How to Stop Falling Asleep at Work: कामाच्या वेळेत झोप येणं अनेकदा निराशाजनक ठरतं. दुपारच्या जेवणानंतर तर अलगत झोप येते. शरीर काम करण्यासाठी सहकार्य करत नाही. याचा परिणाम सहाजिकच आपल्या कामावर पडतो. कामावर नकळत दुर्लक्ष होतं आणि अनेकवेळा ही बाब आपल्या जॉबसाठी धोकादायक ठरू शकते. आपल्यापैकी बऱ्याच लोक या समस्येशी झूंज देत आहेत. या समस्येचं निराकरण कसं करावं, हे अनेकांना माहिती नसतं. चला तर जाणून घेऊ या तज्ज्ञांच्या मते यासाठी काय करायला हवं.
- रात्रीचे जेवण उशिरा खाणे : तज्ज्ञांच्या मते, रात्रीचे जेवण उशिरा केल्यानं पचनसंस्थेला हानी पोहोचते. यामुळे खाल्ल्यानंतर 3 ते 4 तासांनी झोपायला जाण्याचा सल्ला दिला तज्ञ देतात. तसंच रात्रीचं जेवण लवकर करण्याचा सल्ला दिला जातो. तज्ज्ञांच्या मते शक्यतो रात्री उशिरा खाणे टाळावं.
- इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर: आजकाल लोक झोपताना मोबाईल किंवा इलेक्ट्रॉनिक उपकरणांसोबत बराच वेळ घालवतात. यामुळे वेळ वाया जातो. कमी प्रकाशात इलेक्ट्रॉनिक उपकरणं वापरल्यानं आरोग्यावर परिणाम होऊ शकतो, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. शक्यतो जेवणाच्या वेळेपूर्वीपर्यंत इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर मर्यादित ठेवण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात.
- योग्य झोप देखील आवश्यक आहे : कामाच्या वेळी झोपणं टाळायचं असेल तर, रात्री उत्तम झोप होणं फार गरजेचं आहे. आपल्याला चांगली झोप घ्यायची असेल, तर आपला परिसरही चांगला असायला हवा. झोपण्याचं वेळापत्रक तयार करा. झोपण्याची एक वेळ निश्चित करा करा आणि नियमित त्याच वेळी झोपा. तज्ज्ञांचे म्हणणे आहे, की झोपण्यापूर्वी घरातील सर्व लाईट्स ऑफ करा, यामुळे तुम्हाला चांगली झोप लागेल. तसंच झोपेचं तयार केलेलं वेळापत्रक फॉलो केल्यास झोपण्यासंबंधित अनेक समस्यांचे निराकरण होईल.
- अल्कोहोलचं सेवन: मद्यपान केल्याने आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवू शकतात. झोपेच्या कमतरतेमुळे शरीराच्या आरोग्य व्यवस्थेवर परिणाम होतो, असं तज्ज्ञांचे म्हणणे आहे. झोपेच्या कमतरतेमुळे कोणतेही काम उत्तम प्रकारे केले जाऊ शकत नाही. यामुळे तुम्ही जितके अल्कोहोलपासून दूर राहाल तेवढं चांगलं.
- रात्रीच्या वेळी कॉफी आणि चहा पिऊ नका: कॉफी आणि चहामध्ये असलेलं कॅफिन झोपेला प्रतिबंध करते, असं अनेक अभ्यासातून समोर आलं आहे. रात्री चहा किंवा कॉफी प्यायल्यानं झोप येत नाही. तज्ज्ञांनी जेवणानंतर कॉफी आणि चहा न पिण्याचा सल्ला दिला आहे.
- निरोगी झोपेसाठी टिपा
- रात्री झोपण्यापूर्वी पुस्तक वाचण्याची सवय लावा.
- झोपण्यापूर्वी दुधात हळद टाकून प्यावं. यामुळे आरामात झोप येईल.
- तुम्ही ६ ते ८ तास झोपले पाहिजे. यामुळे चिडचिड, थकवा आणि कंटाळा येत नाही. तुम्ही दिवसभर उत्साही राहू शकता.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)