ETV Bharat / politics

पोस्टरवर मोदींच्या फोटोची गरज नाही; निवडणुकीत केवळ विजय महत्त्वाचा, भाजपा प्रवक्त्याची स्पष्टोक्ती - MAHARASHTRA ASSEMBLY ELECTION 2024

विधानसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे. राज्यात 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे तर 23 नोव्हेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार आहे.

BJP Shivray Kulkarni
शिवराय कुळकर्णी (ETV Bharat Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 14, 2024, 7:52 PM IST

अमरावती : अमरावती विधानसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी वापरल्या जाणाऱ्या विशिष्ट भागातील पोस्टरवर भाजपाच्या नेत्यांचे फोटो नाहीत. याबाबत प्रश्न उपस्थित होत असताना, या संदर्भात स्पष्टीकरण देताना भाजपा प्रदेश प्रवक्ते शिवराय कुळकर्णी यांनी स्पष्टीकरण दिलं. "प्रत्येकालाच एखादा पक्ष किंवा एखाद्या पक्षाचं धोरणं आवडतं असं नाही. एखादा उमेदवार मात्र मतदारांना हवा असतो. यामुळं अमरावतीत महायुतीच्या उमेदवाराच्या पोस्टरवर मोदींच्या फोटोची गरज नाही. निवडणुकीत केवळ विजय महत्त्वाचा आहे", असं शिवराय कुळकर्णी म्हणाले.

भाजपाच्या माजी मंत्र्यांनी घेतली काँग्रेसकडून सुपारी : विधानसभा निवडणुकीत भाजपासोबत बंडखोरी करून निवडणूक रिंगणात असणारे, माजी मंत्री जगदीश गुप्ता यांनी अमरावतीत महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी काँग्रेसकडून सुपारी घेतली असल्याचा आरोप, शिवराय कुळकर्णी यांनी केलाय. काँग्रेसच्या अधिकृत फेसबुक पेजवर काँग्रेसच्या उमेदवाराची लढत ही अपक्ष उमेदवार जगदीश गुप्ता यांच्यासोबत आहे अशी पोस्ट व्हायरल केली जात आहे. तमाम अमरावतीकरांना काँग्रेसची लढत ही महायुतीच्या उमेदवार सुलभा खोडके यांच्यासोबत असल्याचं माहीत आहे. काँग्रेसकडून जो काही प्रचार केला जात आहे त्यावरून जगदीश गुप्ता यांनी काँग्रेसकडून सुपारी घेतली असल्याचं स्पष्ट होतं असं, देखील शिवराय कुळकर्णी म्हणाले.

प्रतिक्रिया देताना शिवराय कुळकर्णी (ETV Bharat Reporter)

जगदीश गुप्तांची माफी मागणार नाही : जगदीश गुप्ता हे 1990 आणि 1995 मध्ये अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपाचे उमेदवार म्हणून निवडून आले. यानंतर 2004 पर्यंत ते विधान परिषदेत होते. 2009 च्या विधानसभा निवडणुकीत जगदीश गुप्ता यांनी अमरावती विधानसभा मतदारसंघात भाजपाचे अधिकृत उमेदवार डॉ. प्रदीप शिंगोरे यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार रावसाहेब शेखावत यांच्यासाठी काम केलं. विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत डॉ. रणजीत पाटील यांच्याविरोधात जगदीश गुप्ता यांनी काम केलं. आज जगदीश गुप्ता हे काँग्रेसची सुपारी घेऊन महायुतीच्या विरुद्ध काम करत असल्याचा आरोप, शिवराय कुळकर्णी यांनी दोनवेळा पत्रकार परिषद घेऊन केला. या सर्व आरोपांचं खंडन करत जगदीश गुप्ता यांनी शिवराय कुळकर्णी यांना मानहानीच्या दाव्याची नोटीस पाठवली. यावर "जगदीश गुप्ता यांची मी माफी मागणार नाही माझ्या वक्तव्यावर मी ठाम आहे" असं शिवराय कुळकर्णी यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं. शिवराय कुलकर्णी यांच्या भूमिकेला अमरावती शहर भाजपाचा पूर्ण पाठिंबा आहे असं भाजपाचे शहर अध्यक्ष प्रवीण पोटे यावेळी म्हणाले.

दर्यापूरमध्ये भाजपा कोणासोबत? : दर्यापूर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार अभिजीत अडसूळ यांच्याविरुद्ध भाजपातून बाहेर पडलेले माजी आमदार अरुण बुंदीले हे रवी राणा यांच्या युवा स्वाभिमान पार्टीचे उमेदवार आहेत. त्यांच्या प्रचाराच्या पोस्टरवर भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल बोंडे यांचे फोटो आहेत. या संदर्भात शिवराय कुलकर्णी यांनी डॉ. अनिल बोंडे हेच याबाबत उत्तर देऊ शकतात. आम्ही मात्र अभिजीत अडसूळ यांच्यासोबतच आहोत. अभिजीत अडसूळ हे देखील याबाबत स्पष्ट सांगू शकतील असं शिवराय कुळकर्णी म्हणाले.

गुजरातचे मंत्री करणार अमरावतीची रिपोर्टिंग : अमरावती जिल्ह्यात एकूण पाच ठिकाणी भाजपाचे अधिकृत उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. जिल्ह्यात ज्या मतदारसंघांमध्ये जो कोणी भाजपाच्या आणि महायुतीच्या उमेदवारांविरुद्ध काम करत असेल याची दखल घेण्यासाठी गुजरातचे मंत्री ऋषिकेश पटेल आणि मध्य प्रदेशमध्ये निवडणुकीत विजयाची महत्त्वाची भूमिका साकारणारे हितानंद शर्मा हे अमरावतीत आहेत. या ठिकाणी आम्ही नेमकं काय काम करतो आहोत या संदर्भात हे दोन नेते वरिष्ठ स्तरावर संपूर्ण रिपोर्टिंग करत आहेत. आमच्या कामावर देखील त्यांचं लक्ष असल्याचं शिवराय कुळकर्णी यांनी सांगितलं.

हेही वाचा -

  1. मराठवाड्यात विकासाची गंगा आणणार, काश्मीरमध्ये वेगळं संविधान आणण्याचा काँग्रेसचा प्रयत्न - पंतप्रधान नरेंद्र मोदी
  2. नवाब मलिकांना उच्च न्यायालयाचा दिलासा, जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास नकार
  3. विद्यमान आमदाराची उद्धव अन् राज ठाकरेंबरोबर गद्दारी, नसीम खान यांचा दिलीप लांडेंवर हल्लाबोल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.