ETV Bharat / opinion

सायबरसुरक्षेचा धोका : FedEx कुरिअरनं वाढत आहे फसवणूक, अनेकांना घातलाय कोट्यवधींचा गंडा - FedEx Courier Fraud - FEDEX COURIER FRAUD

FedEx Courier Fraud - सध्याच्या काळात विविध ऑनलाईन गुन्हेगारीला ऊत आला आहे. शेकडो-हजारो नाही तर लाखो-कोटी रुपयांना या माध्यमातून गंडा घालण्यात येत आहे. मात्र आपण सतर्क राहिलं तर या गुन्हेगारीला आळा घालू शकतो. फेड एक्स कुरियर गुन्हेगारीचं विश्व इथे उलगडून दाखवलंय, तेलंगाणाच्या सायबर सुरक्षा ब्युरोच्या संचालिका अतिरिक्त डीजी पोलीस शिखा गोयल यांनी. वाचा त्यासाठी ही महत्वपूर्ण बातमी.

FedEx कुरिअरनं वाढत आहे फसवणूक
FedEx कुरिअरनं वाढत आहे फसवणूक (संग्रहित चित्र)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 28, 2024, 2:21 PM IST

हेदराबाद FedEx Courier Fraud : अलिकडच्या काळात अशा गोष्टी सुरक्षा यंत्रणांच्या नजरेस आल्या आहेत की, मोठ्या प्रमाणात डेटा चोरला गेला आहे. सायबर सुरक्षा तज्ञांनी जगभरातील लाखो लोकांना प्रभावित करणाऱ्या मोठ्या प्रमाणात डेटा उल्लंघनाचा पर्दाफाश केला आहे. प्रख्यात ऑनलाइन किरकोळ विक्रेत्यांच्या डेटाबेसला लक्ष्य करणाऱ्या या उल्लंघनामुळे असंख्य ग्राहकांची नावे, पत्ते, फोन नंबर आणि अगदी क्रेडिट कार्ड तपशीलांसह संवेदनशील वैयक्तिक माहिती उघड झाली आहे. त्याचे परिणाम गंभीर आणि दूरगामी आहेत. ज्यामुळे लाखो लोकांची आर्थिक फसवणूक होण्याचा धोका आहे.

हॅकर्सनी नेमकं काय केलं - या सर्व गोष्टी एका अत्याधुनिक सायबर हल्ल्याने सुरू झाल्या. यातून किरकोळ विक्रेत्यांची सुरक्षाच धोक्यात आली आहे. हॅकर्सने ग्राहकांच्या डेटाचे संरक्षण करण्यासाठी डिझाइन केलेले एन्क्रिप्शन प्रोटोकॉल आणि फायरवॉलला बायपास करून डेटाबेसमध्ये अनधिकृत प्रवेश मिळवण्यात यश मिळवलं. आत गेल्यावर त्यांनी वैयक्तिक माहितीचा खजिना चोरून नेला. सायबरसुरक्षा तज्ञ आता नेमक्या नुकसानीचे मूल्यांकन करण्यासाठी चोवीस तास काम करत आहेत. "या उल्लंघनाचे प्रमाण अभूतपूर्व आहे," असे एका तज्ञानं सांगितलं. "सायबर हल्लेखोर आश्चर्यकारकपणे निष्णात होते. त्यांनी कोणताही मागमूस मागे ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी नेमकं काय-काय चोरलं हे कळून येणं अवघड तसंच आव्हानात्मक आहे."

याचे दुष्परिणाम काय होतील - लाखो प्रभावित ग्राहकांसाठी ही बातमी दुःस्वप्नापेक्षा कमी नाही. चोरलेल्या माहितीचा अनधिकृत व्यवहार करण्यासाठी, कर्जासाठी अर्ज करण्यासाठी किंवा सायबर हेरगिरीच्या कृत्यांसाठी वापर केला जाऊ शकतो. या गुन्ह्यांना बळी पडण्याची भीती स्पष्ट आहे आणि सायबर सुरक्षा तज्ञ व्यक्तींना स्वतःचे संरक्षण करण्यासाठी त्वरित कारवाई करण्याचं आवाहन करत आहेत. "कोणत्याही संशयास्पद कृतीसाठी तुमचे बँक स्टेटमेंट आणि क्रेडिट रिपोर्ट्सचं निरीक्षण करा," असा सल्ला तज्ञांनी दिला आहे. "ऑनलाइन खात्यांसाठी तुमचे पासवर्ड नियमितपणे बदला आणि सतर्क राहा."

