हैदराबाद Tongue Color Shows Body Health : तुमचे डोळे, नखं आणि जिभेचा रंग तुमच्या आरोग्याविषयी बरचं काही सांगतो. मानवाचे संपूर्ण अवयव पद्धतशीरपणे कार्य करतात. कोणत्याही अवयवातील थोडासा दोषही संपूर्ण शरीराचं आरोग्य बिघडू शकतो. अन्न गिळण्यापासून ते मेंदूत चाललेले विचार व्यक्त करण्याचं काम जीभ करते. जिभेच्या रंगामध्ये थोडासा बदल तुमच्या आरोग्याची माहिती दर्शवितो
पूर्वीच्या काळात अनेक डॉक्टर केवळ जीभ आणि डोळे बघूनच आजारांची माहिती देत असत. आताही डॉक्टरांकडे गेल्यास ते आपल्या जीभ दाखवा, असं म्हणतात. कारण जिभेचा रंग तुमच्या आरोग्यबद्दल बरीच माहिती देत असतो. निरोगी व्यक्तीची जीभ सामान्यतः हलकी गुलाबी दिसते. तिच्यावर केराटिनचा हलका पांढरा थर असतो. सामन्यतः जीभ गुळगुळीत, सपाट आणि पॅपिले नावाच्या लहान अडथळ्यांनी झाकलेली असते. यामुळे चव, अन्नाचा स्पर्श, तापमान जाणवतो.
जीभ पांढरी होण्याचं कारण : पांढरी जीभ असणाऱ्यांनी सावध राहावं. जिभेवर असलेले पांढरे डाग थ्रश नावाच्या यीस्ट संसर्गाचं लक्षण असू शकते. पाढऱ्या रंगाची जीभ तुमच्या तोंडाचं आरोग्य खराब आणि शरीरात डिहायड्रेडची समस्या दर्शविते. पांढरे डाग कधीकधी तोंडाच्या कर्करोगाचे लक्षणंदेखील असू शकते.
तपकिरी किंवा काळी जीभ : जेव्हा फिलीफॉर्म पॅपिली लांबलचक आणि रंगीबेरंगी होते, तेव्हा जीभ काळी दिसते. हे कोणत्याही गंभीर स्थितीचे लक्षण नाही. अस्वच्छता, धूम्रपान, कॉफी किंवा चहाचे जास्त सेवन किंवा अॅंटिबायोटिक्स जास्त वापरामुळे जीभ काळी होवू शकते.
चमकदार लाल जीभ : जर तुमच्या जीभेचा रंग लाल असेल तर शरीरात फॉलिक अॅसिड किंवा व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असू शकते. तसंच जिभेचा हा रंग रक्ताशी संबधित विकार किंवा हृदयविकार दर्शवते.
जांभळी जीभ : जांभळा रंग रक्तातील ऑक्सिजनची कमतरता दर्शवतो. श्वसन किंवा हृदयाच्या समस्यांशी संबंधित हे लक्षण आहे. ते सायनोसिसचे लक्षण देखील असू शकतं. जीभ जांभळी दिसल्यास त्वरीत डॉक्टरांशी संपर्क साधावा. कारण हे अयोग्य रक्तभिसरणाचं लक्षण आहे.
पिवळी जीभ : तुमची जीभ फिकट पिवळी असेल तर याचा अर्थ तुम्हाला पचन किंवा पोटाशी संबंधित काही समस्या आहेत. पिवळी जीभ मधुमेह आणि कावीळचे लक्षण देखील असू शकते. तसंच काही प्रकरणांमध्ये हे यकृत किंवा पित्ताशयाच्या समस्या दर्शवते.
अधिक माहितीसाठी या खालील लिंकवर क्लिक करा
https://www.health.harvard.edu/blog/what-color-is-your-tongue-whats-healthy-whats-not-202309132973
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )
हेही वाचा