ETV Bharat / health-and-lifestyle

आरोग्यासाठी चांगलं तेल कोणतं? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात - Rice Bran Oil - RICE BRAN OIL

Which Oil is Best for Cooking: तेलाशिवाय स्वयंपाक करणं अशक्य आहे. स्वयंपाकासाठी वापरण्यात येणाऱ्या तेलावर आपलं आरोग्य अवलंबून आहे. त्यामुळे तज्ज्ञ योग्य तेल निवडण्याचा सल्ला देतात. तज्ज्ञांच्या मते स्वयंपाकासाठी कोणतं तेल चांगलं आहे? ते पाहूया.

Which Oil Is Best Good For Health
चांगलं तेल कोणतं? (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 13, 2024, 5:14 PM IST

हैदराबाद Which Oil is Best for Cooking: बाजारात विविध प्रकारचं तेल उपलब्ध आहेत. प्रत्येक जण जेवण तयार करण्यासाठी आपल्या आवडीनुसार तेल वापरतात. कुणी प्रत्येक महिण्याला वेगवेगळे तेल वापरतात, तर कुणी तीन महिण्यानंतर तेल बदलतात. साधारणतः प्रत्येक स्वयंपाकघारात रिफाइंड तेल, सूर्यफूल तेल, भूईमुग, तांदळाचं तेल वापलं जाते. परंतु सध्या 'कोल्ड प्रेस' ऑइल म्हणजेच कच्च्या घाणीच्या तेलाला विशेष मागणी आहे. कच्च्या घाणीच्या तेलाचे अनेक आरोग्यदायी फायदे दिसून आले आहेत. कच्च्या घाणीचं तेल कमी तापमाणात काढलं जातं. यामुळे तेलांच रंग, चव, सुगंध आणि पोषक घटक टिकून राहतात, अशी माहिती प्रसिद्ध पोषणतज्ज्ञ डॉ. लहरी सुरपाणेंनी दिली आहे.

कोणतं तेल घ्यावं?

''उच्च स्मोकिंग पॉइंट असलेल्या तेलाची निवड स्वयंपाकासाठी करावी. हे तेल थोडं महाग असले तरी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. डीप फ्राईंगसाठी ॲव्होकॅडो तेल हा उत्तम पर्याय आहे.ते उपलब्ध नसल्यास सूर्यफूल किंवा सोयाबीन तेल डीप फ्राईंगसाठी वापरता येतं. रोजच्या स्वयंपाकासाठी तिळ किंवा राईस ब्रॅन ऑइलचा वापर कोल्ड टॉपिंगमध्ये करावा. एक्स्ट्रा व्हर्जिन ऑइल, फ्लेक्स सीड ऑइल, मोनो सॅच्युरेटेड, पॉली अनसॅच्युरेटेड फॅटी ॲसिड्स हृदयासाठी खूप चांगले असतात, साट्युरेटेड तेल खाल्ले तर तुमच्या शरीरात ओमेगा 6 फॅटी ऍसिड जास्त प्रमाणात तयार होते. - डॉ.लहरी सूरपणेंनी, पोषणतज्ञ''

बदामाचं तेल: बदामाच्या तेलात व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असतं. ते ओमेगा ३ फॅटी ॲसिडमध्ये समृद्ध असतं आणि त्वचेच्या आरोग्यासाठी चांगले असतं.

ऑलिव्ह ऑईल: ऑलिव्ह ऑईल हे आरोग्यासाठी खूप चांगलं आहे आणि त्याचा वापर स्वयंपाकात केल्यानं मधुमेह आणि हृदयाशी संबंधित आजारांवर नियंत्रण ठेवता येतं. असं म्हटलं जातं की ते कर्करोग आणि मधुमेहाच्या आजारांवर औषध म्हणून काम करतं.

ॲव्होकॅडो तेल: ॲव्होकॅडो तेलात मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी ऍसिडचे प्रमाण जास्त असते. यामुळे हृदयाच्या आरोग्यासाठी चांगलं असल्याचं डॉक्टर सांगतात.

तांदळाच्या कोंडाचे तेल: तांदळाच्या कोंड्याच्या तेलामध्ये ओरिझानॉल हे अँटीऑक्सिडंट असते. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असल्याचं म्हटलं जातं.

नारळाचं तेल: नारळाच्या तेलात कोलेस्टेरॉल नसल्यामुळे ते पचनासाठी उपयुक्त आहे. नारळाच्या तेलाचं सेवन केल्यानं आपल्या शरीरातील चरबीचं ऊर्जेत रूपांतर होऊ शकतं, असं डॉक्टरांचे म्हणणं आहे.

शेंगदाणा तेल: शेंगदाणा तेल हे आरोग्यासाठीही चांगलं असल्याचं म्हटलं जातं. यामुळे बुरशीजन्य आणि विषाणूजन्य संसर्गापासून दूर राहण्यासोबतच मेंदूचे कार्य सुधारतं. या तेलामध्ये व्हिटॅमीन ई आणि पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड खराब कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करतात.

मोहरीचं तेल: मोहरीच्या तेलाचा वापर हृदयाशी निगडीत समस्या टाळण्यास केला जातो. मोहरीच्या तेलामध्ये फॅट्स असल्यामुळे, यकृतातील चरबी आणि स्ट्रोक टाळता येऊ शकतं. यात असलेलं पॉलिअनसॅच्युरेटेड फॅटी अ‍ॅसिड आणि मोनोअनसॅच्युरेटेड ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्स आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

तेल कितीही चांगलं असलं तरी नेहमी एकच प्रकारचं तेल वापरल्यानं एकाच प्रकारचे पोषक घटक त्यातून मिळतात. याशिवाय सर्व प्रकारची पोषकतत्त्वे मिळण्यासाठी सर्व प्रकारच्या तेलांचा वारंवार वापर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. अनेक संशोधनातून असं दिसून आलं आहे की, रिफाइंड तेल आरोग्यासाठी हानिकारक आहे. म्हणूनच मूळ तेलाचा वापर केला तरच तुम्ही निरोगी राहू शकता, असं म्हटलं जातं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. 'या' हर्बल चहानी करा दिवसाची सुरुवात; रक्तदाब राहील नियंत्रणात - Herbal Tea Controls Blood Pressure
  2. सावधान! तुम्ही सुद्धा थेट गॅस फ्लेमवर पोळी शेकता का? पडू शकतं महागात - Can Roti Cause Cancer
  3. महिलांचं वजन अचानक का वाढतं? जाणून घ्या 'ही' कारणं - Weight Gain Causes in Women

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.