नवी दिल्ली Baltimore Key Bridge : मंगळवारी पहाटे अमेरिकेच्या बाल्टिमोर शहरातील एका पुलावर सिंगापूरचे कंटेनर जहाज आदळले. त्यामुळे पुलाचा काही भाग कोसळला. यानंतर एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलीय. या जहाजातील सर्व 22 सदस्यीय कर्मचारी भारतीय सुरक्षित आहेत. शिपिंग कंपनीनं ही माहिती दिलीय.
क्रूमध्ये सर्व भारतीय : सिंगापूरचे कंटेनर जहाजाचे DALI (IMO 9697428) मालक आणि व्यवस्थापकांनी सांगितलं की, 26 मार्च रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे 1:30 वाजता हे जहाज बाल्टिमोरमधील फ्रान्सिस स्कॉट ब्रिजच्या दोन खांबांपैकी एकावर धडकल्याचं सिनर्जी मरीन ग्रुपनं एका निवेदनात म्हटलंय. दोन वैमानिकांसह सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित सापडले आहेत. तसंच या अपघातामुळे कोणतंही प्रदूषण झालं नाही.
सहा जण बोपत्ता : हे जहाज बाल्टिमोरहून कोलंबोला जात होते. यूएस कोस्ट गार्ड आणि स्थानिक प्राधिकरणांव्यतिरिक्त मालक आणि व्यवस्थापकांना सूचित केल्याचंही निवेदनात म्हटलंय. यूएस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, "जहाजाच्या चालक दलानं टक्कर होण्यापूर्वी समस्या नोंदवली होती." मेरीलँडचे गव्हर्नर वेस मूर यांनी सांगितलं की, "जहाजातील कर्मचाऱ्यांनी वेळेवर इशारा दिल्यानं जीव वाचले आहेत. टक्कर झाल्यानंतर जहाजावरील काही लोक पाण्यात पडले. त्यामधील सहा बेपत्ता लोकांचा शोध सुरू आहे."
47 वर्षे जुना आहे पूल : बाल्टीमोरच्या दक्षिणेला असलेला हा कोसळणारा पूल पटापस्को नदीवर 1.5 मैलांपेक्षा जास्त पसरलेला आहे. हा पूल मार्च 1977 मध्ये वाहतुकीसाठी खुला झाला होता. 'द स्टार-स्पँगल्ड बॅनर'च्या लेखकाच्या नावावरुन फ्रान्सिस स्कॉट की ब्रिजचं नाव देण्यात आलं. या प्रांताचे गव्हर्नर मूर यांच्या मते, एका आकडेवारीनुसार 2023 मध्ये 12.4 दशलक्षाहून अधिक वाहनांची पुलावरून वाहतूक झाली. या पुलावरुन दररोज सुमारे 30 हजार नागरिकांचा प्रवास होतो.
हेही वाचा :