Visa Free Countries For Indian: चुकूनच कुणी असेल ज्याला फिरणं पसंत नाही. आपल्यापैकी प्रत्येकजण किमान एकदा तरी विदेश वारी करण्याची स्वप्न रंगवत असतो. मात्र, पासपोर्ट आणि व्हिसा शिवाय विदेशात एंट्री मिळवणं अशक्य आहे. परंतु आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा देशांबद्दल सांगणार आहोत जेथे भारतीयांसाठी व्हिसा फ्री एंट्री आहे. या देशांमध्ये तुम्ही व्हिसामुक्त प्रवास करू शकता. तेथील विविध संस्कृतींचा जवळून अनुभव घेऊ शकता. हा अद्भुत अनुभव आपल्या जीवनात किमान एकदा तरी आपल्यापैकी प्रत्येकानं घ्यायला हवा. तर चला जाणून घेऊ या त्या सात देशांबद्दल जेथे तुम्ही व्हिसा शिवाय फिरण्याचा आनंद लुटू शकता.
- मालदीव : हे सर्वोत्तम हनिमून डेस्टिनेशन स्थळ आहे. येथे भारतीय नागरिकांसाठी व्हिसा मोफत आहे. समुद्रप्रेमी आपल्या सुट्ट्या आनंदात घालवण्यासाठी मालदीवला जातात. निळा समुद्र, स्वच्छ पाणी आणि वाळू हे पर्यटकांना आकर्षित करणारे मुख्य घटक आहेत. व्हिसाशिवाय तुम्ही मालदीवमध्ये 30 दिवस राहू शकता.

- इंडोनेशिया : नुकतेच इंडोनेशिया भारतासाठी व्हिसामुक्त प्रवेश निती लागू करण्याच्या तयारीत आहे. ऑक्टोबर महिन्यात या नितीला अंतीम स्वरुप दिले जाऊ शकते. जर तुम्ही फार पूर्वीपासूनच इंडोनेशिया फिरण्याची तयारी करत असाल तर, आता तुम्हीला व्हिसाची चिंता राहणार नाही. तब्बल ३० दिवस येथे व्हिसा शिवाय येथील बाली, सुमात्रा आणि जावा या नावाजलेल्या पर्यटन स्थळी जाऊ शकता. निसर्गाचा खरा आनंद तुम्हाला येथे मिळेल.

- मलेशिया: मलेशिया हे एक अतिशय सुंदर पर्यटन स्थळ आहे. हा देश त्याच्या प्राचीन बहुसांस्कृतिक जीवनशैलीसाठी ओळखला जातो. पेट्रोनास ट्विन टॉवर्स, बटू लेणी, लेगोलँड ही मलेशियातील प्रमुख पर्यटन स्थळे आहेत. जर तुम्हाला पर्वत, जंगल, वन्यजीव, समुद्रकिनारे आवडत असतील तर मलेशिया हे एक उत्तम ठिकाण आहे. येथे सुद्धा 30 दिवस व्हिसा फ्री एंट्री आहे.

- व्हिएतनाम: व्हिएतनाममध्ये आशियातील सर्वात मोठी गुहा आहे. येथे तुम्ही विविध बेटं, जंगलं, धार्मिक स्थळं आणि इतर अनेक मनोरंजक स्थळांचा आनंद घेऊ शकता. येथील शंख मलमल टेकडी हे विशेष आकर्षणाचे केंद्र आहे. व्हिएतनाम हे स्ट्रीट फूडसाठीही खूप लोकप्रिय आहे. स्ट्रीट फूडमध्ये तुम्ही नूडल्स सूप, विविध प्रकारच्या तांदळाच्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता.

- थायलंड: नोव्हेंबर 2023 मध्ये, थायलंडने भारतीयांसाठी व्हिसा मुक्त प्रवेशाची घोषणा केली. देशातील पर्यटनाला चालना देणे हा त्याचा उद्देश होता. थायलंडने भारताव्यतिरिक्त चीन आणि इतर काही देशांतील नागरिकांसाठी व्हिसामुक्त प्रवासाची घोषणा केली आहे. भारतीय नागरिक या वर्षी 11 नोव्हेंबरपर्यंत व्हिसाशिवाय या देशाला भेट देऊ शकतात. थायलंडमधील ग्रँड पॅलेस, खाओ याई नॅशनल पार्क हे पर्यटकांचे प्रमुख आकर्षण आहे.

- नेपाळ: नेपाळ आपल्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. नेपाळमध्ये तुम्ही हिमालय, हिरवीगार जंगलं, उंच पर्वत पाहू शकता. माउंट एव्हरेस्ट सोबतच जगातील 8 सर्वोच्च शिखरं नेपाळमध्ये आहेत. येथील बौद्ध विहार पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक नेपाळला भेट देतात. याशिवाय पशुपतीनाथ मंदिर, बौद्ध स्तूप, स्वयंभू महाचैत्य इत्यादी प्रमुख आकर्षणं आहेत.

- श्रीलंका: अलीकडेच श्रीलंकेनं भारतासह 34 देशांतील नागरिकांसाठी व्हिसा मुक्त प्रवासाची घोषणा केली आहे. हा देश विशेषत: त्याच्या रमणीय पर्यटक आकर्षणांसाठी ओळखला जातो. येथे तुम्ही रबन धबधबा, मिंटेल पर्वतरांगा, ॲडम्स पीक, सिगिरिया रॉक फोर्ट आणि प्रमुख पर्यटन स्थळांना भेट देऊ शकता. त्यामुळे जर तुम्हाला कमी बजेटमध्ये परदेशात फिरायचे असेल तर तुम्ही श्रीलंकेची योजना करू शकता.
या देशांव्यतिरिक्त भूतान, मॉरिशस, केनिया, इराण, डॉमिनिका, ग्रेनाडा आदी देशांत भारतीयांना व्हिसाशिवाय प्रवास करता येतो.]
हेही वाचा
ट्रीप प्लान करताय? रेल्वेचे ‘हे’ अविस्मरणीय प्रवास करून पाहा - Beautiful Indian Railway Routes