कोलंबो(श्रीलंका) Sri Lanka New President : मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवलाय. श्रीलंकेत डाव्या विचारसरणीचा नेता राष्ट्राध्यक्षपद भूषविण्याची ही पहिलीच वेळ आहे. अनुरा यांनी या निवडणुकीत नमल राजपक्षे, साजिद प्रेमदासा आणि रानिल विक्रमसिंघे या तीन मोठ्या उमेदवारांचा पराभव केला. विद्यमान राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
Anura Kumara Dissanayake wins 2024 Sri Lanka Presidential Election
— ANI Digital (@ani_digital) September 22, 2024
Read @ANI Story | https://t.co/CDx5KiYtBi#SriLankaElections #SrilankanPresident #AnuraKumaraDissanayake #PresidentElect pic.twitter.com/WaiHb0E3v4
दिसानायकेंना 49.8 टक्के मतं : मार्क्सवादी नेते अनुरा कुमारा दिसानायके यांनी श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. दिसानायके यांना 49.8 टक्के तर समागी जन बालावेगयाचे नेते सजित प्रेमदासा यांना 25.8 टक्के मतं मिळाली.
राष्ट्रपतीपदाची शपथ कधी घेणार ? : विद्यमान राष्ट्रपती आणि युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांना 16.4 टक्के मतं मिळाली आहेत. सहा वेळा पंतप्रधान राहिलेल्या रानिल विक्रमसिंघे यांनी जुलै 2022 मध्ये राष्ट्रपतीपदाची सूत्रं हाती घेतली होती. रानिल विक्रमसिंघे यांचा पराभव युनायटेड नॅशनल पार्टीसाठी मोठा धक्का मानला जातोय. दिसानायके सोमवार, 23 सप्टेंबर रोजी राष्ट्रपतीपदाची शपथ घेतील. दिसानायके हे श्रीलंकेचे नववे राष्ट्रपती असतील.
कोण आहेत अनुरा दिसानायके? : अनुरा दिसानायके यांचा जन्म श्रीलंकेची राजधानी कोलंबोपासून 100 किलोमीटर अंतरावर असलेल्या थम्बुटेगामा येथं झाला. दिसानायके हे त्यांच्या गावातून विद्यापीठात शिक्षणासाठी जाणारे पहिले व्यक्ती होते. पेरादेनिया विद्यापीठात प्रवेश घेतल्यानंतर त्यांना राजकीय विचारांमुळं धमक्या मिळू लागल्या. त्यानंतर त्यांनी विद्यापीठ बदलून केलनिया विद्यापीठात प्रवेश घेतला. 80 च्या दशकात दिसानायके यांनी राजकारणात प्रवेश केला. 1987 ते 1989 दरम्यान सरकारविरोधी आंदोलनादरम्यान ते जनता विमुक्ति पेरामुना या पक्षात प्रवेश केला.
हेही वाचा
- ढोल-ताशांचा गजर, शिवरायांचा जयजयकार; अमेरिकेत पंतप्रधान मोदींचं मराठमोळ्या स्टाईलनं स्वागत - PM Modi Visit USA
- गर्भाशयाच्या कॅन्सरवर मात करण्याकरिता क्वाडची मोहिम, पंतप्रधान मोदींकडून ७.५ दशलक्ष डॉलरची मदत जाहीर - PM Modi us visit
- अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर काय असेल अमेरिकेचं परराष्ट्र धोरण? डोनाल्ड ट्रम्प-कमला हॅरिस यांच्यातील धोरणात्मक फरक - US Foreign Policy