ETV Bharat / international

बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू - बांगलादेशची राजधानी ढाका

Major Fire in Dhaka : बांगलादेशची राजधानी ढाक्यातील बेली रोडवर असलेल्या एका सात मजली इमारतीला भीषण आग लागली. या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झालाय. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

बांगलादेशच्या राजधानीत सात मजली इमारतीत अग्नितांडव; 44 जणांचा होरपळून मृत्यू

author img

By PTI

Published : Mar 1, 2024, 7:34 AM IST

Updated : Mar 1, 2024, 7:48 AM IST

ढाका Major Fire in Dhaka : शेजारील राष्ट्र बांगलादेशची राजधानी ढाका येथील सात मजली इमारतीला भीषण आग लागलीय. या आगीत आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू झालाय, तर 22 जण जखमी झाले आहेत. तसंच यातील जखमींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वृत्तसंस्थेला देण्यात आली आहे.

अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी : ढाका शहरातील एका सात मजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील रेस्टॉरंटमध्ये गुरुवारी रात्री ही आग लागली. यानंतर काही वेळातच ही आग इमारतीच्या वरच्या मजल्यापर्यंत पसरु लागली. एका अधिकाऱ्यानं सांगितलं की, "या आगीमुळं इमारतीत 75 लोक अडकले होते. त्यापैकी 42 बेशुद्ध झाले होते. या लोकांना इमारतीबाहेर काढण्यात आलं. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 13 गाड्या घटनास्थळी हजर आहेत, असंही या अधिकाऱ्यानं सांगितल्याचं वृत्त वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

आतापर्यंत 44 जणांचा मृत्यू : याप्रकरणी आरोग्य मंत्री डॉ सामंत लाल सेन यांनी सांगितलं की, "ढाका मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये 33 लोकांचा मृत्यू झाला तर जवळच्या शेख हसीना नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बर्न आणि प्लास्टिक सर्जरी हॉस्पिटलमध्ये 10 लोकांचा मृत्यू झाला. दोन्ही रुग्णालयांमध्ये 21 जणांवर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे," असं त्यांनी सांगितलं. मात्र, जे यातून बचावले आहेत, त्यांच्या श्वसननलिकेला मोठी इजा झालीय. त्याचबरोबर अनेक मृतदेह इतके जळाले आहेत की, त्यांची ओळख पटवणं कठीण असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे. यातील मृतांचा आकडा वाढण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.

पीडितांनी सांगितली आपबीती : "इमारतीच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्यानं लोक घाबरले आणि वरच्या मजल्याकडे धावले," असं प्रत्यक्षदर्शींचं म्हणणं आहे. नंतर अग्निशमन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी शिडीचा वापर करुन इमारतीच्या वरच्या मजल्यावरुन अनेकांना सुरक्षितपणे बाहेर काढलं. आग लागल्यानंतर काहींनी जीव वाचवण्यासाठी इमारतीवरुन उडी मारली. तर काहींना इमारतीच्या काचा फोडून खाली उडी मारावी लागल्याचं काही लोकांचं म्हणणं आहे.

हेही वाचा :

  1. आझाद नगर झोपडपट्टीला भीषण आग; अनेक घरं जळून खाक, एकाचा मृत्यू
  2. मुंबईत कामाठीपुरा परिसरातील रेस्टॉरंटमध्ये मध्यरात्री अग्नितांडव; एकाचा मृत्यू, अग्निशमन दलाच्या 16 गाड्या घटनास्थळी दाखल
  3. मुंबईतील आदर्श नगर झोपडपट्टीत भीषण आग, 10 ते 15 घरं जळून खाक

Last Updated : Mar 1, 2024, 7:48 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.