ETV Bharat / health-and-lifestyle

National Vaccination Day: "प्राणघातक रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरणाद्वारेच जीवनदान" : डॉ संदीप दानखडे

National Vaccination Day : लसीमध्ये मृत किंवा जिवंत अवस्थेतील सूक्ष्मजीव आणि विषाणू असतात लस शरीराची प्रतिकारशक्ती उत्तेजित करतात आणि परिणामी आजार व रोगांना प्रतिबंधित करतात. लसीकरणामुळं तयार झालेल्या मजबूत प्रतिकारशक्तीमुळं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते, असं डॉ संदीप दानखडे यांनी सांगितलंय.

National Vaccination Day: "प्राणघातक रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरणाद्वारेच जीवनदान" : डॉ संदीप दानखडे
National Vaccination Day: "प्राणघातक रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरणाद्वारेच जीवनदान" : डॉ संदीप दानखडे
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 16, 2024, 9:24 AM IST

डॉ संदीप दानखडे

अमरावती National Vaccination Day : गेल्या काही दशकांमध्ये टीबी, धनुर्वात आदी प्राणघातक आजारांविरुद्ध लढण्यासाठी लस हे एक महत्त्वाचं शस्त्र म्हणून मानवासाठी उपयुक्त ठरलंय. प्राणघातक ठरु शकणाऱ्या या रोगांना प्रतिबंधित करण्यासाठी लसीकरण अतिशय महत्त्वपूर्ण आहे. सुरक्षितपणे रोगप्रतिकारशक्ती विकसित करण्यासाठी लस शरीराच्या नैसर्गिक संरक्षणासह रोगांचा धोका कमी करतात. लसीमध्ये मृत किंवा जिवंत अवस्थेतील सूक्ष्मजीव आणि विषाणू असतात. लस शरीराची प्रतिकारशक्ती उत्तेजित करतात आणि परिणामी आजार आणि रोगांना प्रतिबंधित करतात. लसीकरणामुळं तयार झालेल्या मजबूत प्रतिकारशक्तीमुळं विविध प्रकारच्या आजारांपासून संरक्षण मिळते. खरंतर प्राणघातक रोगांना प्रतिबंधित करण्यासह लसीकरणाद्वारे मानवाला जीवनदानच मिळते, असं अमरावती शहरातील बालरोग तज्ञ डॉ. संदीप दानखडे यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितलंय. कोविड-19 सारख्या घातक आजारावर मात करण्यासाठी लसीकरण हाच एकमेव पर्याय होता. कोविड-19 मुळं लसीकरणाचं महत्त्व प्रत्येकाला पटलं असून 16 मार्च हा राष्ट्रीय लसीकरण दिन लसीकरणाच्या जनजागृती संदर्भात अतिशय महत्त्वाचा असल्याचंही डॉ संदीप दानखडे यांनी सांगितलंय.

राष्ट्रीय लसीकरण दिनाचा इतिहास काय : देशात 16 मार्च 1995 रोजी तोंडावाटे पोलिओ लसीचा डोस देण्यास सुरुवात झाली. या दिवसानं संपूर्ण देशात लसीच्या महत्त्वाविषयी जनजागृती करण्यात आली. त्यामुळंच 16 मार्च हा दिवस भारत सरकारच्या आरोग्य विभागातद्वारे साजरा केला जातो. देशातून पोलिओचं उच्चाटन करण्यासाठी हा सकारात्मक पुढाकार होता, असंही डॉ संदीप दानखडे म्हणाले. डॉक्टरांसह आपण सारेच लसीचा प्रसार समाजाच्या शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी कटिबद्ध आहोत. लिंग, भूगोल किंवा सामाजिक अथवा आर्थिक स्थिती विचारात न घेता प्रत्येक मानवी जीवनात प्रतिबंध करण्यायोग्य रोगांपासून संरक्षण करण्यासाठी सुरक्षित आणि प्रभावी लसीकरण आवश्यक असल्याचंही त्यांनी म्हटलंय.

लसीकरणाला प्राचीन इतिहास : भारतात लसीकरणाची मोहीम 1995 पासून झपाट्यानं राबविण्यात आली असली, तरी अतिशय प्राचीन काळापासून अनेक आजारांवर लसीकरण करण्याची परंपरा आहे. चिनी लोक इसवी सन 1000 च्या सुरुवातीपासून लसीकरणाचा वापर करत होते. नंतर लसीकरण मोहीम ही युरोप आणि अमेरिकेपर्यंत पोहोचली. 1796 मध्ये एडवर्ड जेन्नर यांनी चेचकांपासून संरक्षण करण्यासाठी यशस्वीरित्या लस वापरुन महत्वपूर्ण भूमिका बजावली होती. यामुळं अधिक लसीचा पाया घातला गेला आणि 1979 पर्यंत मोठ्या प्रमाणात लसीकरणाच्या प्रयत्नांनी चेचक निर्मूलन झालं. 18 व्या आणि 19 व्या शतकात लुई पाश्चर सारख्या शास्त्रज्ञांनी कॉलरासाठी लस विकसित केली तसंच प्लेगची लस शोधून काढली. 1890 आणि 1950 च्या दरम्यान तसंच आजही वापरल्या जाणाऱ्या बीसीजी लसी आणि जिवाणूजन्य लसी विकसित करण्यात आल्या. 19 व्या शतकाच्या सुरुवातीस धनुर्वात आणि दीप थेरियासाठी लस तयार करण्यात आली. नंतर विसाव्या शतकाच्या मध्यात व्यापक लसीकरणासह साल आणि सबीन पोलिओ लसीचा विकासामुळं जागतिक स्तरावर पोलिओचं उच्चाटन करण्यात आल्याची माहिती डॉ संदीप दानखडेंनी दिली.

लसींची अलीकडल्या काळात प्रगती : "गत वीस वर्षात लसीकरणात लक्षणीय प्रगती झालीय. आता हेपेटायसिस बी आणि हंगामी इन्फ्लुएंजा, गोवर, मेंदूवर हिपेटाइटिस, न्यूमोनिया इत्यादींसाठी यशस्वी लस उपलब्ध आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळं भविष्यात आणखी चांगल्या लसींची आपण अपेक्षा करु शकतो," अशी आशा त्यांनी व्यक्त केलीय. "राष्ट्रीय लसीकरण दिनानिमित्त आपल्याला निरोगी ठेवण्यासाठी कठोर परिश्रम करणाऱ्या संशोधक वैज्ञानिक आणि आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांचे तसंच डॉक्टरांचे आभार मानण्याची खरंतर सर्वांना संधी आहे. हे सारेच आपला वेळ आणि प्रयत्न लस विकसित करण्यासाठी समर्पित करतात. ज्यामुळं रोगांपासून आपलं संरक्षण होतं आणि आपलं जीवनमान सुधारतं. भारतात स्वनिर्मित कोविड लसीद्वारे नुकतेच कोविड-19 या गंभीर आजाराच्या जागतिक महामारीशी यशस्वीपणे मुकाबला करुन जगातील अनेक देशांनाही या जागतिक महामारीच्या गंभीर धोक्यापासून सुखरुप बाहेर काढण्यात यश मिळालं," असं डॉ दानखडे म्हणाले.

हेही वाचा :

  1. World Immunization Day 2023 : 'जागतिक लसीकरण दिन' 2023; प्रत्येक वयात आवश्यक लसीकरणाने होते आरोग्याचे रक्षण
  2. COVID Vaccination in Mumbai: मुंबईत आजपासून ज्येष्ठ नागरिकांना बूस्टर डोसचे लसीकरण, जाणून घ्या, सविस्तर माहिती

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.