ETV Bharat / opinion

भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन बनवणार, पण कसं ? वाचा सविस्तर - Indian Rupee - INDIAN RUPEE

Indian Rupee An International Currency : भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय पातळीवरील चलन कसं बनवता येईल, यावर श्रीराम चेकुरी यांनी विश्लेषण केलं आहे. यात त्यांनी रुपयाचं आंतरराष्ट्रीयीकरण केल्यानं भारताचा भौगोलिक राजकीय प्रभाव वाढू शकतो. त्यासह इतर देशांशी आर्थिक संबंध मजबूत होऊ शकतात. द्विपक्षीय व्यापार करार सुलभ होऊन राजनैतिक संबंधांना प्रोत्साहन मिळू शकते.

Indian Rupee as International Currency
संग्रहित छायाचित्र
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 11, 2024, 10:01 AM IST

Updated : Apr 11, 2024, 12:41 PM IST

हैदराबाद Indian Rupee An International Currency : भारतीय चलन असलेल्या रुपयाची आंतरराष्ट्रीय बाजारात घसरण होत असते. अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपयाची किंमत घसरल्यानं विरोधक सातत्यानं सरकारवर टीका करतात. त्यामुळे आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपयाची घसरण न होता त्याचे भाव वधारण्याचे प्रयत्न करण्यात येतील, असं आश्वासन सरकारकडून देण्यात येत आहे. मात्र परकीय चलनाची देवाणघेवाण ही व्यापाराच्या मुळाशी जाते. 1950 च्या दशकात संयुक्त अरब अमिरात, कुवैत, बहरिन, ओमान आणि कतारमध्ये भारतीय रुपयाचा मोठ्या प्रमाणावर चलन म्हणून वापर करण्यात येत होता. मात्र 1966 मध्ये भारताच्या चलनाचे अवमूल्यन झाल्यानं भारतीय रुपयावरील अवलंबित्व कमी करण्यासाठी या देशांची चलनं सुरू झाली.

दुसऱ्या महायुद्धानंतर वाढला डॉलरचा भाव : दुसऱ्या महायुद्धाच्या खायीत गेल्यानंतर जगाला मोठ्या आर्थिक संकटाला तोंड द्यावं लागलं. यावेळी दुसऱ्या महायुद्ध संपल्यापासून ते 1971 पर्यंत अमेरिकन डॉलर आणि स्टर्लिंग पाउंड ही प्रमुख आंतरराष्ट्रीय चलनं होती. मात्र त्यानंतर 1971 ला राष्ट्राध्यक्ष निक्सन यांनी अमेरिकन डॉलरला सोन्याशी डी लिंक करण्याची घोषणा केली. त्यामुळे जर्म आणि जपान यांनीही अमेरिकन डॉलर आणि ब्रिटीश पाउंडसोबत स्पर्धा करण्यास सुरुवात केली.

रिझर्व्ह बँकेनं रुपयाला बनवलं पूर्णपणे परिवर्तनीय : पेट्रोलियन संकट आल्यानं 1974 मध्ये चलनाच्या अडचमी वाढल्या होत्या. त्यामुळे अनेक देश चलनाचे तरंगत्या आणि विकसनाचा अवलंब करत होते. रिझर्व बँक ऑफ इंडियानं 1994 मध्ये वस्तू आणि सेवांशी संबंधित चालू खात्यांमध्ये रुपयाला पूर्णपणे परिवर्तनीय केलं. त्यामुळे रिझर्व्ह बँकेच्या पूर्व परवानगीशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय रुपयाची देवाणघेवाण करुन कोणतंही विदेशी चलन खरेदी करता येते. रिझर्व्ह बँकेनं रुपयाचे आंतरराष्ट्रीयकरण केल्यानं भारताचा भौगोलिक आणि राजकीय प्रभाव वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे भारत इतर देशांशी आर्थिक संबंध मजबूत करु शकते. रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण झाल्यानं भारताला द्विपक्षीय व्यापार करार सुलभ झाला आहे. त्यासह राजनैतिक संबंधांना प्रोत्साहन मिळण्याचीही शक्यता आहे. देशाच्या आर्थिक स्थिरतेवर विपरित परिणाम न करता रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन बनवण्याची प्रक्रिया करता येते. यात मागण्यांचा समतोल राखणं हे एक आव्हान आहे. देशाच्या अंतर्गत चलनविषयक धोरणाची उद्दिष्टे आणि आंतरराष्ट्रीय राखीव चलन पुरवणारा देश म्हणून वर्णन करता येते.