FedEx कुरिअर फसवणूक - डेटा चोरीच्या अनागोंदी दरम्यान, एक नवीन सायबर क्राइमची पद्धत दिसून येत आहे: FedEx कुरिअर फ्रॉड. या घोटाळ्यात लोक अशा फ्रॉडच्या भीतीलाच बळी पडतात. त्यातूनच हा घोटाळा होतो आणि या घोटाळ्याचे आधीच असंख्य बळी ठरले आहेत. एक उदाहरणच द्यायचं झालं तर एका संध्याकाळी, रवी या हैदराबादमधील एक प्राध्यापकांना, त्यांचं जीवन बदलेल असा फोन आला. फोन करणाऱ्याचा आवाज शांत पण आग्रही होता. "श्री रवी, हे 'कस्टम्स' डिपार्टमेंट आहे. आम्हाला तुमच्या नावावर ड्रग्ज आणि शस्त्रे असलेलं पॅकेज सापडलं आहे. सीबीआय यात सामील आहे, आणि तुम्ही सहकार्य न केल्यास तुम्हाला अटक केली जाईल." असं फोनवर सांगण्यात आलं. मग काय रवी तर स्तब्धच झाले. त्यांनी असं पॅकेज कधीच पाठवलं नव्हतं. परंतु कॉलरला त्यांचं नाव, पत्ता आणि इतर वैयक्तिक तपशील माहीत होते. त्यामुळे फोनवर मिळणारी धमकी अगदी खरी वाटू लागली. काय घडत आहे हे कळण्यापूर्वीच दुसरा कॉल आला - यावेळी, एक व्हिडिओ कॉल होता. गणवेशातील एका व्यक्तीने स्वत:ला सीबीआय अधिकारी म्हणून सांगितलं. गंभीर आरोपांचा पुनरुच्चार त्यानं पुरावा म्हणून बनावट कागदपत्रं दाखवली. घाबरलेल्या अवस्थेतील या प्राध्यापकांनी काहीतरी तोडगा काढण्याची विनंती केली. त्यावर त्या "अधिकाऱ्याने" एक ऑफर दिली. अटक टाळण्यासाठी त्यानं 99 लाख रुपयांची मागणी केली. प्रचंड दबाव आणि भीतीमुळं प्राध्यापक रवी यांनी पैसे दिले. मात्र नंतर लक्षात आलं की आपली फसवणूक झाली आहे.

आणखी कुणा-कुणाची फसवणूक - केवळ रवीच नाही तर आणखी एका प्राध्यापकाचेही ४५ लाख रुपयांची अशीच फसवणूक झाली. तर हैदराबादमधील एका व्यावसायिकाला ८० लाख रुपयांना गंडवलं. घोटाळेबाजांचे डावपेच बाकी भन्नाट होते. जोपर्यंत ते इच्छित रक्कम मिळत नाही तोपर्यंत ते त्यांच्या पीडितांना सतत कॉल करतात. धमकावतात आणि आपल्याला हवे ते करण्यास भाग पाडतात. विशेषतः एका त्रासदायक प्रकरणात, एका महिलेला रात्रभर स्काईप कॉलद्वारे भीती दाखवूनं ओलिस ठेवण्यात आलं होतं. सकाळपर्यंत तिनं शेवटी घोटाळेबाजांच्या खात्यावर तब्बल ६० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच तिनं ताबडतोब 1930 कॉल सेंटरशी संपर्क साधला, ज्यामुळे सायबर सुरक्षा ब्युरोनं लगेच ट्राझॅक्शनचे पैसे गोठवले.

यांच्याशी लढायचं तरी कसं - या वर्षभरात सायबर सुरक्षा ब्युरोकडे 1026 तक्रारी आल्या. गुन्हेगारांनी तब्बल 36.74 कोटींची चोरी केली आहे. खरं तर वेळेवर माहिती दिल्याबद्दल अनेकांचे आभार मानायला हवेत. कारण त्यामुळे सायबस सुरक्षा अधिकारी तब्बल 7.46 कोटी वसूल करण्यात यशस्वी झाले आहेत. सायबर सुरक्षा ब्युरोच्या संचालिका अतिरिक्त डीजी पोलीस शिखा गोयल, यांनी ही माहिती दिली. गुन्हेगारांविरुद्धच्या लढाईत आपण आघाडीवर असल्याच यातून दिसून येतं. "हे घोटाळेबाज कोणतीही कसर सोडत नाहीत," असं त्या म्हणाल्या. "परंतु पीडितांनी ताबडतोब तक्रार केल्यास, आम्हाला पैसे चोरीस जाणं थांबवता येतं आणि दोषींना शिक्षा देण्याची चांगली संधी मिळते" पुढे त्या म्हणाल्या.

