Is Coffee Safe For Pregnant Women: काही लोकांना सकाळी उठल्याबरोबर कॉफी पिण्याची सवय असते. तर, काही लोक उशिरापर्यंत जागण्याकरिता कॉफी घेतात. तसंच अनेक लोक दिवसभराचा थकवा दूर करण्यासाठी कॉफीचं सेवन करतात. कॉफीप्रेमींना जोपर्यंत कॉफी मिळत नाही तोपर्यंत त्यांचा मूड ठिक होत नाही. कॉफी पिण्याचे आरोग्यविषयक जेवढे फायदे आहेत तेवढे तोटे देखील आहेत. गरोदरपणामध्ये कॉफी पिण्याबाबत देखील अनेंकाना शंका असते की, कॉफी प्यायल्यानं मुलाच्या वाढीवर परिणाम होईल. जन्माला येणाऱ्या मुलांच वजन कमी होईल. अशा अनेक काळजी वजा भीती बहुतांश लोकांना असते.
कॉफीमधील कॅफिनचा मुलांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो, असं मानलं जाते. यामुळे गरोदर महिलांना कॉफीपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो. ज्या महिला कॉफीच्या खूप शौकीन असतात त्या गरोदरपणात कॉफीपासून कोसो दूर राहतात. गर्भधारणेदरम्यान आपण खरोखर कॉफी पिऊ नये का? कॉफी प्यायल्यास मुलाच्या आरोग्यास हानी पोहोचते का? असे अनेक प्रश्न आपल्याला पडतात. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात काही बाबी पुढं आलेल्या आहेत. संशोधनात काय आहे? संशोधनात काय आढळलं? याबद्दल पाहूया.
संशोधन काय म्हणतो: दरोदरपणादरम्यान कॉफी पिणं सुरक्षित असल्याचं संशोधनात सिद्ध झालं आहे. गरोदरपणामध्ये कॉफीचे मध्यम सेवन केल्यास बाळाच्या मेंदूच्या विकासावर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही, असा निष्कर्ष काढण्यात आलाय. ऑस्ट्रेलियातील ' द युनिव्हर्सिटी ऑफ क्वीन्सलँड'च्या डॉ. गुन-हेलन मोएन यांनी खुलासा केला की, गरोदरपणामध्ये कॉफी प्यायल्यानं जन्मत: कमी वजन आणि गर्भपात होण्यासारखे काही नसते.
दहा हजार कुटुंबीयांवर संशोधन: या अभ्यासात 10 हजार कुटुंबांची माहिती गोळा करण्यात आली. गरोदरपणापूर्वी आणि गरोदरपणानंतर कॉफीचे सेवन विचारात घेतले आहे. या संशोधकांनामध्ये असं आढळून आलं आहे की, गरोदरपणात कॉफी पिल्याने बाळाच्या मेंदूवर कोणताही नकारात्मक परिणाम होत नाही. दरम्यान, तज्ञांनी सुचवले आहे की गर्भवती महिलांनी खाण्याच्या बाबतीत पुरेशी खबरदारी घ्यावी. कॉफी देखील कमी प्रमाणात घ्यावी. यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतील.
(डिस्क्लेमर: ही सामान्य माहिती केवळ वाचनासाठी दिलेली आहे. ईटीव्ही भारत या माहितीच्या वैज्ञानिक मान्यतेबाबत कोणतीही पुष्टी करत नाही. अधिक माहितीसीठी डॉक्टरांकडून सल्ला घ्यावा.)
हेही वाचा
गरोदरपणात दूध पिण्याचा येतो कंटाळा? ही ट्रीक वापरून पहा
स्ट्रेच मार्क्सच्या समस्येनं त्रस्त आहात? करा 'हे' उपाय - Pregnancy stretch marks oils