हैदराबाद Tea Vs Coffee Which Is Better : सकाळ- संध्याकाळ चहा किंवा कॉफी पिणे ही जवळपास सर्वच भारतीयांची सवय आहे. विशेषतः भारतीयांना त्यांच्या दिवसाची सुरुवात चहा आणि कॉफीने करायला आवडते. बरेच लोक दिवसभर सक्रिय राहण्यासाठी वारंवार चहा किंवा कॉफी पितात. पण चहा किंवा कॉफी पिण्याचे शरीरावर काय परिणाम होतात याचं तुम्ही कधी विचार केलाय? या दोघांपैकी काय अधिक फायदेशीर आहे? चहा आणि कॉफीचे आरोग्यदायी फायदे शोधण्यासाठी जगभरात अनेक संशोधने झाली आहेत. काही अभ्यासात चहाचे फायदे कमी प्रमाणात दिसून आले आहेत, तर काहींनी कॉफीचे फायदे दर्शविले आहेत.
चहा आणि कॉफी दोन्हीमध्ये कॅफिन असते? चहा आणि कॉफीमध्ये कॅफिन असते. यामुळे शरीर आणि मेंदू सक्रिय ठेवण्यास मदत होते. परंतु जास्त प्रमाणात कॉफी किंवा चहा प्यायल्यानं आरोग्यावर परिणाम होवू शकतो. या दोन्ही पेयांमध्ये काही हानिकारक पदार्थ असतात. यामुळे शरीराला हानी पोहचू शकते. नवी दिल्लीच्या अन्न आणि पोषण तज्ज्ञ दिव्या शर्मा म्हणाल्या, चहा आणि कॉफी या दोन्हींचे स्वतःचे फायदे आणि तोटे आहेत. ग्रीन टी आणि हर्बल टीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात आणि कॅफीनच प्रमाण कमी असते. तुम्हाला सक्रिय राहायचे असेल आणि चयापचय क्षमता वाढवायची असेल, तर कॉफी तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दोन्ही पेयांमध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि पॉलिफेनॉल असतात. हृदय आणि रक्तवाहिन्यासंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
- चहाचे फायदे
- अँटिऑक्सिडंट्स भरपूर: चहामध्ये कॅटेचिन्स आणि फ्लेव्होनॉइड्स सारखे अँटीऑक्सिडंट असतात. हे शरीरातील हानिकारक मुक्त रॅडिकल्स कमी करण्यास मदत करते. त्यामुळे कर्करोग आणि हृदयविकाराचा धोका कमी होतो.
- कमी कॅफिन: चहामध्ये कॉफीपेक्षा कमी कॅफीन असते. यामुळे शरीरावर त्याचा सौम्य प्रभाव पडतो.
- वजन कमी करते: ग्रीन टी सारखा चहा चयापचय वाढवण्यास मदत करते. तसंच वजन कमी करण्यासाठी उपयुक्त आहे.
- मेंदूला आराम मिळतो : चहामध्ये एल-थेनिन नावाचं अमिनो ॲसिड असते. यामुळे मेंदू शांत होतो. तसंच तणाव दूर करण्यासाठी देखील हे उपयुक्त आहे.
- चहाचे तोटे
- जास्त सेवनाने ऍसिडिटी : जास्त प्रमाणात चहा प्यायल्यानं ऍसिडिटी आणि गॅसचा त्रास होऊ शकतो.
- दातांवर डाग : चहा सतत प्यायल्यानं दातांवर पिवळे डाग पडतात.
- कॉफीचे फायदे
- उत्तम चयापचय : कॉफी चयापचय गतिमान करण्यास मदत करते. तसंच कॉफी वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे.
- मधुमेहाचा धोका कमी होतो : मध्यम प्रमाणात कॉफी प्यायल्यानं टाइप-2 मधुमेहाचा धोका कमी होतो.
- पार्किन्सन रोग : काही अभ्यासानुसार कॉफी प्यायल्यानं पार्किन्सन रोगाचा धोका कमी होतो.
- कॉफीचे दुष्परिणाम
- झोपेच्या समस्या : कॉफीमध्ये भरपूर कॅफिन असते, त्यामुळे झोपेवर परिणाम होतो आणि निद्रानाश सारख्या समस्या उद्भवतात.
- जास्त सेवनाने चिंता वाढते : जास्त कॉफी प्यायल्यानं हृदयाची गती वाढू शकते. तसंच रक्तदाब वाढू शकतो. परिणामी धडधड वाढते.
- ॲसिडिटीची समस्या : कॉफीच्या अतिसेवनानं ॲसिडिटी आणि छातीत जळजळ होण्याची समस्या वाढू शकते.
- प्रमाणात सेवन करा : डॉ. दिव्या शर्मा यांच्या मते, चहा असो की कॉफी, दोन्हीचे फायदे आणि तोटे वेगवेगळे आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्हाला काय प्यायचं आहे ते तुम्ही निवडू शकता. चहा आणि कॉफीचे सेवन प्रमाणात करावं. कोणत्याही गोष्टीचं अतिसेवन आरोग्यासाठी हानिकारक आहे. जर तुम्हाला दिवसातून दोनदा चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असेल तर ते शरीरासाठी हानिकारक असू शकते. जे लोक भरपूर चहा, कॉफी पितात, त्यांना सतत आम्लपित्त, डोकेदुखी आणि इतर कोणत्याही आरोग्याच्या समस्या जाणवत असतील तर त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)