घोटाळेबाज पीडितांना कसं पटवतात - FedEx फसवणूक करणारे असं सांगून पैसे उकळतात, की पीडितांनी परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये निषिद्ध असलेल्या वस्तू पाठवलेल्या आहेत. पीडितांची प्राथमिक माहिती जमा केल्यानंतर गुन्हेगार त्यांना फोन करतात. त्यात त्यांनी मिळवलेला व्यक्तिगत तपशील सांगतात. ते तुम्हाला तुमच्या नावाने बोलतात. नावाने कॉल केल्यानं फसवणूक करणाऱ्याला पीडितेचाविश्वास मिळविण्यात मदत होते. आता पीडिताला सांगितलं जाते की तुम्ही FedEx कुरिअरद्वारे परदेशात पाठवलेल्या कुरिअरमध्ये ड्रग्ज, पासपोर्ट, पिस्तूल तसंच गोळ्या आहेत. या सगळ्या गोष्टी कस्टम स्कॅन दरम्यान सापडल्या आहेत, असं सांगितलं जातं. सीबीआय किंवा गुन्हे शाखेचे पोलिस गुन्हा नोंदवतील अशी धमकी दिली जाते, अशी माहितीही गोयल यांनी दिली.

दुसऱ्या कॉलमध्ये काय होतं - काही सेकंदात, स्काईपवर दुसरा व्हिडिओ कॉल स्कॅमरकडून येतो. कॉलर म्हणतो की, तो मुंबईचा सीबीआय अधिकारी आहे किंवा असं काहीतरी आहे आणि त्याने कुरिअरमधील वस्तूंबाबत कस्टम अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे गुन्हा नोंदवला आहे, अशी बतावणी करतो. त्यानंतर मुंबईत तपासात सहभागी होण्यास सांगण्यात येतं. तसं नाही केलं तर अटक करण्याची धमकी देण्यात येते. गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन अटक केल्यास जामीन मिळणार नाही, अशी भीती ते पीडितेला देतात. असंही अधिकाऱ्यांनी सांगितलं.

तिसरा कॉलही येतो - पीडित व्यक्तीला म्हणजेच त्यांनी जाळ्यात ओढलेल्या व्यक्तीला काही कळायच्या आताच, फसवणूक करणारा आणखी एक व्हिडिओ कॉल करतो. कॉलर सीमाशुल्क अधिकारी असल्याचा दावा करतो. पीडिताने पाठवलेल्या कुरिअरचा समावेश असलेल्या 'बेकायदेशीरतेचा' पुनरुच्चार करून आधीच्या कॉलमध्ये सांगितलेल्याच गोष्टी पुन्हा सांगतो. हे फसवणूक करणारे भीती निर्माण करण्यासाठी पीडिताच्या नावाची काही बनावट कागदपत्रे दाखवू शकतात. यातून ते प्रचंड घाबरवतात. आपल्या नकळत काही व्यवहार झाल्याचं ते सांगतात. आपल्या गळी अक्षरशः खोट्या गोष्टी पद्धतशीरपणे उतरवतात.

कॉलवर कॉल करुन सायबर गुन्हेगार भंडावून सोडतात - सायबर गुन्हेगार पीडितांना विचारच करुन देत नाहीत. अशी परिस्थिती आणतात की मती गुंग होते, विचार करण्यास वेळ मिळत नाही त्यामुळे पीडित एवढा घाबरुन जातो की, त्यांच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करण्यास तयार होतो. पैसे पाठवण्यापूर्वी खातरजमा करण्याचंही भान राहात नाही. आपली फसवणूक होत आहे. हे कळतच नाही. त्यामुळे अशा फसवणूक करणाऱ्यांची खेळी पूर्ण होते. यातून हकनाक बळा पडतो आणि पैसे जातात.

