून फलंदाजाला चांगले शॉट्स खेळता येतील. त्यामुळं खेळपट्ट्या तयार करण्याचं आव्हान आम्ही स्वीकारलं आहे. खेळपट्ट्या तयार करण्यात कल्पकता असायला हवी. त्यानंतरच तुम्हाला क्रिकेट पाहण्याचा चांगला आनंद मिळतो, असं हॉफ यांनी म्हटलंय.
क्रॉस कॉन्टिनेंटलचा प्रवास : ऑक्टोबर 2023 मध्ये ही प्रक्रिया सुरू झाली, जेव्हा हाफ यांनी 10 ड्रॉप-इन खेळपट्ट्यांचं काळजीपूर्वक काम केलं होतं. त्यांनी चार सामन्यांसाठी तयार खेळपट्ट्या तसंच सहा सराव खेळपट्ट्या काळजीपूर्वक तयार केल्या होत्या. यात त्यांनी दोन भाग केले होते. यात त्यांनी चिकणमातीसह विविध गवतांचा वापर करून खेळपट्ट्या तयार केल्या. त्यानंतर खेळपट्ट्या जानेवारी 2024 मध्ये समुद्र ओलांडून फ्लोरिडाच्या किनाऱ्यावर पोहोचल्या. फ्लोरिडाच्या गरम वातावरणात T20 विश्वचषकासाठी खेळपट्ट्या आता तयार आहेत. खेळपट्टीच्या या खडतर प्रवासानंतर टी-20 विश्वचषक जिंकण्यासाठी प्रत्येक संघ जोमानं तयारी करत आहे.
हे वाचलंत का :
- मुंबईचं पराभवाचं 'सप्तक'; लखनऊकडून पराभवानंतर स्पर्धेतील आव्हान संपल्यात जमा - LSG vs MI
- T20 World Cup 2024 Squads : T20 विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर, हार्दिक पांड्यावर मोठी जबाबदारी - India T20 World Cup 2024 Squad
- KKR Vs DC IPL2024 : 'सॉल्ट'नं मारला सामन्यात 'तडका'; कोलकातानं 'राजधानी एक्सप्रेस' रोखली, 7 विकेट्सनं मिळवला विजय - KKR vs DC IPL 2024 47th match