वॉशिंग्टन : अमेरिकेनं ज्येष्ठ उद्योगपती आणि परोपकारी रतन टाटा यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलाय. तसंच भारताला अधिक समृद्धी आणि विकासाकडं नेणारं व्यक्तिमत्व म्हणून त्यांचं स्मरण केलंय. दरम्यान, रतन टाटा यांचे बुधवारी (9 ऑक्टोबर) रात्री वयाच्या 86 व्या वर्षी निधन झालं. त्यांनी मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. टाटा यांच्याकडं 30 हून अधिक कंपन्या होत्या. ज्यांचा विस्तार 100 हून अधिक देशांमध्ये झाला. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण जगातून प्रतिक्रिया येत आहेत.
'यूएसआयबीसी'च्या अध्यक्षांची प्रतिक्रिया : यूएस-इंडिया बिझनेस कौन्सिलचे (यूएसआयबीसी) अध्यक्ष अतुल केशप म्हणाले की, "रतन टाटा हे भारताचे अद्वितीय आणि उदात्त पुत्र, खानदानी आणि उदारतेचे आदर्श होते. इतर लोक व्यवसायाकडं नाक मुरडत असताना, रतन टाटा यांनी आपल्या कंपन्यांसह भारताला अधिक समृद्धी आणि विकासाकडं नेलं. रतन टाटा यांनी जागतिक प्रेक्षकांना वाणिज्य क्षेत्रातील अभिजाततेची आठवण करून दिली. 26/11 च्या हल्ल्यानंतर त्यांची कर्मचाऱ्यांबद्दलची भक्ती दिसून आली."
उद्योगात त्यांनी दिलेले विलक्षण योगदान आणि सामाजिक कारणांबद्दलची त्यांची गहन वचनबद्धता केवळ भारतावरच नव्हे तर संपूर्ण जगावर अमिट छाप सोडली आहे. रतन टाटा यांचा वारसा पिढ्यांना प्रेरणा देत राहील. त्यांचा आत्मा आणि योगदान सदैव मार्गदर्शक प्रकाश राहील- एम.आर. रंगास्वामी, संस्थापक, इंडियास्पोरा
अंतरिम अध्यक्ष मायकेल आय. कोटलीकॉफ म्हणाले की, "रतनच्या शांत वर्तनानं आणि नम्रतेनं त्यांच्या आंतरराष्ट्रीय व्यक्तिरेखेला खोटं ठरवलं. त्यांची उदारता आणि इतरांबद्दलची काळजी यामुळं संशोधन आणि शिष्यवृत्ती सक्षम झाली. त्यामुळे भारतातील आणि त्यापलीकडे लाखो लोकांचे शिक्षण, आरोग्य सुधारलं आणि कॉर्नेलचा जागतिक प्रभाव वाढला."
- जेव्हा रतन टाटा कॉर्नेलमधून आर्किटेक्चरची पदवी घेऊन पदवीधर झाले. तेव्हा त्यांचं दूरदर्शी नेतृत्व, परोपकार आणि मानवतेची बांधिलकी यामुळं अनेक क्षेत्रांमध्ये शिक्षण आणि संशोधनाच्या प्रगतीवर जागतिक प्रभाव पडेल याची कल्पना करणं अशक्य होतं.- मीजिन यून, डीन, आर्ट अॅंड प्लॅनिंग, कॉर्नेल युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर
हेही वाचा -