ETV Bharat / international

लेबनॉनसह सीरियात पेजरचे शेकडो स्फोट; 8 जणांचा मृत्यू, दहशतवाद्यांवरील हल्ल्यामागे इस्त्रायलचा हात? - lebanon pager blast

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 18, 2024, 7:33 AM IST

Lebanon Pager Blast लेबनॉनमध्ये एकाच वेळी शेकडो पेजरचा स्फोट झाल्यानं मंगळवारी आठ जणांचा मृत्यू झाला. तर 2,700 हून अधिक जखमी झाले. जखमी आणि मृतांमधील बहुतेक हे हिजबुल्लाह संघटनेचे सदस्य होते. जखमींपैकी सुमारे 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे.

lebanon pager blast
लेबनॉन स्फोट (Source- AP)

बेरुत Lebanon Pager Blast - लेबनॉनमध्ये स्थानिक वेळेनुसार दुपारी 3:30 वाजता हिजबुल्लाह दहशतवाद्यांजवळ असलेले पेजर अचानक गरम होऊ लागले. काही कळण्यापूर्वी दहशतवाद्यांच्या खिशात आणि हातात असलेल्या पेजरचे स्फोट झाले. लेबनॉनचे आरोग्य मंत्री फिरास अबेद यांनी स्फोटाबाबत पुष्टी केली. स्फोटांमध्ये 2,750 लोक जखमी असून 200 जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची त्यांनी माहिती दिली.

लेबनॉनच्या एका वृत्तवाहिनीनं स्फोटामागे इस्त्रायलच्या सैन्यदलाचा हात असल्याचा आरोप केला. इस्त्रायलच्या सैन्यदलाकडून पेजर्सच्या बॅटरीला लक्ष्य करून स्फोट घडवून आणल्याचा आरोप करण्यात आला. स्फोटामधील जखमींना लेबनॉनची राजधानी बेरुत आणि दक्षिणेकडील उपनगरातील दहीह येथील रुग्णालयात नेण्यात आले. पेजर बॉम्बस्फोटात मृतांमध्ये हिजबुल्लाहाच्या महत्त्वाचा नेत्याचा समावेश असल्याचा एका माध्यमाकडून दावा करण्यात आला. हिजबुल्लाह या दहशतवादी गटाकडून पेजरचा वापर करण्यात येतो. याच पेजरचा स्फोट झाल्याने हिजबुल्लाह संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

हिजबुल्लाह संघटनेला मोठा धक्का- जखमींमध्ये लेबनॉनमधील इराणच्या राजदूताचाही समावेश आहे. गाझापट्ट्यात सुरू असलेल्या संघर्षानंतर इस्रायल आणि इराणचा पाठिंबा हिजबुल्लाह यांच्यात तणावाची स्थिती आहे. अशातच हिजबुल्लाह या दहशतवादी संघटनेवर हल्ला झाल्यानं संशयाची सुई आता इस्त्रायलकडं वळली आहे. अचानक झालेल्या स्फोटामागे नेमके काय कारण आहे, याचा तपास हिजबुल्लाहची सुरक्षा एजन्सी करत आहेत. हिजबुल्लाह या दहशतवादी गटाकडून पेजरचा वापर करण्यात येतो. याच पेजरचा स्फोट झाल्याने हिजबुल्लाह संघटनेला मोठा धक्का बसला आहे.

संशयाची सुई इस्त्रायलकडं-यापूर्वी हमासने 7 ऑक्टोबरच्या हल्ल्यानंतर इस्रायल-लेबनॉन सीमेवर गोळीबार करून जोरदार प्रत्युत्तर दिले होते. विशेष म्हणजे इस्त्रायलाच्या सुरक्षा यंत्रणेकडून हल्ला होऊ शकतो, या भीतीने दहशतवाद्यांकडून मोबाईलचा वापर थांबविण्यात आला होता. त्यानंतर दहशतवाद्यांकडून नव्या कंपनीच्या पेजरचा वापर करण्यात आला. पण, येथेच त्यांचा घात झाला. लेबनॉनमधील स्फोटांबाबत इस्रायलच्या सैन्यदलाकडून कोणतेही अधिकृत वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही. मात्र, इस्त्रायलची हमास ही गुप्तचर संघटना पुन्हा चर्चेत आली आहे. कारण, ही संघटना शत्रुंना संपविण्यासाठी अनेकदा अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरते.

हेही वाचा-

  1. हिजबुल्लाहनं इस्रायलवर डागले 320 रॉकेट; इस्रायलमध्ये आणीबाणी जाहीर - Hezbollah Fired Rockets At Israel
  2. इस्रायलचे शत्रूला टिपून मारण्याचे धोरण : भविष्यात काय वाढून ठेवलंय? - Targeted Killings of Israel

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.