हैदराबाद Eye Health Tips : अनेकांचा संपूर्ण दिवस मोबाईल हाताळण्यातच जातो. लहानांपासून मोठ्यांपर्यत सर्वांच्या हातात आज स्मार्ट फोन आहे. सर्वाधिक स्मार्टफोन वापरणाऱ्या देशांच्या यादीत भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यासोबतच स्क्रीन टाईम वाढल्यामुळे देशात डोळ्यांच्या समस्यादेखील वाढत आहेत.
अनेकांचे कामच मोबाईलशी संबंधित असल्यामुळे स्क्रीन टाईमवर नियंत्रण ठेवता येत नाही. मात्र, डोळ्याच्या आजाराचं कारण फक्त मोबाईल नाही. सतत लॅपटॉप आणि संगणकासमोर काम केल्यामुळेदेखील डोळ्यांचा आजाराचा सामना करावा लागतो. चला तर मग जाणून घेऊया डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी डॉक्टरांच्या काही महत्त्वपूर्ण टिप्स.
अतिरिक्त स्क्रीन टाईमुळे उद्भवणाऱ्या समस्या
- डोळे कोरडे होणे : तासनतास स्क्रीनकडे पाहत राहिल्यास डोळ्यांच्या पृष्टभागाचं संरक्षण करणारा अश्रूंचा पडदा उघडा पडतो. त्यामुळे डोळे कोरडे होतात.
- डोळ्यांना थकवा येणे : स्क्रीन टाईम वाढल्यामुळे किंवा स्मार्टफोनचा दीर्घकाळ वापर केल्यामुळे डोळ्यांना थकवा येतो.
एज रिलेटेड मॅक्युलर डिजनरेशन : सहसा वृद्धांमध्ये ही समस्या आढळून येते. स्क्रीनमधून निघणाऱ्या निळ्या क्ष किरणांच्या जास्त संपर्कात आल्यामुळे रेटिनाला दुखापत होते. त्यामुळे एएमडी उद्भवू शकते. याकडे लक्ष न दिल्यास तुम्ही अधंत्वदेखील येण्याची भीती असते.
- दृष्टी धूसर होणे : मायोपिया किंवा नियर साइटेडनेस ही एक अशी समस्या आहे, ज्यात दूरच्या गोष्टी नीट दिसत नाही. अथवा दूरच्या गोष्टी धूसर दिसतात.
- डोळ्यांचं आरोग्य राखण्यासाठी डॉक्टरांच्या टिप्स?
- 20-20-20 नियमाच पाल करा : दर 20 मिनिटांनी 20-सेकंद ब्रेक घ्या. डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी 20 फूट दूर काहीतरी बघा. यामुळे डोळ्यांना जास्त थकवा येण्यापासून वाचवता येवू शकते, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे.
- डोळ्यांची उघडझाप करणे : डिजिटल उपकरणे वापरताना किंवा टीव्ही पाहताना डोळे ओले ठेवण्यासाठी तुम्ही नियमितपणे डोळ्यांची उघडझाप करणे.
- मुलांसाठी मैदानी खेळ : जवळच्या दृष्टीचा धोका कमी करण्यासाठी आणि त्यांच्या डोळ्यांना विश्रांती देण्यासाठी मुलांना घराबाहेर खेळण्यास प्रोत्साहित करा.
- सनग्लासेस घाला : UVA आणि UVB विकिरण 99 ते 100 टक्के अवरोधित करणारे सनग्लासेस घालून हानिकारक अतिनील किरणांपासून तुमच्या डोळ्यांचे संरक्षण करा.
- नियमित डोळ्यांची तपासणी करा : नियमित डोळ्यांची तपासणी करणे गरजेचं आहे. आवश्यकतेनुसार चष्मा किंवा कॉन्टॅक्ट लेन्सचे बदलत राहा.
- निरोगी जीवनशैली: हायड्रेटेड राहा, पौष्टिक पदार्थ खा आणि नियमित व्यायाम करा. डोळ्यांच्या संपूर्ण आरोग्यासाठी धूम्रपान टाळा.
- कृत्रिम अश्रू वापरा: कोरडेपणा दूर करण्यासाठी आणि डोळ्यातील आर्द्रता सुधारण्यासाठी ड्रॉप्सचा वापर करा.
- अधिक माहितीकरिता खाली दिलेल्या वेबसाईटवर भेट द्या
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC10777438/
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )