हैदराबाद Reduce side effects of salt : बाजारात विविध प्रकारचे मीठ उपलब्ध आहेत. जसं की, टेबल मीठ, समुद्री मीठ, सैंधव मीठ, काळे मीठ, कोशेर मीठ. प्रत्येकांच्या किचनमध्ये त्यांच्या सोईनुसार यातील एक किंवा दोन प्रकारचे मीठ असणारच. पदार्थाला चव देणारा मीठ हा अविभाज्य घटक आहे. पदार्थांमध्ये मीठ कमी झालं तर ते चविष्ट लागत नाही. परंतु मिठाचं प्रमाण जास्त झालं की सगळ गणित बिघडतं. हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यासाठी अन्नातील सोडियमच्या प्रमाणावर लक्ष ठेवणं आवश्यक आहे. त्यामुळे दररोज 1500-2000 एमजी पेक्षा जास्त सोडियमच सेवन करू नये. पॅकबंद खाद्यपदार्थांमध्ये सोडियमचं प्रमाण जास्त असतं म्हणून, आपल्या आहारात कमी सोडियमयुक्त पदार्थांची निवड करावी. जाणून घ्या, कोणत्या पदार्थांमध्ये जास्त सोडियम असते?
जास्त सोडियम युक्त पदार्थ खालीलप्रमाणे
- मीठ क्रिस्टल युक्त पदार्थ : यामध्ये चिप्स, बॉक्स्ड मैक, चीज, इन्स्टंट ओटमील आणि इन्स्टंट कोको मिक्सचा समावेश आहे.
- मीठ असलेले मसाले : प्रत्येकाच्या स्वयंपाक घरामध्ये सोया सॉस, वॉर्सेस्टरशायर सॉस, बारबेक्यू सॉस, बेकिंग सोडा, बेकिंग पाउडर आणि इन्स्टंट सूप मिक्स आदी मसाले वापरली जातात. पंरतु यामध्ये मीठ सुद्धा असतं. त्यामुळे मिठीचं प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मसाल्यांबाबत लक्ष देणं गरजेचं आहे.
- फ्रोझन आणि कॅन केलेलं झटपट जेवण : यामध्ये तांदूळ आणि नूडल मिक्स, बॉक्स्ड मॅक आणि चीज, इन्स्टंट ओटमील आणि इन्स्टंट कोको मिक्स यांसारखे पॅक केलेलं जेवण समाविष्ट आहे.
- तयार मिक्स किंवा बेक केलेले पदार्थ : ज्या पदार्थांमध्ये तुम्ही फक्त पाणी घालता किंवा कॉर्नब्रेड, मफिन्स, पॅनकेक्स, बिस्किटे आणि केक यांसारखे काही घटक यामध्ये येतात.
- डब्बा बंद असलेले मांस : यामध्ये हॅम, बेकन, सॉल्ट पोर्क, सॉसेज, कोल्ड कट्स (जसे की बोलोग्ना आणि सलामी), हॉट डॉग आणि स्पॅम यांचा समावेश आहे.
- मसाले आणि इतर टॉपिंग्स : यामध्ये लोणचे, केचप, ऑलिव्ह, तयार मोहरी आणि व्यावसायिकरित्या तयार केलेले सॅलड ड्रेसिंग यांचा समावेश आहे.
- उच्च-सोडियम दुग्धजन्य पदार्थ : यामध्ये कॉटेज चीज, प्रक्रिया केलेले चीज स्प्रेड, पनीर आणि ताक यांचा समावेश होतो.
- प्रक्रिया केलेले पदार्थ आणि कॅन केलेले पदार्थ : पॅकबंद भाज्या, कॅन केलेला सूप, पॅक केलेले बीन्स, स्टू, मिरची, टोमॅटो, स्पॅगेटी, पिझ्झा सॉस आणि बेक केलेले पदार्थ तसंच प्रिझर्व्हेटिव्जमध्ये सर्वांधिक प्रमाणात सोडियम असते.
- पोटॅशियमचा वापर : रक्तदाब कमी करण्यासाठी तुमच्या आहारातील सोडियमची ऐवजी पोटॅशियमचा समावेश करा. एका संशोधनानुसार, पोटॅशियम रक्तदाबावरील सोडियमचा प्रभाव कमी करण्यास मदत करतं. त्यामुळे स्ट्रोकचा धोकाही कमी होतो. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या आहारात पुरेसं पोटॅशियम नसतं. त्यामुळे पोटॅशियम युक्त फळं आणि भाज्यांचा समावेश आहारामध्ये करावा.
- पोटॅशियम समृद्ध भाज्या : यामध्ये बटाटे, टोमॅटो, पालक, मनुका, लिमा बीन्स आणि मसूर यांचा समावेश आहे.
- पोटॅशियम समृद्ध फळं : यामध्ये संत्रा, टरबूज, केळी आणि खरबूज यांचा समावेश होतो.
काही लोकांनी उच्च-पोटॅशियमयुक्त आहार घेऊ नये. विशेषतः तुम्ही काही औषधं घेत असाल. तर तुमच्या डॉक्टर किंवा आहारतज्ञांकडून खात्री करून घ्या.
यात दिलेली माहिती https://health.ucdavis.edu/blog/good-food/your-guide-to-low-sodium-eating-and-how-to-lower-blood-pressure/2022/09 या वेबसाईट वरून घेतली आहे.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )