ETV Bharat / health-and-lifestyle

सावधान! हिवाळ्यात गीझरच्या पाण्यानं आंघोळ करणं पडेल महागात

हिवाळ्याची चाहूल लागताच गरम पाण्यानं आंघोळ करण्यासाठी गीझर किंवा हिटरचा वापर वाढतो. अनेक लोकं गरम पाण्याशिवाय अंघोळ करण्याचा विचारदेखील करत नाहीत.

Geyser Water Side Effect
गीझरचं गरम पाणी हानिकारक (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : Oct 26, 2024, 12:15 PM IST

Updated : Oct 26, 2024, 9:46 PM IST

Geyser Water Side Effect: हिवाळ्याला सुरुवात झाली आहे. हिवाळ्यात थंड पाण्यानं आंघोळ करणं हे जणू एक आव्हान असतं. यामुळे गरम पाण्यानं आंघोळ करण्यास बहुतांश लोक प्राधान्य देतात. पाणी गरम करण्यासाठी गीझर आणि वॉटर हिटरचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गरम पाण्यानं आंघोळ केल्यास शरीराला लगेच आराम मिळतो. थंडीपासून बचाव करण्याचा हा सहज आणि सोपा मार्ग आहे. कारण गरम पाण्यानं आंघोळ केल्यास शरीराचं तापमान वाढते. परंतु तुम्हाला माहिती आहे काय? गीझरच्या गरम पाण्यामुळे आरोग्यविषयक अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. चला तर जाणून घेऊया गीझरच्या पाण्यानं अंघोळ केल्यानं होणारे तोटे.

  • रक्तदाब वाढतो: गीझरच्या गरम पाण्यानं आंघोळ केल्यास शरीराचे तापमान वाढते. यामुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावू शकतात. परिणामी रक्तदाबाची समस्या वाढू शकते. जे उच्च रक्तदाबाच्या रुग्णांसाठी धोकादायक आहे. तसंच हृदयाच्या ठोक्यावरही परिणाम होण्याची शक्यता जास्त असते. यामुळे हिवाळ्यात अतिशय गरम पाण्यानं अंघोळ करणं टाळावं असं तज्ज्ञ सांगतात. रक्तदाब किंवा हृदयाशी संबंधित समस्या असलेल्या लोकांना गिझरच्या पाण्यानं आंघोळ करणं सहसा टाळावं.
  • शिरा ताणतात: गरम पाण्यानं जास्त वेळा अंघोळ केल्यास सांध्यावर आणि स्नायूंवर ताण पडतो. यामुळे स्नायू संबंधित समस्या उद्भवतात. जसं की स्नायू कडक होणे. तसंच संधीवातासारख्या भयंकर समस्या उद्भवू शकतात.
  • प्रजनन क्षमतेवर प्रभाव: 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ गरम पाण्यानं अंघोळ केल्यास प्रजनन क्षमतेवर प्रभाव पडू शकतो. कारण जास्त गरम पाण्यामुळे शुक्राणू कमजोर होऊन त्यांच्या निर्मितीवर परिणाम होऊ शकतो.
  • केसगळती: गरम पाण्यानं केस धुतल्यास केस गळतीची समस्या उद्भवते. गरम पाण्यामुळे केस कोरडे होतात आणि तुटतात. दीर्घकाळ केस धुण्यासाठी गरम पाणी वापरल्यास केसांच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. यामुळे केस धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करा. यानंतर केसांना कंडिशनर किंवा मॉइश्चराझिंग करा. यामुळे केस गळती कमी होऊ शकते.
  • त्वचेची समस्या: गरम पाण्यानं आंघोळ केल्यास त्वचा कोरडी पडू शकते. गरम पाण्यामुळे त्वचेवरील नैसर्गिक ओलावा निघतो. परिणामी त्वचा खडबडीत आणि कोरडी होते.
  • डिहायड्रेशन: गरम पाण्यानं अंघोळ केल्यास शरीराचे तापमान वाढते. यामुळे घाम जास्त येतो. त्याचबरोबर शरीरातील पाण्याची कमतरता होवू शकते. परिणामी डिहायड्रेशनची समस्या भेडसावते. यामुळे अंघोळीनंतर पाणी पिण्याचा सल्ला डॉक्टर देतात. यामुळे शरीराला पाण्याची कमतरता भरून निघते.
  • न्यूरोलॉजिकल समस्या: गॅस गीझरने होणाऱ्या अपस्मार आणि संबंधित कार्बन मोनोऑक्साइड नशा, या दोन्ही पूर्णपणे टाळता येणाऱ्या परिस्थिती आहेत. त्यासाठी गॅस गीझरचा वापर आणि प्रतिष्ठापन कायद्यांची कठोर आणि सार्वत्रिक अंमलबजावणी आवश्यक आहे.

संदर्भ

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3724084/#:~:text=%5B1%5D%20Such%20an%20episode%20is,a%20precipitating%20factor%20for%20epilepsy.

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC7900747/

https://pmc.ncbi.nlm.nih.gov/articles/PMC3724084/

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. प्रेशर कुकरमधून पाणी बाहेर येतं? वापरा या ट्रिक
  2. सणासुदीच्या काळात अशाप्रकारे करा स्वस्त विमान प्रवास
  3. लाल की हिरवे कोणते सफरचंद आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या
  4. यंदा साजरी करा अशी आगळी-वेगळी दिवाळी

Last Updated : Oct 26, 2024, 9:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.