Best Places To Visit In Kerala: केरळ हे भारतातील एकमेव राज्य आहे, जे त्याच्या वैविध्यपूर्ण लँडस्केप, संस्कृती आणि इतिहासामुळे सर्वांपेक्षा वेगळं आहे. केरळच्या विपुल निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. जंगलं, पर्वत, समुद्र, खडक आणि नद्यांनी समृद्ध असलेल्या छोट्या केरळमध्ये अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांना एकदा तरी भेट द्यायलाच हवी.
- मुन्नार: मुन्नार हे हिरवळीनं नटलेलं हिल्स स्टेशन आहे. तसंच हे थंड हवेचं ठिकाण असून येथे चहा-कॉफचे मळे आहेत. समुद्रसपाटीपासून त्याची उंची अंदाजे 1600 किलोमीटर इतकी आहे. येथील अल्हाददायक वातावरण पर्यटकांना आकर्षित करते. हनीमून कपल्ससाठी मुन्नार लोकप्रिय आहे.
![Best Places To Visit In Kerala](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-10-2024/22758879_kerla-6.jpg)
- वेंबनाड बॅकवॉटर: चार जिल्ह्यांमध्ये पसरलेलं वेंबनाड हे केरळमधील सर्वात मोठे बॅकवॉटर आहे. तसंच हे देशातील सर्वात लांब तलाव देखील आहे. हाऊसबोट्स हे येथील मुख्य आकर्षण आहे. आंतरराष्ट्रीय पर्यटकांचं हे आवडतं ठिकण आहे.
![Best Places To Visit In Kerala](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-10-2024/22758879_kerla-2.jpg)
- कोवलम: कोवलमला दक्षिण भारतातील स्वर्ग म्हणून ओळख आहे. हे स्थळ केरळची राजधानी तिरुअंतपुरमपासून 16 किलोमीटर अंतरावर वसलेलं आहे. येथे उंचच-उंच नारळाची झाडं पर्यटकांचं मन मोहून टाकतात. येथील समुद्रकिनारा आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे.
![Best Places To Visit In Kerala](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/25-10-2024/22758879_kerla-1.jpg)
- गवी: गवीचे मुख्य आकर्षण म्हणजे जंगल आणि वन्य प्राणी. हे एक निसर्ग अनुकूल पर्यटन केंद्र आहे जे अनेक पर्यटकांना आकर्षित करते. ट्रेकिंग, वन्यजीव निरीक्षण, आऊटडोअर कॅम्पिंग, नाईट फॉरेस्ट टूर इत्यादी येथील वैशिष्ट्ये आहेत.
- तेनमाला: तेनमाला सारखी निसर्गाशी सुसंगत अशी दुसरी जागा नाही. कोल्लम जिल्ह्यात असलेले तेनमाला हे देशातील पहिलं इको-टूरिझम डेस्टिनेशन आहे. बाग, टेकड्या आणि जंगले असलेली एक नैसर्गरम्य ठिकाणं आहे.