वॉशिंग्टन Who is Usha Chilukuri Vance : रिपब्लिकन पक्षानं पक्षानं राष्ट्रीय अधिवेशनात डोनाल्ड ट्रम्प यांची अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून अधिकृतपणे निवड करण्यात आली. ट्रम्प अधिकृतपणे अध्यक्षपदाच्या शर्यतीत सामील झाले आहेत. त्यांनी ओहायोचे खासदार जेडी व्हॅन्स यांची उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून निवड केलीय. अशा प्रकारे या वर्षी नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्प आणि व्हॅन्स यांची डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारांशी स्पर्धा होईल.
- जेडी व्हॅन्स हे ट्रम्प यांचे टीकाकार असल्यामुळं त्यांना उपराष्ट्रपती बनवण्याचा निर्णय खूपच आश्चर्यकारक होता. व्हॅन्स यांचं भारताशी अत्यंत जवळचे नाते आहे. त्यांचा विवाह मूळ भारतीय वंशाच्या असलेल्या उषा चिलुकुरीशी यांचा विवाह झाला.
कोण आहेत उषा व्हॅन्स? : लेखक, तत्कालीन रिपब्लिकन सिनेटर आणि आता उपराष्ट्रपती पदाचे उमेदवार जेडी व्हॅन्स यांच्या संपूर्ण प्रवासात त्यांना पत्नी उषा चिलुकुरी व्हॅन्सची साथ लाभली. उषा चिलुकुरी या हिंदू धर्मीय आहेत. तर त्यांचे पती जेडी व्हॅन्स हे रोमन कॅथलिक आहेत. भारतीय वंशाच्या उषा चिलुकुरी यांचे बालपण सॅन दिएगो शहरात गेले. कॉलेजनंतर त्यांनी येल येथून कायद्याची पदवी घेतली. त्यांनी केंब्रिज विद्यापीठातून तत्त्वज्ञानात पदव्युत्तर शिक्षण घेतलं.
येले लॉ स्कूलमध्येच झाली भेट- उषा आणि जेडी व्हॅन्स यांची पहिली भेट येले लॉ स्कूलमध्येच झाली होती. येलेमधून लॉ ग्रॅज्युएट झाल्यानंतर सुमारे एक वर्षानंतर दोघांनी 2014 मध्ये लग्न केलं. हे लग्न अमेरिकेतील केंटकी राज्यात हिंदू परंपरेनूसार पार पडलं. उषा आणि जेडी व्हॅन्स यांना तीन मुलं आहेत. त्यापैकी दोन मुलांचे नाव इवान आणि विवेक आहे, तर मुलीचं नाव मीराबेल आहे. काही आठवड्यांपूर्वीपर्यंत उषा चिलुकुरी व्हॅन्स या वकील आणि न्यायिक लिपिक म्हणून काम करत होत्या. तसंच त्या मुंगेर टोल नावाच्या कंपनीशीही संबंधित होत्या. मात्र, आता सर्व काम सोडून त्यांनी पतीच्या निवडणूक प्रचारात स्वत:ला झोकून दिलं आहे.
हेही वाचा -
- अमेरिकेत 'या' कारणामुळं झाल्या राष्ट्राध्यक्षांच्या हत्या, वाचा अब्राहम लिंकन, जॉन एफ केनेडी, जेम्स गारफिल्ड यांच्या हत्येची कारणं - Firing On Donald Trump
- 20 वर्षीय तरुणानं डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झाडल्या गोळ्या; सीक्रेट सर्व्हिसनं केलं ठार, 52 वर्षापूर्वी.... - Donald Trump Rally Firing
- डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार झाल्यानं पंतप्रधानांसह राहुल गांधींनी व्यक्त केला निषेध, वाचा काय म्हणाले? - Donald Trump News