ETV Bharat / international

भारतीय वंशाच्या कमला हॅरिस अमेरिकेच्या नव्या अध्यक्ष होणार? निवडणुकीतून माघार घेताच जो बायडेन यांचा पाठिंबा - US PRESIDENTIAL ELECTION - US PRESIDENTIAL ELECTION

US Presidential Election : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून बाजूला होत असल्याचं स्पष्ट केलंय. त्यांच्या पक्षाचे नेते आणि समर्थकांकडून जो बायडेन यांनी उमेदवारी मागे घेण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी ही घोषणा केलीय. त्यांनी माघार घेतल्यानंतर आता बायडेन यांच्या जागी डेमोक्रॅट पक्षाचा उमेदवार कोण असेल? याकडं आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

Joe Biden Nominates Kamala Harris As Democratic Party New Nominee
भारतीय वंशाच्या कमला हॅरिस डेमोक्रॅटच्या उमेदवार (AP)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 7:38 AM IST

डेलावेर US Presidential Election : अमेरिकेचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून माघार घेतली आहे. हा निर्णय घेतांना, अमेरिका आणि माझा पक्ष यांच्या हिताच्या दृष्टीनं मी हा निर्णय घेतला असल्याचं बायडेन यांनी स्पष्ट केलंय. तसंच जो बायडेन यांनी उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांना डेमोक्रॅटिक पक्षाच्या नव्या उमेदवार म्हणून पाठिंबाही दर्शवलाय.

काही दिवसांपूर्वी जो बायडेन यांना कोरोना संसर्ग झाला होता. या संसर्गामुळं त्यांना श्वसनाचा त्रासही सुरू झाला होता. तसंच गेल्या काही महिन्यात झालेल्या सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये त्यांना विस्मरण झाल्याचंही बघायला मिळालं. तर मागील काही दिवसांपासून डेमोक्रॅट्स पक्षातूनदेखील बायडेन यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घ्यावी, असे प्रयत्न सुरू होते. या सगळ्यांची परिणती म्हणून जो बायडेन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेतली.

एक्सवर पोस्ट करत मांडली भूमिका : जो बायडेन यांनी सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी बायडेन यांनी उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचं आभारही मानले. " कमला हॅरिस या एक सक्षम सहकारी आहेत," अशा शब्दात त्यांनी हॅरिस यांच्या कामाचं कौतुक केलं. "मी पुन्हा राष्ट्राध्यक्षपदी निवडून यावं यासाठी असंख्य लोकांनी प्रयत्न केले. त्या सगळ्यांबद्दल मी कृतज्ञता व्यक्त करतो. उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचंही मी आभार मानू इच्छितो. त्यांनी मला खंबीरपणे साथ दिली. तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवून पाठिंबा दिलात. त्यासाठी मनापासून आभार मानतो. जेव्हा आपण सगळे एकत्र असतो तेव्हा अमेरिकेला काहीच अशक्य नाही, असं मला वाटतं. ऐतिहासिक वारसा सांगणाऱ्या देशाचे आपण नागरिक आहोत, हे आपण लक्षात ठेवायला हवं", असंही बायडेन आपल्या पोस्टमध्ये म्हणालेत.

जो बायडेनचा कमला हॅरिस यांना पाठिंबा : जो बायडेन यांनी अमेरिकेच्या अध्यक्ष पदासाठी कमला हॅरिस यांना पाठिंबा दर्शवलाय. यासंदर्भात एक्सवर पोस्ट करत ते म्हणाले, "मी नामनिर्देशन न स्वीकारण्याचा आणि हंगामी राष्ट्राध्यक्ष म्हणून माझ्या कर्तव्यांवर लक्ष केंद्रित करण्याचा निर्णय घेतलाय. 2020 मध्ये पक्षाचा उमेदवार म्हणून माझा पहिला निर्णय म्हणजे कमला हॅरिस यांची उपाध्यक्षपदी निवड करण्याचा होता. मी घेतलेला हा सर्वोत्तम निर्णय आहे. आज मी कमला हॅरिस यांना या वर्षी आमच्या पक्षाची उमेदवारी देण्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा देऊ इच्छितो. डेमोक्रॅट्स एकत्र येण्याची आणि ट्रम्प यांना पराभूत करण्याची वेळ आली आहे. चला हे उद्दिष्ट साध्य करूया," असं ते म्हणालेत. अमेरिकच्या लोकशाहीच्या दोन शतकात आजपर्यंत एकही कृष्णवर्णीय महिला राष्ट्राध्यक्ष होऊ शकलेली नाही. अशा स्थितीत डेमोक्रॅट्सनं भारतीय वंशाच्या कमला हॅरिस यांना उमेदवारी दिल्यास कृष्णवर्णीय मतदारांची मते मिळविण्यात पक्षाला मोठे यश मिळू शकते.

हेही वाचा -

  1. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन कोरोना पॉझिटिव्ह, स्वतःला केलं क्वारंटाइन - Joe Biden Covid Positive
  2. जो बायडेन यांच्यावर उमेदवारी मागं घेण्यासाठी दबाव - US Presidential Elections
  3. अमेरिकेतील निवडणुकांपूर्वी जो बायडेन आणि डोनाल्ड ट्रम्प फेस टू फेस; काय आहे 'प्रेसिडेन्शियल डिबेट'? - First Presidential Debate

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.