ETV Bharat / health-and-lifestyle

'या' चार राशीसाठी असणार सूर्यग्रहण लाभदायक, वाचा सविस्तर - total solar eclipse 2024 - TOTAL SOLAR ECLIPSE 2024

Solar Eclipse 2024 : वर्षातील पहिले सूर्यग्रहण चैत्र अमावस्येला होणार आहे. 8 एप्रिल रोजी होणारे हे ग्रह कुठल्या राशीसाठी शुभ असणार याबद्दल जाणून घ्या...

Solar Eclipse 2024
सूर्यग्रहण 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 8, 2024, 5:30 AM IST

मुंबई Solar Eclipse 2024 : कॅलेंडरनुसार, 2024 वर्षातील पहिले सूर्यग्रहण उद्या म्हणजेच 8 एप्रिल 2024 रोजी होणार आहे. यावर्षी मीन राशीमध्ये चैत्र अमावस्येला सूर्यग्रहण होणार आहे. सूर्यग्रहण ही खगोलीय घटना आहे. जेव्हा चंद्र, सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये येते तेव्हा या घटनेला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहण हे वैज्ञानिक आणि धार्मिक दोन्ही कारणांसाठी महत्त्वाचे मानले जाते. सूर्यग्रहण हे रात्री 9:12 वाजता सुरू होईल, संपूर्ण सूर्यग्रहण रात्री 10:08 वाजता दिसेल आणि 9 एप्रिल रोजी पहाटे 2:22 वाजता समाप्त होईल. चैत्र महिन्यातील सूर्यग्रहणाचा कालावधी 05 तास 10 मिनिटांचा असणार आहे. ज्योतिषाशास्त्रानुसार असे सूर्यग्रहण सुमारे 50 वर्षांनी होणार होत आहे.

संपूर्ण सूर्यग्रहण : या सूर्यग्रहणाची मध्यवर्ती वेळ रात्री 11.47 वाजता असेल. हे संपूर्ण सूर्यग्रहण असेल. हे सूर्यग्रहण मीन आणि रेवती नक्षत्रात होणार आहे. हे ग्रहण भारतात दिसणार नाही, त्यामुळे सूतक काळ मानले जाणार नाही. या ग्रहाणाचा काही फारसा परिणाम होणार नाही. सूर्यग्रहण केव्हा आणि कोठे पाहता येईल याबद्दल आम्ही तुम्हाला सांगतो. 2024 चे पहिले सूर्यग्रहण आर्क्टिक, अटलांटिक, उत्तर अमेरिका, कॅनडा, मध्य अमेरिका, मेक्सिको, दक्षिण अमेरिका आणि इंग्लंडच्या वायव्य भागात दिसेल. हे सूर्यग्रहण भारत आणि पाकिस्तान, नेपाळ आणि श्रीलंका या शेजारील देशांमध्ये पाहता येणार नाही. मेष ते मीन राशीपर्यंतच्या 12 राशींवरही सूर्यग्रहणाचा प्रभाव पडणार आहे. 2024मधील होणारे पहिले सूर्यग्रहण संपूर्ण सूर्यग्रहण असणार आहे. या ग्रहणाला खग्रास सूर्यग्रहण असेही म्हणतात. ज्योतिषाच्या दृष्टीकोनातून या ग्रहणाचे विशेष महत्व आहे.

'या' राशीसाठी असणार ग्रहण शुभ : मिथुन, वृषभ, कर्क आणि सिंह राशीसाठी हे ग्रहण शुभ असणार आहे. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणे हानिकारक मानले जाते. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहिल्यास डोळ्यांना इजा होऊ शकते, असे वैज्ञानिकांचे मत आहे. हे पाहण्यासाठी विशेष प्रकारचा काच किंवा चष्मा वापरावा. यामुळे सूर्याची हानिकारक किरणे तुमच्या डोळ्यांपर्यंत पोहोचणार नाहीत आणि तुमची रेटिना सुरक्षित राहतील. 26 डिसेंबर 2019 रोजी भारतात शेवटचे सूर्यग्रहण दिसले होते.

सूर्यग्रहणावरील खबरदारी

1. ग्रहण काळात देवाच्या मूर्तींना हात लावू नये. तसेच कोणत्याही मंदिरात प्रवेश करू नये.

2. सूर्यग्रहणामध्ये अन्न शिजवणे आणि खाणे देखील टाळावे.

3. सूर्यग्रहण काळात केस, दाढी, नखे ​कापणे टाळावे.

4. शक्य असल्यास ग्रहणच्या काळात घराबाहेर पडू नका.

5. सूर्यग्रहण काळात गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. सुतक काळापासून ग्रहण संपेपर्यंत कापणी, शिवणकाम, विणकाम टाळावे.

6. सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नका. नाहीतर डोळ्यांना इजा होऊ शकते.

हेही वाचा :

  1. प्लॅस्टिक सर्जरीनं मंदिरा बेदींचा चेहरा उद्ध्वस्त; यूजर्सला बसला धक्का - Mandira Bedi New Look
  2. 'जम्पिंग जॅक' जितेंद्रचा वाढदिवस: जाणून घ्या जितेंद्रच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल 'या' विशेष गोष्टी - happy birthday jeetendra
  3. रिहानाच्या कॉन्सर्टमध्ये श्रद्धा कपूरबरोबर कोण आहे? व्हिडिओ व्हायरल - shraddha kapoor and rahul modi

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.