वॉशिंग्टन : जगात सर्वाधिक शक्तीशाली राष्ट्र असलेल्या अमेरिकेच्या अध्यक्षपदी कमला हॅरीस यांची निवड होणार की उजव्या विचारसरणीच्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'अमेरिका फर्स्ट" अजेंडाला मतदार साथ देणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी रिपब्लिकनचा बालेकिल्ला असलेला इंडियाना आणि कमला हॅरिस यांनी व्हरमाँटमध्ये विजय मिळविला आहे.
Live Updates
- निवडणुकीच्या निकालातील पहिल्या आकडेवारीनुसार डोनाल्ड ट्रम्प आघाडीवर राहिले आहेत. सकाळी सात वाजेपर्यंत, ओक्लाहोमा, मिसूरी, इंडियाना, केंटकी, टेनेसी, अलाबामा, फ्लोरिडा, वेस्ट व्हर्जिनिया, साउथ कॅरोलिना आणि आर्कान्सासमध्ये रिपब्लिकन आघाडीवर आहे. मेरीलँड, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलंबिया, मॅसॅच्युसेट्स, इलिनॉय आणि व्हरमाँटमध्ये डेमोक्रॅट्स आघाडीवर आहेत.
अमेरिकेचे 47 वे राष्ट्राध्यक्ष निवडण्यासाठी स्थानिक वेळेनुसार मंगळवारी सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत (भारतीय वेळेनुसार संध्याकाळी) मतदानाला सुरुवात झाली. कोट्यवधी अमेरिकन लोकांनी मतदानासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या. भारतीय वेळेनुसार ही मतदानप्रक्रिया बुधवारी सकाळी 9 वाजेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे. निवडणुकीत मतदान करण्यासाठी 16 कोटींहून अधिक लोकांनी नोंदणी केली. निवडणूक सर्वेक्षणानुसार पेनसिल्व्हेनिया, नॉर्थ कॅरोलिना आणि मिशिगनसारख्या महत्त्वाच्या राज्यांमध्येही ट्रम्प आणि हॅरीस यांच्यात अत्यंत अटीतटीची लढत आहे.
अमेरिकेच्या निवडणुकीचा जगावरही परिणाम- वॉशिंग्टन डीसी मधील यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष आणि सीईओ मुकेश अघी म्हणाले, " निवडणूक निकालांबद्दल लोकांमध्ये चिंता आणि अनिश्चिततेची भावना आहे. अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या निकालांचा केवळ अमेरिकेवरच तर जगावर परिणाम होईल. 50 टक्क्यांहून अधिक मतदारांनी आधीच मतदान केले आहे. याचा अर्थ उमेदवार कोण आहे, हे मतदारांनी निश्चित केलं आहे. महिला आणि अल्पसंख्याक मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडल्याचं दिसून आले."
#WATCH | Washington DC: On US elections, President & CEO of US-India Strategic Partnership Forum, Mukesh Aghi says, " there is a sense of anxiety and uncertainty as to the outcome of the result...the results of the elections will not only have an impact in the us but it will have… pic.twitter.com/JCaScDG7Xb
— ANI (@ANI) November 5, 2024
भारतावर काय परिणाम होईल? मुकेश अघी म्हणाले, " कमला हॅरिस या अमेरिकेच्या अध्यक्ष पदी निवडूणन आल्यास सध्याचे जो बायडेन यांचे धोरण कामय राहील. सध्या अमेरिका केवळ भारताकडं व्यापार नव्हे तर भौगोलिक, आर्थिक आणि अधिक व्यापक पातळीवर भागीदार देश म्हणून पाहते. अमेरिका एकटी चीनशी लढू शकत नाही. अमेरिकेला भारतासारख्या मित्रराष्ट्राची गरज आहे. ट्रम्प हे अमेरिकेचे अध्यक्ष झाल्यास भारतामधून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तूंवरील शुल्क वाढण्याची दाट शक्यता आहे. कारण, ट्रम्प यांचा दृष्टीकोन हा व्यहारीपणाचा आहे. त्यांनी पदभार स्वीकारल्यानंतर भारताबाबतच्या धोरणात खूप बदल होईल. विशेषत: आर्थिक धोरणात मोठे बदल झालेले दिसू शकतील."
ट्रम्प यांचा पराभव झाला तर हिंसाचाराची भीती- मतदान केंद्रांवर बॉम्ब ठेवण्याच्या धमक्या आल्यानं जॉर्जियातील काही मतदान केंद्रावर मतदानात व्यत्यय आला. या धमक्या रशियामधून देण्यात आल्याचं एफबीआय आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी सांगितलं. डोनाल्ड ट्रम्प यांचा 2020 च्या अध्यक्ष पदाच्या निवडणुकीत पराभव झाला होता. मात्र, त्यांनी पराभव मान्य केला नव्हता. त्यांच्या समर्थकांनी यूएस कॅपिटलवर हल्ला केला होता. यावेळीही ट्रम्प यांचा पराभव झाला तर त्यांचे समर्थक हिंसाचार करतील, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
हेही वाचा-