ETV Bharat / health-and-lifestyle

नवरात्रीत नक्की ट्राय करा या हेअरस्टाइल; लुकमध्ये लागतील 'चार चांद' - Navratri 2024 Special Hairstyle

Navratri 2024 Special Hairstyle : नवरात्रीत विविध ड्रेस आणि दागिण्यांसह तुमचे सौंदर्य अधिक खुलवून दिसण्यासाठी हेअरस्टाइल सुद्धा ट्राय करून पहा.

author img

By ETV Bharat Lifestyle Team

Published : 2 hours ago

Updated : 2 hours ago

Navratri 2024 Special Hairstyle
नवरात्री स्पेशल हेअरस्टाइल (ETV Bharat)

Navratri 2024 Special Hairstyle : नवरात्रीमध्ये नऊ दिवस माता दुर्गेच्या विविध नऊ रुपांची पूजा-अर्चना केली जाते. यावेळी महिला खास 'सोलह श्रृंगार' करतात. सोबतच आकर्षक कपडे आणि दागिणे परिधान करून देवीची आराधना करतात. मात्र, तुम्हाला जर इतरांपेक्षा अधिक खुलून दिसायचं असेल तर काही हटके हेअरस्टाइल ट्राय करून तुम्ही आपल्या सौंदर्याला चार चांद लावू शकता.

अशा अनेक हेअरस्टाइल आहेत, ज्या विविध साड्यांसोबत सलवार-कुर्त्यांवरही शोभून दिसतात. यासाठी तुम्हाला पार्लरमध्ये जाण्याची गरज नाही. तुम्ही घरच्या घरीच आपल्या ड्रेसनुसार हेअरस्टाइल ट्राय करू शकता. चला तर पाहुया नवरात्रीत कोणती हेअरस्टाइल तुम्ही ट्राय करावी.

रंगीत रिबन: रंगीत रिबन वापरण्यासाठी तुम्हाला कोणत्याही साधनांची गरज नाही. सर्वप्रथम तुम्ही आपले केस चांलगे विंचरून घ्या. तुम्हाला आवडत असेल त्या स्टाइलमध्ये तुमचे केसं बांधा. जसे की आपल्यापैकी अनेकांना वेणी, फिशटेल किंवा साधी पोनीटेल करायला आवडत असेल. त्यापैकी कोणत्याही एका पद्धतीनं केसं बांधून घ्या. त्यानंतर केसांच्या मध्यभागी रंगबेरंगी रिबन फिरवून केसांवर बांधा. हा लूक तुमच्या केसांना विशेष आकर्षण प्रदान करेल.

मेस्सी बन: साध्या मेस्सी हेअरस्टाइलनं सुद्धा तुम्ही तुमच्या केसांचे सौंदर्य खुलवू शकता. त्यासाठी सर्वप्रथम डोक्याच्या सुरुवातीच्या भागात किंवा मधोमध पफ बनवून घ्या. यामुळे तुमच्या केसांना एक वेगळा लुक येईल व केस चपटे दिसणार नाही. त्यानंतर उर्वरित केसांची पोनीटेल बांधून डोक्याच्या मागे जुडा बांधून घ्या. ही अगदी साधी हेअरस्टाइल तुमच्या केसांना कॅज्युअल पण आकर्षक लूक देईल.

Navratri 2024 Special Hairstyle
नवरात्री स्पेशल हेअरस्टाइल (ETV Bharat)

आंबाडा आणि सोबत गजरा: ही फार जुनी हेअरस्टाइल आहे. मात्र, हा तुम्हाला ट्रॅडिशनल लुक देईल. अनेकदा सिंपल-सोबर लुकही सर्वांना आपल्याकडे आकर्षवून घेतो. यासाठी डोक्यावर केसांचा एक साधा अंबाडा बांधा. त्यानंतर त्यावर विविध फुलांचा गजरा बांधून घ्या. लक्षात ठेवा, गजऱ्याची फुलं ही ताजी असावीत.

Navratri 2024 Special Hairstyle
नवरात्री स्पेशल हेअरस्टाइल (ETV Bharat)

साइड वेणी : ही एक फारच सुंदर हेअरस्टाइल आहे. साडीसोबतच कोणत्याही ड्रेसवर ही खुलून दिसते. त्यासाठी हेअर कर्लरच्या सहाय्यानं केसं कर्ल करून घ्या. केसांमध्ये एका बाजूनं भांग पाडून फ्रेंच वेणी बांधून घ्या. या हेअरस्टाइलनं तुम्ही सर्वांमध्ये हटके दिसाल.

Navratri 2024 Special Hairstyle
नवरात्री स्पेशल हेअरस्टाइल (ETV Bharat)

सिंपल ओपन हेअर: ही हेअरस्टाइल महिलांसोबतच तरुणींवर अधिक चांगली दिसते. यामध्ये कोणतीही विशेष मेहनत करण्याची गरज नाही. केस धुतल्यानंतर त्यांना चांगल्या प्रकारे सुकवून घ्या. त्यानंतर कर्लिंग मशीनने केस कर्ल करून घ्या. कोणत्याही प्रकारे केसं न बांधता अगदी साध्या पद्धतीनं मोकळे सोडा. यामध्ये तुम्ही फार सुंदर दिसणार.

Navratri 2024 Special Hairstyle
नवरात्री स्पेशल हेअरस्टाइल (ETV Bharat)

हेही वाचा

  1. नवरात्रीमध्ये दुर्गामातेसाठी खास नऊ भोग - Navratri 2024 Bhog for Each Day
  2. नवरात्रीचे 9 दिवस उपवास करता? एनर्जेटिक राहण्यासाठी आहारात घ्या 'हे' पदार्थ - Navratri Festival 2024

Last Updated : 2 hours ago
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.