ETV Bharat / international

लंडन महापौरपदाची शर्यत : सादिक खान यांना भारतीय वंशाच्या बँकरचं जोरदार आव्हान, जाणून घ्या तरुण गुलाटी यांच्याबद्दल - London Mayoral Poll

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 29, 2024, 12:38 PM IST

Updated : Apr 29, 2024, 12:54 PM IST

London Mayoral Poll
संग्रहित छायाचित्र

London Mayoral Poll : भारतीय वंशाचे बँकर तरुण गुलाटी यांनी लंडनच्या महापौरपदाच्या शर्यतीत मोठी आघाडी घेतली आहे. त्यांनी सादिक खान यांना तगडं आव्हान दिलं आहे.

लंडन London Mayoral Poll : लंडनच्या महापौरपदाची निवडणूक 2 मे रोजी होत आहे. या निवडणुकीत विद्यमान महापौर सादिक खान यांना दिल्लीतील तरुण उद्योजक तरुण गुलाटी यांनी आव्हान दिलं आहे. भारतीय वंशाच्या तरुण गुलाटी यांनी सादिक खान यांना आव्हान दिल्यानंतर ते प्रकाशझोतात आले आहेत. आपल्याला लंडन शहरातील कारभार अनुभवी सीईओसारखा करायचा आहे, असं त्यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट केलं.

गुलाटी यांनी घेतलं जयपूर आणि दिल्लीतून शिक्षण : भारतीय वंशाचे उद्योजक तरुण गुलाटी यांनी लंडनच्या महापौरपदाच्या शर्यतीत 13 उमेदवारांमध्ये आघाडी घेतली आहे. मात्र ट्रेंडनं सादिक खान यांना विजेता होणार असल्याचं दाखवलं. त्यांच्या महापौरपदाला सहजपणे गवसणी घालण्याचा वर्तवला गेलेला अंदाज भ्रामक असल्याचं स्पष्ट होतंय. आता गुलाटी यांच्याबद्दल. गुलाटी यांनी जयपूर विद्यापीठातून आपलं शिक्षण घेतलं आहे. त्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठातून एमबीए केलं. त्यानंतर त्यांनी 2006 मध्ये लंडनमध्ये एचएसबीसी या कंपनीची सूत्रं हाती घेतली. लंडनमध्ये बदली झाल्यानंतर त्यांनी यूकेमध्ये स्थायिक होण्याचा निर्णय घेतला.

दोन्ही उमेदवारांचे वडील भारतीय वंशाचे : लंडन महापौरपदाच्या निवडणुकीत दोन्ही भारतीय वंशाच्या उमेदवारांमध्ये तगडी फाईट आहे. सादिक खान आणि तरुण गुलाटी या दोन्ही उमेदवारांचे वडील भारतीय वंशाचे आहेत. प्रसारमाध्यमांशी बोलताना गुलाटी यांनी त्यांची अर्थशास्त्राची समज चांगली आहे. त्यामुळे महापौरपदाच्या शर्यतीत ते दावेदार ठरू शकतात, असं त्यांनी स्पष्ट केलं. सादिक खान यांनी सुरू केलेली वादग्रस्त ULEZ धोरण दूर करण्याचं त्यांनी वचन दिलं आहे. प्रदूषण करणाऱ्या वाहनांच्या चालकांकडून लंडनमध्ये वाहन चालवण्यासाठी दररोज 12.50 डॉलर (रु. 1,300) शुल्क आकारलं जाते. त्यामुळे सत्तेत आल्यानंतर ही योजना बंद करण्यात येईल, असं त्यांनी स्पष्ट केलं. त्यासह गृहनिर्माण बांधण्यासाठी विकासकांना प्रोत्साहन देण्यासाठी बांधिल असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं.

गाझासाठी मजबूत आवाज : तरुण गुलाटी यांना आता लंडनमध्ये चांगलाच प्रतिसाद वाढत आहे. याबाबत त्यांनी सांगितलं की, "मला मुस्लिमांसह आशियाई मतदारांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. गाझासाठी मी एक मजबूत आवाज आहे. त्यामुळे सर्वस्तरातील नागरिक आपल्याला पाठिंबा देत आहेत," असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

हेही वाचा :

  1. छत्रपती शिवरायांचा जयघोष इंग्लंडमध्ये! लंडनच्या आर्टीफिशिअल इंटिलिजन्स सेंटरमध्ये उभारणार शिवस्मारक
  2. सर्वपक्षीय 12 आमदार निघाले लंडन दौऱ्यावर; नेमकं कारण काय?
Last Updated :Apr 29, 2024, 12:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.