हैदराबाद Uric Acid Reducing Foods : आजारांची लागण होण्याचे कारण बहुतांश वेळा आपल्या शरीरातच असतं. त्यापैकी एक म्हणजे शरीरात युरिक ॲसिडचे प्रमाण वाढनं. स्त्री असो वा पुरुष सध्या सर्वच युरिक ॲसिडच्या समस्येनं त्रस्त आहेत. शरीराच्या उत्तम संचालनासाठी हे नियंत्रणात ठेवणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण डॅाक्टरांचे दार ठोठावतो मात्र, याबाबत परिणामकारक सल्ला देणारे मर्यादित आहेत. खाण्यात प्युरिनयुक्त पदार्थांचं प्रमाण वाढतं, तेव्हा रक्तात युरिक अॅसिडचे प्रमाण आपोआप वाढते. यामुळे किडनीचे फिल्टर निकामी होण्याचा धोका वाढतो. आपल्या आहारात काही बदल केलेत तर युरिक अॅसिडच्या समस्येला पळवून लावता येतं. डॅाक्टर त्यासाठी काय म्हणातात पाहुयात.
युरिक ॲसिड कसे तयार होते? पोषणतज्ज्ञ डॉ. श्रीलथा यांच्या मते, आपण जे अन्न खातो त्यात प्युरीन नावाचं रसायन असतं, जेव्हा शरीरात प्युरीनचे विघटन होते. तेव्हा युरिक ॲसिड तयार होतो, अशा प्रकारे तयार होणारं युरिक अॅसिड नेहमी लघवीद्वारे बाहेर टाकलं जातं. परंतु काहीवेळा जास्त प्रमाणात युरिक अॅसिड सोडल्यामुळं लघवी नीट होत नाही. रक्तामध्ये साठलेले युरिक अॅसिड क्रिस्टल्स बनतात आणि हे क्रिस्टल्स सांधे, मूत्रपिंड किंवा इतर ऊतींमध्ये जमा होतात. यामुळं हायपरयुरिसेमिया होतो. ज्याचं वजन अधिक असतं त्यांना युरिक अॅसिडची समस्या जास्त असते.
युरिक अॅसिड वाढल्यास काय होते? आपल्या शरीरात युरिक अॅसिडच्या पातळीत वाढ होणं चांगलं नाही. युरिक अॅसिड वाढल्यानं त्याचा थेट परिणाम किडनीवर होतो. याच्या वाढीमुळं लघवीला त्रास, उच्च रक्तदाब, सांधेदुखी, सूज आणि चालण्यात अडचण येण्याची शक्यता असते. अनेक अभ्यासातून असं दिसून आलं की, रक्तातील युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानं आयुर्मान सुमारे 11 वर्षे कमी होऊ शकतं. त्यामुळे ज्यांना युरिक ॲसिड जास्त आहे त्यांनी काही पदार्थ टाळावेत.
- हे पदार्थ टाळा
- थंड पेय
- दारू
- लाल मांस
- सी फूड
- प्रक्रिया केलेले पदार्थ
- वाटाणे
- पालक
- शेंगदाणे
- मनुका
- युरिक ॲसिड असलेल्या लोकांनी घ्यायचे अन्न
- व्हिटॅमिन-सी युक्त अन्न
- हंगामी फळं
- कॉफी, ब्लॅक कॉफी
- दूध आणि दुग्धजन्य पदार्थ
- भरपूर पाणी प्यावं
- बार्ली पाणी
- हिरवा चहा
- स्ट्रॉबेरीसह विविध फळे
- जर्दाळू
- चेरी
- ओमेगा फॅटी ऍसिड असलेले पदार्थ
- सोयाबीन आणि दुधासह सोया उत्पादने
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )