बेरुत/जेरुसलेम: इस्त्रायलनं गाझामधील हमास आणि लेबेनॉनमधील हिजबुल्लाह दहशतवादी संघटनांना पुन्हा लक्ष्य केलं आहे. लेबनॉनच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, लेबनॉनच्या मध्य बेरूतमधील रास अल-नाबा परिसरात इस्त्रायलनं हवाई हल्ला केला. या हल्ल्यात 22 लोक ठार आणि 117 जखमी झाले.
इस्त्रायलनं गुरुवारी मध्यरात्री कोणताही इशारा न देता लेबेनॉनच्या राजधानीतील दोन निवासी इमारतींवर केला. या ठिकाणी अनेक स्थलांतरित लोक राहतात. बेरुतच्या दक्षिणेकडील उपनगर दहियाहच्या बाहेर इस्रायलनं हा तिसरा हल्ला केला. सौदी अरेबियाच्या एका वृत्तवाहिनीच्या माहितीनुसार इस्त्रायलनं यापूर्वी 29 सप्टेंबर रोजी बेरुतच्या कोला आणि 3 ऑक्टोबर रोजी बचौरा येथे हल्ले केले होते.
इमारतीमधून दिसले धुरांचे लोट- प्रत्यदर्शीच्या माहितीनुसार हा हल्ला सुमारे एक मैल अंतरावरून जाणवला होता. हवाई हल्ला झाल्यानंतर इमारती हादरत होत्या. हल्ला झालेल्या ठिकाणी इमारतीमधून धूर निघत होता. हवाई हल्ला झाल्यानंतर परिसरातील इमारतीत राहणाऱ्या रहिवाशांनी अपार्टमेंट रिकामे करून बाहेरील मैदानात जमा झाले होते. रास अल-नाबा आणि अल-नुवेरी येथील निवासी ब्लॉकमध्ये धूर आणि आगीचे लोळ बाहेर पडताना दिसत होते.
गाझामध्ये दुपारी हल्ला- दुसरीकडं इस्रायलनं गाझा पट्टीतील विस्थापित लोकांच्या शाळेवर गुरुवारी दुपारी हल्ला केला. या हल्ल्यात 28 पॅलेस्टिनी ठार आणि 54 हून अधिक जखमी झाले, अशी माहिती पॅलेस्टिनी आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली. या हल्ल्याबाबत पॅलेस्टाईन रेड क्रिसेंट सोसायटीनं (PRCS) सोशल मीडिया माहिती शेअर केली. रुग्णवाहिका दल आणि नागरी संरक्षण दलांनी मुले आणि महिलांसह अनेक लोकांचे मृतदेह इमारतीच्या ढिगाऱ्यातून बाहेर काढल्याची माहिती वृतसंस्थेनं दिली.
शाळेत दहशतवाद्यांचे होते केंद्र- गाझामध्ये रफिदाह शाळेच्या कंपाऊंडमध्ये दहशतवाद्यांचे कमांड आणि नियंत्रण केंद्र सुरू होते, असा इस्त्रायलच्या सैन्यदलानं गुरुवारी दावा केला. शाळेतील दहशतवादी केंद्राचा वापर हा सैन्यदल आणि इस्रायलविरोधात दहशतवादी हल्ल्यांची योजना आखण्यासाठी केला होता. नागरिकांना धोका कमी करण्यासाठी अनेक पावले उचलली गेली आहेत. यात हल्ला करण्यापूर्वी अचूक युद्धसामग्रीचा वापर, हवाई पाळत ठेवणे आणि गुप्तचरांकडून माहिती गोळा करण्याचा समावेश आहे. गाझामधील आरोग्य अधिकाऱ्याच्या दाव्यानुसार गाझामध्ये चालू असलेल्या इस्रायलच्या कारवायांमध्ये आजपर्यंत 42,065 लोक ठार झाले आहेत. तर 97,886 जखमी झाले आहेत.
हेही वाचा-