हैदराबाद World Health Day 2024 : जागतिक आरोग्य दिन हा मलेरिया, एचआयव्ही-एड्स, कर्करोग आणि मानसिक आरोग्य यासारख्या अनेक आरोग्यविषयक समस्यांबद्दल जागरुकता वाढवतो. हा दिवस लोकांना निरोगी जीवनशैलीचा अवलंब करण्यास प्रेरित करतो. यात नियमित व्यायाम, निरोगी आहार, तंबाखू आणि अल्कोहोलपासून दूर राहणं समाविष्ट आहे. या दिवशी लोकांना त्यांच्या आरोग्याविषयी जागरुक करण्यासाठी जनजागृती कार्यक्रम, चर्चासत्रं, आरोग्य तपासणी शिबिरं आणि वेबिनारचं आयोजन केलं जाते.
आजघडीला जगभरातील कोट्यवधी लोकांच्या आरोग्याचा अधिकार धोक्यात येत आहे. रोग आणि संकटं मृत्यू आणि अपंगत्वाची कारणं म्हणून उदयास येतात. संघर्षांमुळे जीवन विध्वंसक बनतं, ज्यामुळं मृत्यू, वेदना, भूक आणि मानसिक त्रास होतो. जीवाश्म इंधनांचं जाळणं एकाच वेळी हवामान संकट वाढवत आहे. स्वच्छ हवेचा श्वास घेण्याचा आपला हक्क हिरावून घेत आहे. घरातील आणि बाहेरील वायू प्रदूषणानं दर 5 सेकंदाला एक जीव घेतलाय.
-
Union Home Minister Amit Shah tweets "Greetings on World Health Day. Over the centuries, humankind has fought many battles against the challenges on the path of creating a healthy society, and these wars are still ongoing. As we celebrate this occasion, let us all pledge to fight… pic.twitter.com/5S4JzvxTWw
— ANI (@ANI) April 7, 2024
डब्ल्यूएचओ कौन्सिल ऑफ हेल्थ इकॉनॉमिक्सला आढळून आलंय की, किमान 140 देशांनी त्यांच्या संविधानात आरोग्य हा मानवी हक्क म्हणून उल्लेख केलाय. तरीही अनेक देश कायदे करत नाहीत किंवा त्यांच्या लोकसंख्येला आरोग्य सेवा मिळण्याचा अधिकार आहे. 2021 मध्ये किमान 450 कोटी लोकांवर (जगातील अर्ध्याहून अधिक लोकसंख्येच्या) अत्यावश्यक आरोग्य सेवांचा पूर्णपणे अंतर्भाव झालेला नाही हे, यावरुन अधोरेखित होतं. जागतिक आरोग्य दिन 2024 ची थीम 'माझं आरोग्य, माझा हक्क' आरोग्याच्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आहे. दर्जेदार आरोग्य सेवा, शिक्षण आणि माहिती तसंच सुरक्षित पिण्याचं पाणी, शुद्ध हवा, चांगलं पोषण, दर्जेदार घरं, सभ्य काम आणि पर्यावरणीय परिस्थिती आणि स्वातंत्र्य या सर्वांचा हक्क मिळवण्यासाठी या वर्षीची थीम निवडण्यात आलीय.
देखरेखीची आवश्यकता- प्रत्येकासाठी चांगलं आरोग्य महत्वाचं आहे. निरोगी वातावरण, सकस अन्न आणि पाणी आणि इतर आहाराच्या सवयी चांगल्या आरोग्यासाठी आवश्यक आहेत. यापैकी अनेक घटकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी, सरकारांना अनेक स्तरांवर देखरेखीची आवश्यकता आहे. देशातील सर्वच मंत्रालयांनी आरोग्याचा अधिकार प्रत्यक्षात आणण्यासाठी कायद्यानं तरतुदी करणं आवश्यक आहे. जेणेकरुन नंतर समस्या निर्माण होणार नाहीत.
स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी काय करावं : प्रत्येक व्यक्तीनं स्वत:ला निरोगी ठेवण्यासाठी सकाळी व्यायाम करायला हवा. योगासनं करावीत. दोन बदाम, दोन अक्रोड आणि सुमारे अर्धा किलो फळं खाणे आवश्यक आहे. हे तुम्हाला निरोगी ठेवण्याची हमी देतात. प्रत्येक व्यक्तीनं 7 तासांची झोप घेणं आवश्यक आहे. याशिवाय शारीरिक श्रमही करावेत. प्रत्येक व्यक्तीनं दिवसातून फक्त 5 ग्रॅम मीठ खावं. परंतु, बहुतेक लोक 17 ग्रॅमपेक्षा जास्त मीठ वापरतात. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे. हिरव्या भाज्या, सॅलड, फळे आणि कडधान्यांचा आहारात समावेश करावा. पण, आजची तरुण पिढी जंक फूडचं जास्त सेवन करत आहे. त्यामुळं आरोग्याच्या समस्याही वाढत आहेत.
जागतिक आरोग्य दिन कधी साजरा केला जातो : जागतिक आरोग्य संघटना (WHO) ची स्थापना झाल्याच्या स्मरणार्थ जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो. डब्ल्युएचओची स्थापना 7 एप्रिल 1948 रोजी झाली. यानंतर डब्ल्युएचओच्या सदस्य देशांनी 7 एप्रिल 1950 पासून जागतिक आरोग्य दिन साजरा करण्यास सुरुवात केली.
हेही वाचा :