ETV Bharat / international

अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विरुद्ध कमला हॅरिस; 'हे' चार मुद्दे आहेत महत्वाचे

अमेरिकेत ५ नोव्हेंबरपासून राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकांना सुरुवात होणार आहे. त्यांच्यासाठी चार मुद्दे सर्वात महत्वाचे आहेत. या निवडणुकीत ट्रम्प विरुद्ध हॅरिस लढत होणार आहे.

TRUMP VS HARRIS
ट्रम्प विरुद्ध हॅरिस (File PHoto)
author img

By Rajkamal Rao

Published : Nov 3, 2024, 9:52 PM IST

Updated : Nov 3, 2024, 9:57 PM IST

वॉशिंग्टन : अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीला आणखी दोन दिवस उरले आहेत. 5 नोव्हेंबरपासून नवीन राष्ट्रपती निवडण्यासाठी मतदार मतदान करतील. यावेळी निवडणुकीत अर्थव्यवस्था, बेकायदेशीर इमिग्रेशन, महिलांचे हक्क आणि परदेशी युद्धे आणि अमेरिकेच सरकार हे महत्वाचे मुद्दे असणार आहेत. यावेळी डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार 'कमला हॅरिस' आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार 'डोनाल्ड ट्रम्प' यांच्यात लढत होत आहे.

कशी आहे निवड : 5 नोव्हेंबर रोजी अमेरिकन लोक 47 व्या राष्ट्राध्यक्षासाठी मतदान करतील. कमला हॅरिस जिंकल्या तर त्या अमेरिकेच्या पहिल्या दक्षिण आशियाई आणि कृष्णवर्णीय महिला अध्यक्ष ठरतील. अमेरिकन निवडणुका या जगातील इतर देशातील निवडणुकांपेक्षा वेगळ्या असतात.

US Elections
यूएस निवडणूक 2024 (ETV Bharat GFX)

अमेरिकेत मतदान प्रक्रिया काय आहे? : अमेरिकेत मतदार थेट राष्ट्राध्यक्षाची निवड करत नाहीत. त्यांची निवड 538 'इलेक्टोरल कॉलेज'द्वारे केली जाते. जिंकण्यासाठी, उमेदवाराला बहुमत मिळणे आवश्यक आहे. त्यासाठी 270 किंवा त्याहून अधिक अशी मते मिळवावी लागतात. त्यामुळे थेट मतदान असं म्हटलं असलं तरीही तो किंवा ती याला इलेक्टोरल कॉलेजच्या बहुमतामध्ये परिवर्तित करू शकत नसल्यास तो हरतो. 2016 मध्ये, डेमोक्रॅट पक्षाच्या हिलरी क्लिंटन यांनी ट्रम्पपेक्षा जवळपास 3 दशलक्ष अधिक मते जिंकली, परंतु ट्रम्प यांनी 306 इलेक्टोरल कॉलेज मते जिंकून बहुमताचा आकडा पार केल्यामुळं ते निवडणूक जिंकले. ज्या सात राज्यांमध्ये कोणत्याही पक्षाला निश्चित बहुमत नाही आणि तेथील निवडणुका कोणत्याही मार्गाने जाऊ शकतात, त्या सात राज्यांमधून अंतिम निर्णय होईल अशी अपेक्षा आहे. या राज्यांची मिळून 93 इलेक्टोरल कॉलेज मते आहेत.

महत्त्वाचे चार मुद्दे : अमेरिकन लोक सर्वेक्षणात म्हणतात की, त्यांच्यासाठी चार मुद्दे सर्वात महत्त्वाचे आहेत. अर्थव्यवस्था (महागाई, नोकऱ्या, पगार), बेकायदेशीर स्थलांतर (ट्रम्प यांनी पद सोडल्यापासून सुमारे 20 दशलक्ष स्थलांतरितांनी सीमा ओलांडली आहे), महिलांचे हक्क (गर्भपातासह), आणि परकीय युद्धे आणि अमेरिकेची त्यातील भूमिका, असे हे मुद्दे आहेत.

अमेरिकन लोकांना काय वाटते : राष्ट्राध्यक्ष बायडेन यांच्या विनाशकारी धोरणांपासून दूर राहणे हे हॅरिस यांच्यापुढील आव्हान आहे. ताज्या नोकऱ्यांच्या अहवालात असं दिसून आलं आहे की, अपेक्षेपेक्षा खूपच कमी नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे अमेरिकेनं युद्धावर 200 अब्ज डॉलर खर्च करूनही युक्रेन गमावले आणि मध्यपूर्वेमध्ये हिंसाचार वाढतच चालला आहे. अमेरिकन लोक आंतरराष्ट्रीय संबंधांमधील बायडेन-हॅरिस धोरणांच्या शहाणपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. जवळपास 74 टक्के अमेरिकन लोकांना वाटतं की, अमेरिका चुकीच्या मार्गावर जात आहे. ऐतिहासिकदृष्ट्या पाहिलं तर, अशा परिस्थितीत विद्यमान उमेदवार जो की यावेळच्या परिस्थितीत कमला हॅरिस आहेत, त्या हरण्याची शक्यता मानली जाते.

दुसरीकडे अनेक स्त्रिया कमला हॅरिस यांच्या उमेदवारीसाठी उत्साहित आहेत आणि पुरुषांपेक्षा अधिक महिलांनी मतदान केल्यामुळं, हॅरिस या महिलांवर अवलंबून आहेत. आणखी एक गुंतागुंत अशी आहे की अमेरिका तीन प्रकारे मतदान करते : वैयक्तिक मतदान, जे काही राज्यांमध्ये 11 सप्टेंबरपासून सुरू झालं; 5 नोव्हेंबर रोजी वैयक्तिक मतदान होईल; आणि मेलद्वारे मतदान होईल. अलास्का सारख्या खूप मोठे भूभाग आणि कमी लोकसंख्येची घनता असलेल्या काही राज्यांमध्ये मतदान फक्त मेलद्वारे केलं जातं. खरं तर, 2020 मध्ये, ट्रम्प निवडणुकीच्या रात्री पेनसिल्व्हेनियामध्ये आघाडीवर होते, परंतु चार दिवसांनी बायडेन या शर्यतीत परतले जेव्हा हजारो मेल-इन मतपत्रिका मोजल्या गेल्या.

या निवडणुकीत कोण जिंकला किंवा हरला हे महत्त्वाचं नाही, अमेरिकन लोकांना एका गोष्टीसाठी आनंद होईल. हा अत्यंत-दीर्घ निवडणुकीचा हंगाम शेवटी संपत आहे : यापुढे प्रचार जाहिराती नाहीत, मित्र आणि कुटुंबियांशी अधिक तावातावाची चर्चा नाही आणि ताज्या बातम्यांच्या अपडेटची वाट पाहात सोशल मीडियावर तासं तास घालवायचे नाहीत. या सगळ्यातून मुक्ती मिळाल्यानं अमेरिका शेवटी पूर्वपदावर येईल.

हेही वाचा -

  1. ब्रिक्स शिखर परिषदेचं फलित : भारत रशियासह चीनच्या संबंधात मजबुती, अमेरिकेलाही गर्भित इशारा
  2. ब्रिक्स शिखर परिषदेचं फलित : भारत रशियासह चीनच्या संबंधात मजबुती, अमेरिकेलाही गर्भित इशारा
  3. ईव्हीएम मशिन हॅक होतात का? एलॉन मस्क यांनी पुन्हा एकदा व्यक्त केली भीती

Last Updated : Nov 3, 2024, 9:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.