Donald Trump News : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे शनिवारी बटलर, पेनसिल्व्हेनिया येथे आयोजित रॅलीदरम्यान समर्थकांना संबोधित होते. यावेळी अचानक अज्ञात व्यक्तीनं गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडलीय. रॅलीदरम्यान अचानक बंदुकीच्या गोळ्यांचा आवाज आल्यानं डोनाल्ड ट्रम्प यांना यूएस सिक्रेट सर्व्हिस एजंट्नं तत्काळ मंचावरून बाहेर नेलं. यूएस सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी यांनी सांगितलं की, "ट्रम्प सुरक्षित आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी उपाययोजना लागू करण्यात आल्या आहेत. ट्रम्प यांना मंचावरून खाली नेल्यानंतर लगेचच पोलिसांनी रॅलीचे मैदान रिकामं केलं."
#WATCH | Gunfire at Donald Trump's rally in Butler, Pennsylvania (USA). He was escorted to a vehicle by the US Secret Service
— ANI (@ANI) July 13, 2024
" the former president is safe and further information will be released when available' says the us secret service.
(source - reuters) pic.twitter.com/289Z7ZzxpX
डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित : यूएस सिक्रेट सर्व्हिसचे प्रवक्ते अँथनी गुग्लिएल्मी एक्सवर एका पोस्टमध्ये लिहिलं की, "पेनसिल्व्हेनियामध्ये ट्रंप यांच्या रॅलीमध्ये 13 जुलै रोजी संध्याकाळी एक घटना घडली. सिक्रेट सर्व्हिसने संरक्षणात्मक उपाय लागू केले आहेत. माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प सुरक्षित आहेत."
I have been briefed on the shooting at Donald Trump’s rally in Pennsylvania.
— President Biden (@POTUS) July 13, 2024
I’m grateful to hear that he’s safe and doing well. I’m praying for him and his family and for all those who were at the rally, as we await further information.
Jill and I are grateful to the Secret…
पंतप्रधान मोदींकडून घटनेचा निषेध : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत चिंता व्यक्त केली आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, "माझे मित्र, माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर झालेल्या हल्ल्याबद्दल मी खूप चिंतेत आहे. या घटनेचा मी तीव्र निषेध करतो. राजकारण आणि लोकशाहीत हिंसेला स्थान नाही. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो."
I fully endorse President Trump and hope for his rapid recovery pic.twitter.com/ZdxkF63EqF
— Elon Musk (@elonmusk) July 13, 2024
अमेरिकेत हिंसाचाराला स्थान नाही : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी या घटनेबाबत एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटलं की, "पेनसिल्व्हेनियामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या रॅलीत गोळीबार झाल्याची माहिती मिळाली आहे. ते पूर्णपणे बरे आहेत. ट्रम्प आणि त्यांच्या रॅलीत सहभागी झालेल्या प्रत्येकासाठी मी प्रार्थना करत आहे. आम्ही या घटनेबाबत अधिक माहितीची वाट पाहत आहोत. ट्रम्प यांना सुरक्षित ठेवल्याबद्दल मी सिक्रेट सर्व्हिसचे आभार मानतो. अशा प्रकारच्या हिंसाचाराला अमेरिकेत स्थान नाही. एक देश म्हणून आपण पूर्णपणे एकत्र आहोत. या घटनेचा मी निषेध करतो आणि खेद व्यक्त करतो."
I fully endorse President Trump and hope for his rapid recovery pic.twitter.com/ZdxkF63EqF
— Elon Musk (@elonmusk) July 13, 2024
- अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची प्रतिक्रिया : अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी एक्सवर पोस्ट केलं की, "आपल्या लोकशाहीत हिंसाचाराला जागा नाही. ते लवकरात लवकर बरे होण्यासाठी मी प्रार्थना करतो." टेस्लाचे सीईओ एलॉल मस्क यांनी ही घटना घडल्यानंतर ट्रम्प यांना लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना केलीय. मस्क यांनी एक्सवर या घटनेचा व्हिडिओ शेअर करत लिहिलं, "मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचं पूर्ण समर्थन करतो. ते लवकरात लवकर बरे होतील."
Deeply concerned by the attack on my friend, former President Donald Trump. Strongly condemn the incident. Violence has no place in politics and democracies. Wish him speedy recovery.
— Narendra Modi (@narendramodi) July 14, 2024
Our thoughts and prayers are with the family of the deceased, those injured and the American…
- डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानातून रक्तस्त्राव होताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये ट्रम्प यांच्या उजव्या कानाला आणि चेहऱ्याच्या उजव्या बाजूला रक्त दिसत आहे. मात्र, या संदर्भात अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.
There is absolutely no place for political violence in our democracy. Although we don’t yet know exactly what happened, we should all be relieved that former President Trump wasn’t seriously hurt, and use this moment to recommit ourselves to civility and respect in our politics.…
— Barack Obama (@BarackObama) July 13, 2024
हेही वाचा
- गाझामध्ये नरसंहार : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 71 जण ठार; 289 हून अधिक जखमी - airstrikes on Gaza
- नेपाळमध्ये 'प्रचंड' सरकार पडलं, विश्वासदर्शक ठराव गमावल्यानंतर पुष्प कमल दहल यांचा पंतप्रधानपदाचा राजीनामा - Nepal Prime Minister resigns
- नेपाळमध्ये भूस्खलन; 63 प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या 2 बस गेल्या नदीत वाहून, शोध कार्य सुरु - Nepal Landslide