ETV Bharat / international

गाझामध्ये नरसंहार : इस्रायलच्या हवाई हल्ल्यात 71 जण ठार; 289 हून अधिक जखमी - airstrikes on Gaza - AIRSTRIKES ON GAZA

Israel Air Strike on Gaza : इस्रायलनं हमासच्या दहशतवाद्याला लक्ष्य करत गाझावर मोठा हवाई हल्ला केला आहे. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, या हल्ल्यात किमान 71 लोक ठार झाले असून 289 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

Israel Air Strike on Gaza
गाझावर इस्रायलचा हवाई हल्ला (File Photo)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 13, 2024, 9:46 PM IST

खान युनिस (गाझा पट्टी) Israel Air Strike on Gaza : इस्रायलनं गाझावर हवाई हल्ला केला आहे. इस्रायलच्या हवाई हल्यात 71 जण ठार झाले आहेत. तसंच 289 हून अधिक नागरिक जखमी झाले. हमास संचालित गाझा सरकारनं या हल्ल्याचं वर्णन "संहार" म्हणून केलं आहे. तसंच मृतांमध्ये नागरी आपत्कालीन सेवांच्या सदस्यांचा समावेश असल्याचं गाझा सरकारनं म्हटलं आहे. गाझा सुरक्षा अधिकारी तसंच इस्रायली लष्करी रेडिओनं सांगितलं की, शनिवारी इस्रायलनं हमासचे लष्कर प्रमुख मोहम्मद डेफ यांना लक्ष्य केलं. गाझा एन्क्लेव्हच्या आरोग्य मंत्रालयानं सांगितले की या हल्ल्यात किमान 71 पॅलेस्टिनी ठार झाले आहेत.

आपत्कालीन सेवांचे 100 हून अधिक नागरिक ठार : गाझावरील इस्रायल एअर स्ट्राइक हल्ल्यात नागरी आपत्कालीन सेवांचे 100 हून अधिक सदस्य ठार झाले आहेत, असं हमास संचालित गाझा सरकारी मीडिया कार्यालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. तर, हमासचे लष्कर प्रमुख मोहम्मद डेफला इस्रायलनं लक्ष्य केल्याचंही इस्रायली लष्करानं म्हटलं आहे. या हल्ल्यात हमासचा आणखी एक प्रमुख अधिकारी राफा सलामा यांनाही लक्ष्य करण्यात आलं, असं गाझातील माध्यमांचा दावा आहे. दक्षिण इस्रायलमध्ये 7 ऑक्टोबर 2023 रोजी झालेल्या हल्ल्यामागील सूत्रधार तसंच इस्रायल-हमास युद्धाचा सूत्रधार मोहम्मद देईफ अनेक वर्षांपासून इस्रायलच्या मोस्ट वॉन्टेड यादीत होता. आज, इस्रायलनं हल्ला केला आहे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, अनेक जखमी नागरिकांसह मृतांना जवळच्या नसेर रुग्णालयात नेण्यात आलं आहे.

हमास दहशतवाद्यावर हल्ला : आर्मी रेडिओनं सांगितलं की, डेफ आणि सलामा या भागातील विस्थापित लोकांच्या तंबूजवळील इमारतीत दहशतवादी लपले होते. सुरक्षा अधिकाऱ्यांचा हवाला देऊन आर्मी रेडिओनं सांगितले की, आयडीएफला या हल्ल्यात डझनभर लोक मारले जातील असा अंदाज होता, तरीही हवाई हल्ला केला. तथापि, नंतर असे सांगण्यात आलं की हल्ल्यात ठार झालेले डझनभर लोक सक्रिय हमास दहशतवादी होते. जे देईफच्या सुरक्षेसाठी काम करत होते.

नसंहारावर जगाचं मौन : हमासच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं मोहम्मद देईफला लक्ष्य करून केलेल्या हल्ल्याचं वर्णन मूर्खपणाचं असल्याचं म्हटलं आहे. अबू जुहरी म्हणाले, 'मारले गेलेले सर्व नागरिक आहेत. जे काही घडलं, ते अमेरिकेच्या समर्थनामुळं होत आहे. यावर जगाचं मौन आहे. इस्रायलला युद्धविराम करारात स्वारस्य नसल्याचं या हल्ल्यावरून दिसून येते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.