ETV Bharat / health-and-lifestyle

'या' 6 सवयी तुम्हाला ठेवतात कर्करोगापासून लांब; जाणून घ्या तंदुरुस्त राहण्याचा फॉर्म्युला - Tips to Prevent Cancer - TIPS TO PREVENT CANCER

Tips to Prevent Cancer सकस आहार आणि आरोग्यदायी पेयांचा आहारामध्ये समावेश केल्यास कर्करोगाचा धोका कमी होतो. तसंच दैनंदिन जीवनात काही बदल केल्यास तुम्ही कर्करोगापासून दूर राहू शकता. वाचा संपूर्ण बातमी...

Tips to Prevent Cancer
कर्करोगापासून सावधान (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Aug 21, 2024, 2:51 PM IST

Updated : Aug 21, 2024, 3:48 PM IST

हैदराबाद Tips to Prevent Cancer दिवसेंदिवस कर्करोग होण्याचं प्रमाण वाढलं आहे. कर्करोग या जागतिक धोक्यापासून स्वतःचं रक्षण करण्यायचं असेल तर, तुम्हाला जीवनशैलीत काही बदल करण्याची नितांत गरज आहे. लंडनच्या कॅन्सर रिसर्च सेंटरच्या अभ्यासानुसार जीवनशैलीत काही बदल केल्यास तुम्ही कर्करोगासारख्या भयावह आजारापासून स्वतःचं बचाव करू शकता.

कर्करोग होण्याचा धोका वेगवेगळ्या गोष्टींवर अवलंबून असतो. एका संशोधनावरून असं निकष काढण्यात आलं की, धुम्रपान न केल्यास तसंच वजन नियंत्रणात ठेवल्यास तुम्ही कर्करोगाचा सारख्या गंभीर आजाराला स्वतःपासून दूर ठेवू शकता. आरोग्यदायी जीवनशैली आत्मसात करुन सुखी जीवन जगू शकता.

  • धूम्रपान करु नका : कर्करोगापासून बचाव करायचं असेल तर धूम्रपान करु नका. तंबाखूमधील विषारी द्रव्ये केवळ फुफ्फुसांवरचं नव्हे तर संपूर्ण शरीरावरही थेट परिणाम करतात. जर तुम्हाला सुदृढ राहायचं असेल तर धूम्रपानाची सवय सोडावी लागेल.
  • वजन नियंत्रित ठेवा : अयोग्य खानपानामुळे लठ्ठपणाचं प्रमाण वाढत आहे. वजन अधिक असल्यास शरीरात इस्ट्रोजेन आणि इन्सुलिनसारखे हार्मोन्स वाढू शकतात. यामुळे कर्करोगाच्या वाढीस चालना मिळते. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार घेतल्यास तुम्ही वजन नियंत्रित ठेवू शकता. वजन नियंत्रणात राहिल्यास तुम्ही स्तन, प्रोस्टेट, फुफ्फुस, कोलन आणि किडनी यासारख्या विविध कर्करोगांपासून दूर राहू शकता.
  • सकस आहार घ्या : सकस आहारामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. फळं, भाजीपाला, कडधान्य, फायबर आणि प्रथिने असलेले संपूर्ण धान्यांचा आहारामध्ये समावेश करा. प्रक्रिया केलेले आणि लाल मांस, अल्कोहोल तसंच उच्च कॅलरीयुक्त पदार्थ आणि पेयाचं सेवन कमी करा.
  • सुर्यप्रकाश घ्या : दररोज पुरेशा प्रमाणात सुर्यप्रकाश घेतल्यास त्वचेच्या कर्करोगाचा धोका कमी होवू शकतो. परंतु अतिरिक्त सुर्यकिरणांमुळे तुम्हाला त्वचे संबंधित आजार उद्भवू शकतात. त्यामुळे संपूर्ण फुल शर्ट तसंच सनस्क्रीन वापरा.
  • मद्यपान टाळा : अल्कोहोलचे सेवन कमी केल्यास सात प्रकारच्या कर्करोगांचा धोका कमी होतो. अति प्रमाणात मद्यपान केल्यानं रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. परिणामी कर्करोगासह इतर आजारांचा धोका होतो.
  • एचव्हपी लस आवश्यक : 11 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांना दिलेली हिपॅटायटीस बी लस कर्करोगाचा धोका कमी करते. एका अभ्यासावरून असं दिसून आलं की, एचपीव्ही लस गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगावर 90 टक्के परिणामकारक ठरते.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचकांसाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. तुम्हाला 'ही' लक्षणं आढळल्यास ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घ्या! कारण अशू शकतो 'मंकीपॉक्स' - Monkeypox Symptoms
  2. सावधान! कंबरेचं घेर वाढत आहे तर तुम्हालाही अशू शकतो मधुमेह टाइप 2 - Diabetes Type 2

Last Updated : Aug 21, 2024, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.