टोकिया Japan four Day work- जपानच्या आरोग्य, कामगार आणि कल्याण मंत्रालय अधिकाधिक कंपन्यांना चार दिवसांचा कामाचा आठवडा करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. कामाचा आठवडा चार दिवसांचा करणाऱ्या कंपन्यांना जपान सरकारकडून आर्थिक अनुदानासह इतर सुविधा देण्यात येणार आहेत.
जपानमध्ये वृद्धाचे प्रमाण अधिक आणि जन्मदर कमी असल्यानं मनुष्यबळाचा तुटवडा आहे. अशा परिस्थितीत कंपन्यांकडून कामगार असो की कंपन्यांमधील कर्मचारी यांच्यावर जास्तीत जास्त काम करून घेण्याचा दबाव असतो. कामाचा अतिताण आणि जास्त वेळ काम केल्यानं दरवर्षी ५० लोकांचा मृत्यू होतो. अति कामामुळे मृत्यू होणे, याला जपानीमध्ये 'करोशी' म्हटले जाते.
कामाचे तास आणि दिवस करण्यावर भर- जपानमधील खासदारांनी समर्थन दिल्यानं जपान सरकरानं २०१२ मध्येच कामाचे दिवस कमी करण्याचे संकेत दिले होते. मात्र, त्याची प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यास अधिक वेळ लागत आहे. जपानच्या आरोग्य, श्रम आणि कल्याण मंत्रालयाच्या दाव्यानुसार, जपानमधील केवळ ८ टक्के कंपन्या त्यांच्या कर्मचाऱ्यांना तीन किंवा अधिक दिवस सुट्टी देण्याची परवानगी देतात. तर केवळ ७ टक्के कंपन्या एक दिवसाची सुट्टी देतात. कामाचा चार दिवसांचा आठवडा करण्यासाठी जपान सरकारनं कार्यशैली सुधारणा उपक्रमाला (हतारकीकाता कैकाकू) सुरुवात केली आहे. या उपक्रमाची लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये अंमलबजावणी होण्यासाठी जपान सरकार आग्रही आहे.
सरकारकडून प्रोत्साहन देऊनही कंपन्यांमध्ये उदासीनता- सरकारनं उपक्रमाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी, लहान आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्येल 'कार्यशैली सुधारणा' मोहीम सुरू केली आहे. या उपक्रमामध्ये कंपन्यांमध्ये कामाचे कमी तास करणे आणि लवचिक कामकाजाच्या व्यवस्थेला प्रोत्साहन देण्याची तरतूद आहे. तसेच सरकारी सुट्टी देण्याबरोबरच ओव्हरटाईमवर मर्यादा लागू करण्यात येते. असे असले तरीजपान सरकारच्या नव्या योजनेबाबत अद्यापही कंपन्यांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. पॅनासोनिक होल्डिंग्ज कॉर्पोरेशननं या बहुराष्ट्रीय कंपनीनं केवळ 63,000 पात्र कर्मचाऱ्यांपैकी 150 जणांना आठवड्यातून चार दिवस काम करण्याची परवानगी दिली आहे.
जपानच्या कार्यसंस्कृतीचे काय आहे वैशिष्ट्यं जपानमध्ये कर्मचारी आठवडाभरात ४० तासांहून अधिक तास काम करतात. जपानमध्ये गुणवत्तेकडं अधिक लक्ष देण्यात येत असल्यानं कर्मचाऱ्यांवर कामाचा खूप ताण असतो. कर्मचाऱ्यांना सुट्ट्याचे अत्यंत कमी प्रमाण असल्यानं त्यांना पुरेशी विश्रांती मिळत नाही. जपानमधील अनेक कंपन्यां कर्मचाऱ्यांना आजीवन रोजगार देतात. याचाच अर्थ कर्मचाऱ्याला वृद्धापकाळातही नोकरी करावी लागते.
जपानमध्ये एक उद्योजक केवळ 30 मिनिटाची घेतो झोप-जपानमधील ह्योगो येथील 40 वर्षीय उद्योजक डायसुके होरी गेली 12 वर्षे 24 तासात ३० मिनिटे झोप घेतात. त्यांच्या मते कमी झोप घेतल्यामुळे आयुष्य वाढते. अनोख्या पद्धतीनं काम केल्यानं कार्यक्षमता वाढल्याचा डायसुके दावाही करत असल्याचं चीनच्या एका माध्यमानं म्हटलं आहेत. प्रत्यक्षात प्रौढांना चांगल्या आरोग्यासाठी किमान ६ ते ८ तासांची झोप आवश्यक असते.