मॉस्को Pm Modi Russia Visit : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सोमवारी दोन दिवशीय रशिया भेटीवर गेले आहेत. यावेळी त्यांचे मित्र तथा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी सोमवारी रात्री नोवो-ओगार्योवो इथल्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांच्या जीगरी दोस्ताला मिठी मारत आनंद व्यक्त केला. यावेळी राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी मित्रासाठी इलेक्ट्रीक कार चालवत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं जोरदार स्वागत केलं. नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांचं अभिनंदन केलं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मित्राकडून जंगी स्वागत : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री रशियाला भेट दिली. यावेळी रशियाचे राष्ट्राध्यक्ष आणि त्यांचे मित्र व्लादिमीर पुतीन यांनी नोवो-ओगार्योवो इथल्या निवासस्थानी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहताच राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी त्यांना कडकडून मीठी मारली आणि तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यामुळे शुभेच्छा दिल्या. राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन इलेक्ट्रीक कार चालवत त्यांना निवास्थानापर्यंत नेलं. यावेळी व्लादिमीर पुतीन यांनी, "पंतप्रधानपदी तुमची तिसऱ्यांदा निवड झाली, त्याबद्दल अभिनंदन. हा तुमच्या अनेक वर्षांच्या कार्याचा परिणाम आहे," असं स्पष्ट केलं.
भारत आणि रशिया संबंध होणार दृढ : रशिया हा भारताचा सर्वात चांगला मित्र आहे, असं समजलं जाते. भारताचे रशियासोबत अत्यंत चांगले व्यावसायिक संबंध आहेत. संरक्षण क्षेत्रात भारतानं रशियाकडून अनेक करार केले आहेत. त्यामुळे रशियासोबत दीर्घकाळचे असलेले चांगले संबंध पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या भेटीनं आणखी दृढ होणार आहेत. रशियानं युक्रेनमध्ये आपली मोहीम सुरू केल्यानंतर भारतानं तटस्थ भूमिका घेत अप्रत्यक्षपणे रशियाची पाठराखणच केली. पंतप्रधान म्हणून सत्तेत परतल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा पहिला दौरा आहे.
हेही वाचा :
- पंतप्रधान नरेंद्र मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या दौऱ्यासाठी रवाना; 'असा' असेल दौरा - MODI on RUSSIA AUSTRIA TOUR
- "भारताच्या हिताचा प्रश्न असेल तर मोदींना घाबरवता किंवा धमकावता येत नाही", पुतिन यांची स्तुतिसुमनं
- Palestinian Israeli Conflict : हमास-इस्रायल युद्धात रशियाची उडी; स्वतंत्र पॅलेस्टाईन राज्याची व्लादिमीर पुतीन यांची मागणी