ETV Bharat / health-and-lifestyle

मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावं? भात की चपाती, काय आहे सर्वोत्तम - IS RICE OR ROTI GOOD FOR DIABETES

मधुमेह ग्रस्त लोक आहारात भात घेताना संकोच करतात. चला तर जाणून घेऊया मधुमेह ग्रस्तांनी ते खावं की खाऊ नये?

Is Rice Or Roti Good For Diabetes
मधुमेहाच्या रुग्णांनी काय खावं (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Nov 22, 2024, 5:34 PM IST

Is Rice Or Roti Good For Diabetes: आजकाल लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वज जण मधुमेहाचे शिकार होत आहेत. मधुमेह झाल्यास खाण्यासंबंधित अनेक पथ्य पाडावी लागतात. परंतु, शिस्तबद्ध जीवनशैली, व्यायाम, आणि चांगल्या पोषक घटकांचा आहारात समावेश केल्यास मधुमेह टाळता येवू शकतो, असा सल्ला तज्ञांनी दिलाय. मधुमेह ग्रस्त आहारात भात खावं की चपाती या संभ्रमात असतात. बहुतांश लोक भितीपोटी भात खाणं टाळतात. तर, मधुमेह असलेल्यांनी भाताऐवजी चपात्या खाणं खरच चांगलं आहे का? या प्रश्नाचे स्पष्टीकरण सुप्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ यांनी केलं.

मधुमेह रूग्णांनी स्वतःसाठी एक विशेष आहार पाळला पाहिजे. रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित करण्यापूर्वी, तुमचे वजन कमी झाले आहे की नाही ते तपासा. वजन कमी असल्यास तुम्ही तुम्ही ते सामान्य पातळीवर वाढवावे. जर वजन जास्त असेल, तर तुम्ही वजन कमी केले पाहिजे. तसंच नियमित व्यायाम केला पाहिजे.

डॉ जानकी श्रीनाथ, पोषणतज्ञ

काय खावं? पोषणतज्ञ डॉ. जानकी श्रीनाथ यांनी सांगितले की, भात किंवा चपात्या खाल्ल्यानं रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित राहण्यात फारसा फरक पडत नाही. शरीराला लागणारी उर्जा कमी करण्यासाठी आपण पुरेशा कॅलरी वापरत आहोत की नाही हे तपासनं पुरेसे आहे. परंतु भात खातांना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. तसंच चपात्या देखील प्रमाणात खाल्लाय पाहिजेत.

भात आणि चपात्या काहीही खात असलात तरी त्यासोबत हिरव्या भाज्या, भाज्यांची कोशिंबीर, तंतुमय पदार्थ आणि पुरेशी प्रथिने घ्यावीत, असे म्हणतात. कारण हे खाल्ल्याने ग्लुकोज हळूहळू बाहेर पडते आणि भूक कमी होते. पुरेसा पोषण आहार घेण्यासोबतच शारीरिक हालचाली केल्या पाहिजे. कारण यामुळे रक्तातील साखरेचे चढउतार सहन करण्याची ताकद येते, असं तज्ञांनी सांगितलं.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसाठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)

हेही वाचा

  1. केवळ पचनाच्या समस्यांपासून सुटका नाही तर लैंगिकता सुधारण्यासाठी सर्वोत्तम आहे वेलची
  2. मधुमेहाचे रुग्ण काळे चणे खाऊ शकतात का?
  3. मधुमेहाच्या रुग्णांसाठी वरदान आहेत 'हे' पदार्थ; सकाळी उपाशी पोटी घेतल्यास रक्तातील साखर राहिल नियंत्रणात

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.