ETV Bharat / health-and-lifestyle

दुध प्यायचा येतो कंटाळा? मग आहारात समाविष्ट करा 'हे' कॅल्शियम रिच फूड - Non Dairy Rich Calcium Foods - NON DAIRY RICH CALCIUM FOODS

Non Dairy Rich Calcium Foods : कॅल्शियम आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे. त्यामुळे हाडं मजबूत होतात. परंतु आपल्यापैकी अनेकांना दूध पिणं आवडत नाही. तर जाणून घेऊया मुबलक प्रमाणात कॅल्शियमची मात्रा असलेले घटक.

Non Dairy Rich Calcium Foods
कॅल्शियम रिच फूड (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Health Team

Published : Sep 3, 2024, 12:06 PM IST

Updated : Sep 3, 2024, 12:25 PM IST

हैदराबाद Non Dairy Rich Calcium Foods : शरीरातील हाडं मजबूत ठेवण्यासाठी कॅल्शियम महत्वाचा घटक आहे. दुग्धजन्य पदार्थांना कॅल्शियम रिच फूड म्हणून ओळखलं जातं. मोनोपॉजदरम्यान आणि डिलिव्हरीनंतर महिलांमधील कॅल्शियमची पातळी खूप कमी होते. परंतु आपल्यापैकी बऱ्याच जणांना दूध पिणं आवडत नाही. अशा परिस्थिती आपल्याला नाक मुरडत दूध प्यावं लागतं. परंतु आजच्या लेखात आम्ही तुम्हाला कॅल्शियमयुक्त अशा घटकांची माहिती देणार आहोत, ज्यामुळे तुम्हाला दूध न पिता शरीरारील कॅल्शियमचं प्रमाण सुरळीत राखता येईल. चला तर मग त्या कॅल्शियम युक्त घटकांबद्दल जाणून घेऊया.

मोरिंगा किंवा ड्रमस्टिक : प्रसिद्ध पोषणतज्ञ डॉ. अंजली यांच्या मते, ज्यांना दुग्धजन्य पदार्थ आवडत नाहीत त्यांनी मोरिंगा पाउडर किंवा ड्रमस्टिक(शेवग्याच्या शेंगा) सेवन करणं फायदेशीर आहे. मोरिंगामध्ये मुबलक प्रमाणात कॅल्शियम असतं. त्यामुळे गुडघेदुखी आणि सांधेदुखीपासून आराम मिळतो.

नाचणी : जर तुम्हाला दूध आवडत नसेल, तर तुमच्या आहारात नाचणीचा समावेश करून तुम्ही पुरेसे कॅल्शियम मिळवू शकता. 100 ग्रॅम नाचणीमध्ये 300 मिलीग्राम कॅल्शियम असते. नाचणीच्या सेवनामुळे शरीराला (नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन अहवाल) मुबलक प्रमाणात कॅल्शियम मिळतो. यामुळे हाडं मजबूत राहतात.

भोपळ्याच्या बिया : जर तुम्ही गुडघे आणि सांधेदुखीनं त्रस्त असाल तर भोपळ्याच्या बियांचं सेवन फायदेशीर मानलं जातं. ज्या लोकांना दूध आवडत नाही त्यांनी आपल्या आहारात त्याचा समावेश केल्यास त्यांना अधिक कॅल्शियम मिळेल आणि त्यामुळे हाडांचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत होईल.

रताळे : रताळे कॅल्शियमचे उत्तम स्त्रोत आहे. शिवाय रताळ्यामध्ये सेवनाने पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी देखील पुरेशा प्रमाणात असतो. यामुळ केस, त्वचा, डोळे तसंच रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. एका मोठ्या रताळ्यात सुमारे 68 मिलीग्राम कॅल्शियम असते.

कोरडे अंजीर : ज्यांना कॅल्शियमची कमतरता असेल त्यांनी नियमित सुक्या अंजीराचं सेवन करावं. यामध्ये भरपूर फायबर तसंच अ‍ॅंटिऑक्सिडेंट्स आहेत. याच्या सेवनानं तुम्हाला जास्त वेळ भूक लागत नाही. अंजीरच्या सेवनानं बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.

(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा. )

हेही वाचा

  1. भोपळ्याचे आश्चर्यकारक फायदे; नियमित बियांचं सेवन केल्यास पुरुषांमधील 'ही' समस्या होईल दूर - PUMPKIN SEEDS BENEFITS
  2. फक्त अन्नच नाही, पोटाची चरबी वाढण्यामागं 'ही’ आहेत मुख्य कारणं - Causes For Belly Fat

Last Updated : Sep 3, 2024, 12:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.