हैदराबाद World Suicide Prevention Day 2024: दिवसेंदिवस भारतातील आत्महत्येचा आलेख वाढतचं चालला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून देशात आणि राज्यात आत्महत्येच्या घटानांमध्ये वाढ होत आहे. शेतकऱ्यांसोबतच तरुणांमध्ये आत्महत्येचे प्रमाण अधित आहे. कुणी प्रेमात नापास झाल्यामळे तर कुणी परीक्षेत आलेल्या अपयशामुळे जीव संपवतो. यामुळे दरवर्षी 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. आत्महत्येच्या वाढत्या घटनांना आळा घालण्याच्या हेतूनं हा दिवस साजरा केला जातो.
एका वर्षात 1.64 लाख आत्महत्या : गेल्या वर्षीच्या गणनेनुसार, आपल्या देशात विविध कारणांमुळे सुमारे 1.64 लाख लोकांनी आत्महत्या केली. त्यापैकी 1.10 लाख पुरुष आणि 54 हजार महिलांचा समावेश आहे. म्हणजे रोज सरासरी 450 लोक आत्महत्या करत आहेत. पूर्वी कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि विविध कारणांमुळे 40 वर्षांवरील लोक आत्महत्या करत असत. परंतु गुन्हेगारी तपासाच्या आकडेवारीनुसार तरुण आणि मध्यमवर्गीय महिला अधिक आत्महत्या करत असल्याचं स्पष्ट झालं आहे. सर्वाधिक मृत्यू हे रस्ते अपघातानंतरच्या आत्महत्यांमुळे होत असल्याचं अधिकृत आकडेवारीवरून स्पष्ट होते.
इतिहास: इंटरनॅशनल असोसिएशन फॉर सुसाइड प्रिव्हेन्शन (IASP) ने 2003 पासून 10 सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ आणि वर्ल्ड ऑर्गनायझेशनने हा कार्यक्रम प्रायोजित केला होता.
If you think someone may be considering #suicide, remember:
— World Health Organization (WHO) (@WHO) April 22, 2023
🔸 Many people think about suicide at some point in their lives
🔸 Suicidal thoughts and behaviours are signs of severe emotional distress - not weakness
🔸 It is possible to get better pic.twitter.com/kp01C3Bv0W
या वर्षाची थीम: जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनाची यावर्षीची थीम 'चेंजिंग द नॅरेटिव्ह ऑन सुसाइड' अशी आहे. आत्महत्येबद्दलचे विचार बदलणं ही आहे. आत्महत्या हा उपाय नसून अनेक पर्याय आहेत हे जगभरातील लोकांना समजावं हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश आहे.
"आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींची लवकर ओळख पटू शकते. जास्त झोप किंवा निद्रानाश, नेहमी एकटं अंधारात राहणं पसंद करणारे व्यक्ती, विनाकारण रडणारे व्यक्ती, क्षणिक राग येणे, कौटुंबिक समारंभांसह सर्वांपासून दूर राहणे, अशी लक्षणं एखाद्या व्यक्तीमध्ये आढळल्यास त्यांच्याकडे दुर्लक्ष करू नका. त्यांना धीर द्या. अशा लोकांना या समस्येवर उपाय आहे असं समजावं असं मत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. कविताप्रसन्ना यांनी व्यक्त केलं''.