पोलीसाचा सल्ला काय - देशात कोठेही कोणतीही तपास यंत्रणा कोणालाही थेट व्हिडिओ कॉल करत नाही. त्यामुळे तुम्हाला कोणी सांगितल्यास व्हिडिओ कॉलवर या आम्ही तुमचे म्हणणे नोंदवू. ते खरे नाही, असं पोलीस अधिकारी शिखा गोयल म्हणाल्या. त्यांनी स्पष्ट केलं की देशातील कोणतीही एजन्सी व्हिडिओ कॉलद्वारे स्टेटमेंट रेकॉर्ड करत नाही. त्यांच्या म्हणण्यानुसार केवळ एक स्टेटमेंट रेकॉर्ड केल्यावर किंवा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, कोर्टात खटल्यादरम्यान असं होऊ शकतं. तपासामध्ये असा कोणताही कॉल पोलीस किंवा इतर कोणत्याही यंत्रणेकडून केला जात नाही असं गोयल यांनी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या, "जर तुम्हाला कोणी असं काही कॉल करुन सांगितलं तर कृपया विश्वास ठेवू नका".

शिखा गोयल म्हणाल्या की, दररोज, सायबर विभागाला 1930 हेल्पलाइनवर 20 ते 30 कॉल येतात. अलिकडच्या काळातील परिस्थितीचा विचार केल्यास फक्त या FedEx फसवणुकीतून तेलंगणामध्ये दररोज सुमारे एक कोटी रुपये गमावले जातात. अलीकडे, एका प्रकरणात एका पीडितेने सहा कोटी गमावलेत, असही गोयल यांनी सांगितलं. सावध राहिले तर आपली फसवणूक टाळता येऊ शकते. जरी काही चूक झाली तरी ती योग्य वेळेत सायबर सिक्युरिटी विभागाला कळवल्यास त्यातून आपली सुटका करता येते. यासंदर्भात बोलताना गोयल म्हणाल्या की, अशीच एकाची फसवणूक झाली. त्यात तो वेळीच सावध झाला. त्यानं ६० लाख रुपये ट्रान्सफर केले होते. मात्र लगेच त्यानं विचार केला की आपण काहीतरी चुकीचं केलं आहे. लगेच त्यानं 1930 या नंबरवर कॉल केला आणि संपूर्ण 60 लाख वाचले, अशी माहितीही गोयल यांनी दिली.

सुरक्षित कसे राहायचे - कोणताही सायबर गुन्हा रोखण्यासाठी, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही कोणत्याही अनोळखी व्यक्तीशी आर्थिक संवाद साधू नका. कोणत्याही अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका, विश्वास ठेवू नका किंवा तुम्ही कोणताही गुन्हा केला आहे असं कोणी म्हणत असेल तर त्यावर तत्काळ विश्वास ठेवू नका. तुम्हाला जी बतावणी केली जाते, त्यामध्ये काही तथ्य नसेल तर तुम्ही कोणताही गुन्हा केलेला नाही. त्यामध्ये घाबरुन जाण्याची गरज नाही.

सावध राहा, सजग राहा - जर तुम्ही अशा गोष्टींना बळी पडल्यास, ताबडतोब 1930 या नंबरवर डायल करा, यातून तुमचे पैसे वाचू शकतात. कारण अशी अनेक उदाहरणे आहेत जिथे या नंबरवर फोन केल्यानं अनेकांचे पैसे जाता-जाता वाचले आहेत. फक्त तेलंगणा सायबर ब्युरोचा विचार केल्यास येथे 400 कोटींहून रुपयांवर अधिक रक्कम गोठवली आहे. अनेकजण लुटीपासून वाचले आहेत, अशी माहिती शिखा गोयल यांनी दिली.

जनतेची सुरक्षा जनतेच्या हातात - तुम्ही जर अशा फसवणुकीतून पैसे गमावल्यास, तुम्हाला राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर त्वरित तक्रार दाखल करण्याचा सल्ला दिला जातो. या तक्रारीचं रुपांतर लगेच एफआयआरमध्ये होतं. तसंच गुन्हा ज्या कार्यक्षेत्राक घडला आहे. त्या कार्यक्षेत्राच्या पोलीस स्टेशनला ही केस ताबडतोब वर्ग केली जाते. त्या पोलिसांना तसा संदेश लगेच जातो. त्यामुळे तुम्ही गमावलेले पैसे तुम्हाला परत मिळण्याची शक्यता वाढते.

हेहा वाचा...

  1. गुंतवणूक घोटाळे आहेत तरी काय, जाणून घ्या सायबर क्राईमच्या अनुषंगानं गुंतवणूक घोटाळ्याची ए टू झेड माहिती
  2. Cyber Menace डिजिटल फसवणूक; एक चिंताजनक सायबर धोका
  3. यूट्यूबवरील व्हिडिओ लाईक करण्याचं काम, टास्क पूर्ण करताच 55.35 लाखांची फसवणूक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.