भारतीय रुपयाला आंतरराष्ट्रीय चलन म्हणून मान्यता : जगभरात सर्वत्र डॉलर हे एकमेव स्वीकारलं जाणारं चलन आहे. आशियाई बाजारांनी अमेरिकन डॉलरला पर्याय म्हणून इतर चलनांच्या गरजेवर चर्चा केली. त्यामुळे डॉलरचं महत्त्व अविरत आहे. 1 जून 2023 रोजी दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊन इथं झालेल्या बैठकीनंतर ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत परराष्ट्र व्यवहार आणि आंतरराष्ट्रीय संबंध मंत्र्यांनी संयुक्त निवेदन जारी केलं. या निवेदनात डॉलरच्या वापराला प्रोत्साहन देण्याचं महत्त्व अधोरेखित करण्यात आलं. आंतरराष्ट्रीय व्यापारातील स्थानिक चलनं तसेच त्यांच्या व्यापार भागीदारांसह आर्थिक व्यवहार करण्यास मान्यता देण्यात आली. आयएमएफनं भारतीय रुपया हा चीनच्या आरएमबी या चलनासोबत आंतरराष्ट्रीय चलन म्हणून स्वीकारला. यावेळी आयएमएफनं स्वीकृत आंतरराष्ट्रीय चलन म्हणजे भारतीय रुपयाचा वापर रहिवासी आणि अनिवासी नागरिकांच्या व्यवहारात आणि जागतिक व्यापारासाठीही राखीव चलन म्हणून करण्याचं ठरवलं. निर्यात आणि आयात व्यवहार भारतीय रुपयात केले जातात. त्यामुळे भारतीय रुपयाच्या आंतरराष्ट्रीयीकरणाचे अनेक फायदे आहेत.

रुपयाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी रोडमॅप : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या आंतर-विभागीय गटाने (IDG) 5 जुलै 2023 ला भारताच्या चलनाचं आंतरराष्ट्रीयीकरण करण्यासाठी एक रोडमॅप सादर केला. भारतानं भांडवली खाते व्यवहार सक्षम केले. यात कॉर्पोरेट संस्थांना बाह्य व्यावसायिक कर्ज आणि भारताबाहेरील भारतीय संस्थांद्वारे जारी केलेले रुपया नामांकित बाँडद्वारे संसाधनं उभारण्याची परवानगी देण्याविषयी निर्णय घेण्यात आला. आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंटसाठी रुपयाचं महत्त्व भारतीय रिझर्व्ह बँकेच्या जुलै 2022 च्या योजनेनं अधिक लक्ष वेधून घेतलं. यानं भारतीय रोखे बाजारात अतिरिक्त रुपयांची गुंतवणूक करण्यासाठी लवचिक धोरण स्वीकारलं. व्यापक धोरण तयार करून बाह्य व्यापारासाठी रुपयाला सेटलमेंट करण्याची परवानगी दिली. भारतानं रशियासोबत व्यापारवृद्धी केली. यात रिझर्व्ह बँकेनं डिसेंबर 2022 मध्ये सुरू केलेल्या आंतरराष्ट्रीय व्यापार सेटलमेंट इन इंडियन रुपीज (INR) यंत्रणेचा एक भाग म्हणून भारतानं रशियासोबत रुपयांमध्ये विदेशी व्यापाराचा पहिला करार केला.

हेही वाचा :

  1. एकेकाळी बुडणारी बँक व्यवस्था नफ्यात आली- पंतप्रधान नरेंद्र मोदी - PM Modi Mumbai visit
  2. मुंबापुरी, मायानगरी आता श्रीमंतांची नगरी! अब्जाधीशांच्या संख्येत बीजिंगला टाकलं मागे - Harun global rich list 2024
  3. ३१ मार्चपूर्वी करबचतीची करा घाई; या आर्थिक वर्षासाठी कर बचतीच्या महत्वाच्या वाचा दहा टिप्स - Ten tax saving instruments

Last Updated : Apr 11, 2024, 12:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.