हैदराबाद weight loss without diet plan: चुकीच्या जीवनशैलीमुळं मनुष्य विविध रोगांना आमंत्रण देतो. बहुतांश नागरिक लठ्ठपणामुळं चिंतेत आहेत. लठ्ठपणा कमी करण्यासाठी विविध उपाय केले जात आहेत. कीटोडाइट, मेडिटेरियन डाइट इंटरमिटेंट फास्टिंग अशा विविध डाएट प्लॅनचा समावेश मनुष्य आपल्या जीवनात करतो. तसेच औषधांचादेखील वापर करतात. कित्येक लोक रात्रीचं जेवण करत नसल्याचं आपण पाहिलं आहे. त्यांचा गैरसमज आहे की, रात्रीचं जेवण शरीरासाठी हानिकारक असतो. परंतु या गैरसमजामुळं वजन कमी न होता रोगांना आमंत्रण मिळतो. जेवण कमी करणे किंवा रात्रीचं जेवण वगळणे आरोग्यासाठी अपायकारक आहे, असं मत डॉक्टरांनी व्यक्त केलं आहे.
- काय सांगते आकडेवारी?: 'द लॅन्सेट'च्या अभ्यासानुसार 2022 मध्ये भारतात 20 वर्षांवरील 44 दशलक्ष महिला आणि 26 दशलक्ष पुरुष लठ्ठ होते. 1990 साली भारतातील लठ्ठपणाचे हेच प्रमाण 2.4 दशलक्ष महिला आणि 1.1 दशलक्ष पुरुष असे होते. तसेच 2022 साली 5 ते 19 वयोगटातील तब्बल 12.5 दशलक्ष मुलांमध्ये लठ्ठपणा होता.
- कमी कॅलरीयुक्त आहार घ्या: आहारात कमी कॅलरीयुक्त अन्नाचा समावेश केल्यास तुमचं वजन कमी होईल. नियमीत धावणे, व्यायाम आणि योगासने केल्यास कॅलरी बर्न करु शकता. जे वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे.
कोणते पदार्थ घ्यावे
- विविध प्रकारचे बीन्स
- जेवणानंतर डार्क चॉकलेट.
- भाज्या
- अंडी
- काजू
- सफरचंद
- दही
निरोगी खाण्याची शैली अवलंब करा: कडधान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते. ते शरीराला पोषक तत्वे प्रदान करतात. थायरॉईडचं प्रमाण नियंत्रीत करतात. तसंच हृदयाचे आरोग्य सुधारण्यास आणि कोलेस्टेरॉल प्रमाण कमी करण्यातदेखील फायदेशीर आहे. उदाहरणांमध्ये ब्रेड, ज्वारी, ओट्स, पॉपकॉर्न आणि करड्या रंगाचा तांदूळ आहारात समावेश करा. यात उच्च प्रथिने आणि फायबर असतात. नियमीत कडधान्यांचा समावेश आहारत केल्यास तुम्ही निरोगी राहू आयुष्य जगू शकता. कडधान्यामुळे आपली पचनक्रिया वाढते. तसेच बद्धकोष्ठतेचा धोका कमी होतो.
- बीन्स आणि शेंगामध्ये जास्त प्रमाणात खनिजे आणि फायबर असतात. निरोगी राहण्याकरिता तुम्ही तुमच्या आहारत शेंगांचा समावेश करा. बीन्समध्ये लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन ई आणि बी प्रमाणात असतं.
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी आहारामध्ये नट आणि बीयांचा समावेश करा. उदाहरणात बदाम, आंबाडीच्या बिया, पिस्ता, भोपळा, शेंगदाणे, सुर्यफुलाच्या बिया आणि अक्रोडचा समावेश आहारात करा.
- जर तुम्ही मांसाहाराला प्राधान्य देत असाल, तर मासे खा. त्यामध्ये ओमेगा ३ फॅटी अॅसिड असते. जे शरीरासाठी फार महत्वाचे आहे. हृदय निरोगी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी ओमगा ३ विशेष भूमिका बजावतो. ओमेगा ३ फॅटी अॅसिड मेंदूला निरोगी ठेवतो. नैराश्यासारख्या समस्या कमी होतात. त्यामुळे आठवड्यातून किमान दोनदा मासे खाण्याचा सल्ला दिला जातो.
- दुध आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं. लहान मुले असोत की वृद्ध सर्व वयोगटातील लोकांसाठी दुधाचं सेवन फायदेशीर आहे. दुधामध्ये कॅल्शियम आणि प्रथिनेसारखे पोषक घटक असतात. जे शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर ठरतात. उन्हाळा, हिवाळा की पावसाळा असो प्रत्येक ऋतूमध्ये निरोगी राहण्यासाठी नियमीत दूध प्या. थंड दुधाचे सेवन केल्यास अॅसिडीटीसारख्या समस्या दूर होवू शकतात. पचनासंबंधित समस्या नाहीशा होतात.
- रात्रीचं जेवण न केल्यास वजन कमी होते. रात्रीचं जेवण वगळल्यामुळं वजन कमी होत नाही. परंतु असे, केल्यास तणाव तर वाढतो. अशक्तपणादेखील वाढतो.
नैसर्गिकरित्या वजन कमी करण्याचे उपाय
- व्यायाम
- आहारात प्रथिने समाविष्ट करा.
- प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
- पौष्टिक पदार्थ आणि स्नॅक्सचा खा
- साखरेचे सेवन मर्यादित करा.
- भरपूर पाणी प्या.
- फास्ट फुड टाळा.
- फळे आणि भाज्यांचं सेवन जास्त प्रमाणात करा
- वेळोवेळी कॅलरी मोजा.
हेही वाचा
- कोणत्याही कॉस्मेटिकचा वापर न करता नेहमीच सुंदर दिसायचं का? आजच करुन पाहा योगासनांचे 'हे' प्रकार - face yoga exercise
- चेहरा तजेलदार होण्यासाठी आणि तरुण दिसण्यासाठी नियमित करा 'ही' योगासनं - YOGASAN
(ही माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. मात्र, कोणतेही Diet Plan स्वीकारण्यापूर्वी, आहारतज्ञांचा आणि डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या. यासोबतच, तुम्हाला तुमच्या दिनक्रमात व्यायामाचाही समावेश करावा लागेल.)