Beautiful Indian Railway Routes : भारतात काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत निसर्गसौंदर्याने पर्यटकांचं लक्ष वेधणारी अनेक शहरं आहेत. या पर्यटनस्थळांना भेट देणं हा प्रसन्न करणारा अनुभव असतो. जर आपण उत्तम रेल्वे मार्गांचा विचार केला तर, असे काही रेल्वे मार्ग आहेत ज्यांचं सौदर्यं अनेकांना पृथ्वीवर स्वर्ग पाहिल्याची अनुभूती आनंद देतं. हिरवीगार जंगलं, बॅकवॉटर, उंच पर्वत आणि दऱ्यांतून जाणारे रेल्वे मार्ग पर्यटकांना मोहिनी घालतात. तुम्हालाही रेल्वेनं प्रवास करायला आवडत असेल तर या मार्गांचा रेल्वे प्रवास निवडा. तुम्हाला रेल्वे प्रवासाचा मनसोक्त आनंद घेता येईल.
- दार्जिलिंग हिमालय रेल्वे (नवीन जलपाईगुडी-दार्जिलिंग)
रेल्वे प्रवासाचा आनंद घेण्यासाठी जगभरातून लोक दार्जिलिंगला येतात. प्रवास करतांना तुम्हाला चहाच्या बागा पाहण्याची संधी मिळते. हा मार्ग निश्चितच प्रसन्नतेचा शिडकावा करणारा आहे. इथलं हवामान आल्हाददायक आहे. हे वातावरण भारुन टाकणारं असतं.
- कोकण रेल्वे (महाराष्ट्र आणि कर्नाटक)
महाराष्ट्र आणि कर्नाटक दरम्यानचा रेल्वेमार्ग दऱ्याखोऱ्यांतून जातो. नद्या, तलाव, धबधबे, डोंगर अशी निसर्गाची लयलूट या मार्गावर अनुभवायला मिळते. हा रस्ता सुमारे 700 किमी लांबीचा असून यात 120 रेल्वे स्थानके आहेत. भारत आणि जगभरातील पर्यटक येथे भेट देतात. या रेल्वेमार्गावरुन प्रवास करताना देशातल्या सर्वात खडतर मार्गातून रेल्वेसाठी वाट काढणाऱ्या अभियंत्यांचं आणि तंत्रज्ञांचं कौतुक करण्याचा मोह होतो.
- कांगडा व्हॅली रेल्वे (पठाणकोट-जोगिंदरनगर)
कांगडा व्हॅली रेल्वे ही भारतातील एक हेरिटेज ट्रेन आहे. जी पठाणकोट आणि जोगिंदरनगर दरम्यान नॅरोगेजमध्ये धावते. ही ट्रेन युनेस्कोच्या जागतिक ठेव्यापैकी एक आहे, जी पालमपूरमधील अनेक पूल आणि चहाच्या मळ्यांमधून जाते. या विशिष्ट मार्गावरुन ट्रेन जाताना पाहणं हा खरंच विलोभनीय अनुभव असतो.
- डेझर्ट क्वीन (जैसलमेर-जोधपूर)
जर तुम्ही लक्झरी ट्रीपसाठी थोडे जास्त पैसे खर्च करण्यास तयार असाल तर तुम्ही राजस्थानमधील जोधपूर शहर आणि जैसलमेरच्या गोल्डन सिटी दरम्यान धावणारी डेझर्ट क्वीन ट्रेनच्या पर्यायाचा अवश्य विचार करायला हवा. ही ट्रेन तुमच्यासाठी उत्तम आहे. सोनेरी वाळूची सुंदर दृश्यं तुमचा प्रवास आणखी स्मरणीय करतील. हा मार्ग राज्यस्थानच्या थार वाळवंटातील कोरड्या जंगलातून जातो.
निलगिरी माउंटन रेल्वे (मेट्टुपालयम-उटी)
2005 मध्ये, निलगिरी माउंटन रेल्वे अधिकृतपणे UNESCO जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित करण्यात आली. निलगिरी माउंटन (मेट्टुपालयम-उटी) रेल्वे हा 46 किमी लांबीचा एकल रेल्वे मार्ग आहे. जो मेट्टुपालयम शहराला उत्तरमंडलम शहराशी जोडतो. 46 किमीच्या प्रवासात 208 वळणं, 16 बोगदे आणि 250 पूल आहेत. प्रवासादरम्यान, आपण घनदाट जंगलं आणि बोगद्यांमधून सुंदर दृश्य पाहू शकता.
- माथेरान हिल रेल्वे (माथेरान-नराइल)
माथेरान हे महाराष्ट्रातील एक छोटंसं हिल स्टेशन हे पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र आहे. सुमारे 2650 किमी उंचीवर आहे. नरेल आणि माथेरान दरम्यान टॉय ट्रेनने डोंगराच्या माथ्यावरचा प्रवास खूपच रोमांचक आहे. या रेल्वे प्रवासामध्ये 121 छोटे पूल आणि सुमारे 221 वळणे आहेत. या मार्गावरील गाड्यांचा वेग ताशी 20 किमीपेक्षा जास्त नाही. नरेलपासून माथेरानपर्यंतचे नजर जाईल तिथपर्यंत सृष्टीचं सौंदर्य पाहायला मिळतं.
हेही वाचा