Heater Rod Precautions: हिवळ्यामध्ये थंड पाण्याने आंघोळ करणे एक आव्हानच असते. कारण थंड वातावण आणि त्यात थंड पाण्यानं आंघोळ करण्याचं गणित काही केल्या जमत नाही. अशावेळी पाणी गरम करण्यासाठी आपण विविध उपकरणाचा उपयोग करतो. गीझर महाग असल्यानं प्रत्येकजण ते वापरू शकत नाही. म्हणून बहुतांश लोक पाणी गरम करण्यासाठी रॉड हीटरचा वापर करतात. परंतु रॉड वापरताना तुम्ही काही गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण हे रॉड धोकादायक ठरू शकतात. एक लहानशी चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. कधीकधी छोटी चूक जीवघेणी देखील ठरू शकते. चला तर पाहूया रॉड वापरताना कोणती खबरदारी घेणे आवश्यक आहे.
- रॉड वापरताना नेहमी प्लास्टिकच्या बादलीचा वापर करा.
- पाण्यात टाकण्यापूर्वी रॉड चूकुनही गरम करू नका.
- सर्वात आधी रॉड पाण्यात घाला आणि नंतरच स्विच चालू करा.
- वॉटर हीटर्सचा वापर करताना नेहमी चप्पल घाला. हीटर बंद केल्यानंतर कमीत कमी 10 ते 15 मिनिट पाणी आणि हीटरला स्पर्श करू नका.
- रॉड वर्षानुवर्षे वापरू नका दर दोन वर्षानंतर रॉड बदला.
- काही लोक पैसे बचत करण्यासाठी स्वस्त रॉड खरेदी करतात. स्वस्त रॉड वापरल्यास विजेचा धक्का लागण्याचा धोका जास्त असतो. तसंच हे लवकर खराब होतात. त्यामुळे स्वस्त रॉड खरेदी करू नका. ISI मार्क असलेला हिटर खरेदी करा. खरेदी करताना वॅटेज तपासणे गरजेचं आहे.
- घरातील लहान मुलांना हीटरपासून दूर ठेवा. कारण लहान मुलांना अनवधानाने विजेचा धक्का बसण्याच धोका जास्त असतो.
- तासन् तास हीटर चालू ठेऊ नका.
- हिटर रॉडच्या नेहमी वापरामुळे त्यावर गंज आणि पांढेर डाग जमा होतात. त्यामुळे रॉड गरम होत नाही. परिणामी वीजही जास्त लागते. त्यामुळे रॉडला ब्रशने घासून स्वच्छ करावे.