हैदराबाद Makeup Tips : उन्हाळा म्हटलं की लग्नसराईचा सिझन. लग्न समारंभामध्ये प्रत्येक स्त्री सुंदर दिसावी अशी तिची अपेक्षा असते. यामुळे प्रत्येकजण आपला ग्लॅमरस लूक जपण्याचा प्रयत्न करत असतो. परंतू उन्हाळ्यात उष्णतेमुळं मेकअप (Makeup)जास्त काळ टिकत नाही. यात केकी फाउंडेशन, अस्ताव्यस्त पसरलेला मस्करा, चिकट झालेले लिपस्टिक, तेलकट झालेले कपाळ आणि इतर अनेक समस्या येतात. मात्र, काही योग्य मेकअप टिप्स फॉलो केल्यास तुम्ही उन्हाळ्यामध्येही ताजं-तवानं आणि घामही न येणारा लूक मिळवू शकता. त्याकरिता फॉलो करा खालील टिप्स...
फाउंडेशनला करा बाय : उन्हाळ्यात फाउंडेशन लावल्यास फाउंडेशन केकी होतो. त्यामुळे हेवी फाउंडेशन लावणं टाळावं. त्याऐवजी आपल्या आवडत्या लिक्विड फाउंडेशमध्ये थोडं मॉइश्चरायझर मिक्स करा आणि चेहऱ्यावर लावा. यामुळं चेहऱ्याला नॅचरल लुक येतो.
घरगुती सेटिंग स्प्रे बनवा : तुमचा चेहरा टवटवीत ठेवण्याकरिता होममेड सेटिंग स्प्रे तयार करा. स्प्रे तयार करण्यासाठी एका बाटलीमध्ये थोडं ग्लिसरीन किंवा कोरफडीचं जेल मिक्स करा. तुमचा मेकअप पूर्ण होताच त्यावर स्प्रे करा. या होममेड सेटिंग स्प्रेमुळे तुमचा मेकअप खराब होणार नाही.
ओठांवर लिंबाचा रस : लिंबामध्ये असलेला सायट्रिक ऍसिड तुमच्या त्वचेवर नैसर्गिक एक्सफोलिएट म्हणून काम करतो. त्यामुळं ओठ आतून गुलाबी होतात.
काकडी: काकडी कापून डोळ्यांवर ठेवल्यास डोळ्यांची सूज आणि इतर समस्या कमी होतात. डोळे सुजल्यासारखे वाटत असल्यास काकडीचे तुकडे काही काळ रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि काही वेळानंतर डोळ्यांवर लावल्यास चांगलं परिणाम मिळतील.
त्वचेच्या टोननुसार ब्रॉन्झर बनवा : तुमच्या त्वचेच्या टोननुसार घरी ब्रॉन्झर तयार करु शकता. हवा तसा रंग येईपर्यंत त्यात कोको पावडर, दालचिनी आणि कॉर्न फ्लोअर मिक्स करा आणि गालावर, कपाळावर आणि नाकावर लावावं.
गुलाबजल : गुलाबजल त्वचेला ताजं-तवानं ठेवतं. गुलाबजल बनवण्याकरिता ताज्या गुलाबाच्या पाकळ्या पाण्यात घालून मंद आचेवर उकळा. कोमट झाल्यास एका बाटलीत भरून रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा आणि आवश्यकेनुसार वापरा.
हेही वाचा -
Summer Skin Care Tips : उन्हाळ्यात त्वचा काळी पडलीय? असा मिळवा तुमच्या चेहऱ्यावर ग्लोईंग
Summer Tips For Skin : तुमची त्वचा आणि केस उष्णतेच्या लाटेपासून वाचवायचे असतील तर या टिप्स जरुर वापरा