ETV Bharat / international

अफगाणिस्तानात भारताचं विमान कोसळल्याचा तालिबानचा दावा, डीजीसीएनं दिली महत्त्वाची माहिती

अफगाणिस्तानच्या बदख्शान भागात भारताचं प्रवासी विमान कोसळल्याचा दावा तालिबान सरकारनं केला. मात्र, अपघातग्रस्त विमान भारताचा नसल्याचं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहं.

India Plane crash
फाईल फोटो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jan 21, 2024, 1:30 PM IST

Updated : Jan 21, 2024, 1:59 PM IST

अफगाणिस्तान : बदख्शान भागात प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळल्याची माहिती समोर आलीय. अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार विमान ज्या दिशेला जात होते, त्या मार्गावरून ते दुसऱ्या मार्गावर गेल्यानं हा अपघात झाला. अफगाणिस्तानच्या बदख्शानमधील झेबाक जिल्ह्याच्या पर्वतीय डोंगरावर विमान कोसळले. प्राथमिक माहितीनुसार, ते प्रवासी जेट विमान टॉप खानाच्या डोंगराळ भागात झेबाक जिल्ह्यांत कोसळलं. तेथील सुरक्षा अधिकार्‍यांच्या दाव्यानुसार विमान आणि त्यातील प्रवाशांची संख्या अद्याप निश्चित सांगता येणार नाही.

तालिबान सरकारच्या माहितीनुसार आज सकाळी विमान अपघात झाला आहे. अपघाताबाबत तालिबान सरकारकडून चौकशी करण्यात येत आहे. भारतीय विमानाचा मॉस्कोला जाताना अपघात झाल्याचं अफगाणिस्तानच्या स्थानिक माध्यमानं म्हटलं आहे. मॉस्कोला जाताना विमान कोसळून ही दुर्घटना घडली आहे. मात्र, हे विमान भारतीय नसल्याचं डीजीसीएनं म्हटलं आहे. डीजीसीएनं म्हटलं की, मॉस्कोला जाणारे भारतीय विमान त्या मार्गावरून जात नाही. अपघातग्रस्त विमान हे मोरोक्को देशात नोंदणीकृत केलेलं छोटे विमान आहे.

  • The crashed aircraft is a DF-10 (Dassault Falcon) small aircraft registered in Morocco. It is not an aircraft of Indian carriers. The aircraft was an air ambulance and was flying from Thailand to Moscow and did refuelling at Gaya Airport: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/hGAwXBI5mb

    — ANI (@ANI) January 21, 2024 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

तीन देशांच्या सीमेजवळ आहे बदख्शान- माहिती आणि सांस्कृतिक विभागाचे प्रमुख जबिहुल्लाह अमीरी यांनी विमान अपघाताबाबत माहिती दिल्याचं अफगाणिस्तानमधील स्थानिक माध्यमांनी म्हटलं आहे. अमीरी यांनी म्हटलं की, एक प्रवासी विमान बदख्शान प्रांतातील कुरान-मुंजन आणि जिबाक जिल्ह्यांतील पर्वतांमध्ये कोसळलं तालिबान सरकारमधील अधिकाऱ्याच्या माहितीनुसार विमान डोंगराळ भागात कोसळलयं. बदख्शान प्रांत हा चीन, ताजिकिस्तान आणि पाकिस्तानच्या सीमेला लागून आहे. याच भागात विमान कोसळलं आहेत. मात्र, अपघाताचं नेमकं ठिकाण माहिती नाही.

गया विमानतळावर उतरलं होतं विमान- डीजीसीएच्या अधिकाऱ्यानं सांगितलं की, एअर ट्रॅफिक कंट्रोल आणि इतर एव्हिएशन संस्थांकडून अफगाणिस्तानमधील अपघाताबाबत माहिती मिळाली. मात्र, ते विमान भारतीय नसून मोरोक्कनमध्ये नोंदणीकृत झालेलं DF-10 विमान आहे. अपघातग्रस्त विमान हे एअर अॅम्ब्युलन्स होती. हे विमान थायलंडहून मॉस्कोला जात होते. भारतात गया विमानतळावरून या विमानात इंधन भरण्यात आलं होतं. रशियन एव्हिएशन ऑथॉरिटीच्या दाव्यानुसार विमानात सहा जण होते. शनिवारी संध्याकाळी अफगाणिस्तानच्या रडार स्क्रीनवरून विमान अचानक गायब झाले. हे विमान फ्रेंच बनावटीचे डसॉल्ट फाल्कन कंपनीचं होते.

हेही वाचा-

Last Updated : Jan 21, 2024, 1:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.