हैदराबाद Unwanted Hair on Face Reason: पुरुषांप्रमाणे महिलांच्या चेहऱ्यावर देखील केसं येतात. मात्र, महिलांच्या चेहऱ्यावरील केसं चर्चेचा विषय बनतो. त्यामुळे त्यांना समाजात वावरताना त्याचा त्रास होतो. काही महिला चेहऱ्यावरील केस काढण्यासाठी विविध ट्रिटमेंट करतात. परंतु तज्ज्ञांच्या काही टिप्स फॉलो केल्यास अनवॅान्टेड केसांची समस्या दूर होवू शकते.
चेहऱ्यावर केस येण्याची कारणं : तज्ज्ञांच्या मते, अधिवृक्क ग्रंथींमधील समस्यांमुळे काही स्त्रियांच्या शरीरामधून कोर्टिसोल फारच कमी प्रमाणात सोडलं जातं. याला 'एड्रेनल हायपरप्लासिया' म्हणतात. शरीरात कॉर्टिसोल तयार होण्याचं प्रमाण कमी झाल्यामुळे महिलांमध्ये देखील पुरुषांप्रमाणेच दाढी वाढण्याची शक्यता असते. मात्र, ही समस्या पंधरा हजार महिलांपैकी एकालाच होऊ शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. कॉर्टिसोल कमी असतानाच नाही, तर जेव्हा कोर्टीसोल आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सोडलं जाते, तेव्हा सुद्धा चेहऱ्यावर नको असलेले केस वाढण्याची शक्यता असते. याला 'कुशिंग सिंड्रोम' म्हणतात. विविध वैद्यकीय कारणांमुळे तसंच स्टेरॉईड्स घेणाऱ्यांमध्ये देखील ही समस्या उद्भवू शकते. सांधेदुखी आणि दमा यांसारख्या समस्यांवर उपचारासाठी वापरल्या जाणाऱ्या औषधांमुळेही ही समस्या उत्पन्न होते.
गर्भनिरोधक गोळ्यांचा वापरामुळे धोका: पीसीओडीची समस्या असलेल्यामुळे सुद्धा चेहऱ्यावर केसांची वाढ होते. तसंच गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर केल्यामुळे शरीरामध्ये एंड्रोजनचा स्तर वाढतो. याशिवाय तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, ज्या लोकांचं वजन जास्त आहे, त्यांच्या चेहऱ्यावर केस वाढण्याची शक्यता असते.
अभ्यासानुसार: सन 2020 मध्ये प्रकाशित झालेल्या जर्नल ऑफ क्लिनिकल अँड एस्थेटिक डर्मेटोलॉजीनुसार, एंड्रोजन हार्मोन हे महिलांच्या हनुवटीवर नको असलेल्या केसांचे मुख्य कारण आहे. असं म्हटलं जाते की, हे पुरुष हार्मोन्स काही महिलांमध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात सोडले जातात, अशा लोकांमध्ये हनुवटी आणि वरच्या ओठांवर केस वाढण्याची शक्यता असते. कॅलिफोर्निया विद्यापीठातील त्वचाविज्ञानच्या डॉक्टर रोहिणी व्ही. शाह यांनी "हिरसुटिझम: अ रिव्ह्यू ऑफ द लिटरेचर" या संशोधनात मत नोंदवलं आहे.
नको असलेले केस असे काढता येतात? शरीरातील नको असलेले केस काढण्यासाठी अनेक लोक वॅक्सिंग, शेव्हिंग, थ्रेडिंग या पद्धती वापरतात. यासोबतच, तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, लेझर आणि इलेक्ट्रोलिसिस पद्धतींसह विविध प्रकारच्या क्रीम्सचा वापर करून नको असलेले केस काढता येऊ शकतात. तसंच काही महिलांमध्ये अतिरिक्त वजनामुळे ही समस्या उद्भवली असल्यानं वजन कमी केल्यास त्याना चांगला परिणाम होईल, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. तसंच हळद, साखरेचा मेण, कॉर्न स्टार्च इत्यादी वापरण्याचा सल्ला दिला जातो.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
संदर्भ